आंतरमशागत व तणनियंत्रण सोयाबीन पिकामध्ये येणाऱ्या तणांचे योग्यवेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे पीक १५ ते २० दिवसांचे असताना पहिली आणि २५ ते ३० दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. एक खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे. एकदा सोयाबीनला फुले लागली की कोळपणी करू नये, अन्यथा सोयाबीनच्या मुळ्या तुटून नुकसान होते. मजुरांच्या कमतरतेमुळे किंवा पावसामुळे खुरपणी/ कोळपणी करणे शक्य नसल्यास तणनाशकांचा वापर करावा.
यामध्ये पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी पेंडीमिथॅलीन (३८.७ सीएस) ३ ते ३.५ मि.लि. किंवा डायक्लोसुलम (८४ डब्ल्यूडीजी) ०.०४२ ग्रॅम किंवा सल्फेन्ट्राझॉन (३९.६ एससी) १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे जमिनीवर समप्रमाणात फवारावे. अन्यथा पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी किंवा तण दोन ते चार पानांच्या अवस्थेत असताना इमीझाथापायर (१० एसएल) १.५ ते २ मि.लि. किंवा इमीझाथापायर + इमीझामॉक्स (७० डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा क्लोरीम्युरॉन इथाईल (२५ डब्ल्यूपी) ०.०८ ग्रॅम किंवा सोडिअम
ॲसिफ्लोरोफेन (१६.५%) + क्लोडीनोफॉप प्रोपार्जील (१०% ईसी) २ मि.लि. किंवा क्विझालोफॉप इथाईल (५ ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तणनाशकाची फवारणी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल लावून ओलावा असलेल्या जमिनीवरच केली पाहिजे. तण वाढल्यानंतर तणनाशके फवारल्यास त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. (तणनाशकांचा वापर करण्यापूर्वी पीक पद्धती, तणांचा तसेच जमिनीचा प्रकार व हवामानानुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
त्यामुळे पीक १५ ते २० दिवसांचे असताना पहिली आणि २५ ते ३० दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. एक खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे. एकदा सोयाबीनला फुले लागली की कोळपणी करू नये, अन्यथा सोयाबीनच्या मुळ्या तुटून नुकसान होते. मजुरांच्या कमतरतेमुळे किंवा पावसामुळे खुरपणी/ कोळपणी करणे शक्य नसल्यास तणनाशकांचा वापर करावा. यामध्ये पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी पेंडीमिथॅलीन (३८.७ सीएस) ३ ते ३.५ मि.लि. किंवा डायक्लोसुलम
Published on: 10 July 2022, 09:39 IST