Agripedia

ह्युमिक/ह्यूमस हा घटक सेंद्रिय पदार्थाचा शेवटची अवस्था असते.

Updated on 04 July, 2022 5:11 PM IST

ह्युमिक/ह्यूमस हा घटक सेंद्रिय पदार्थाचा शेवटची अवस्था असते. यामध्ये सर्व प्रकारचे पिकास पोषक व पूरक असे अन्नद्रव्य व अनेक प्रकारचे हार्मोन्सस असतात.हे द्रव्य पूर्णपणे सेंद्रिय असल्याने यापासून पिकास कुठलाही अपाय होत नाही. या द्रव्यामुळे पिकास पोषक द्रव्य व व इतर अन्नद्रव्य उपलब्ध होण्यास मदत होते. असे हे बहुगुणी व उपयुक्त अन्नद्रव्य आहे.शेतकरी मित्रांनो आज आपण ह्युमिक (Humic) ऍसिड याबद्दल जाणून घेणार आहोत.ह्युमिक ऍसिड दोन प्रकारे येते- 1)पोटॅशियम ह्युमिक व 2) सोडियम ह्युमिक.यामध्ये मुख्यत्वे करून पोटॅशियम ह्युमिक हे शेतीसाठी वापरतात.

सध्या बाजारामध्ये असे हे बहुगुणी द्रव्य अनेक प्रकारात,अनेक रूपात विकले जाते. शेतकऱ्यांना साधारणपणे 100 ते 1000 रू. पर्यंत याचे भाव प्रती लिटर किंवा किलो साठी असू शकतात.शेतकरी मित्रांनो फक्त रंग काळा/तपकीरी/चॉकलेटी असला म्हणजे ते प्रत्येक द्रव्य शुध्द (Pure) ह्युमिक असेलच असे नाही. कारण बाजारात ह्युमिक च्या नावाखाली शेकडा 15 ते 95 टक्के प्रमाण सांगून फक्त 5 टक्के प्रमाण देवून काळसर द्रव्य/पाणी शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. त्यासाठी आपण ह्युमिक ॲसिड विकत घेताना योग्य,खात्रीच्या दुकानातून व तसेच चांगल्या कंपनीचे घ्यावे. 

कारण बाजारात ह्युमिक च्या नावाखाली शेकडा 15 ते 95 टक्के प्रमाण सांगून फक्त 5 टक्के प्रमाण देवून काळसर द्रव्य/पाणी शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. त्यासाठी आपण ह्युमिक ॲसिड विकत घेताना योग्य,खात्रीच्या दुकानातून व तसेच चांगल्या कंपनीचे घ्यावे.कारण सध्याच्या काळात शेतीच्या चांगल्या उत्पादनासाठी आजच्या शेणखताच्या टंचाईच्या काळात पिकांना व जमिनीचे आरोग्य योग्य राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड सारखे दुसरे द्रव्य नाही पण काही चुकीच्या मार्केटिंग व (बाजारू/गल्लाभरू)

विक्रीतंत्रामुळे शेतीस उपयुक्त असे ह्युमिक ॲसिड हे द्रव्य बदनाम झालेले आहे. पण शेतकऱ्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी योग्य व खात्रीच्या दुकानातूनच ते विकत घ्यावे.ह्युमिक ऍसिड विकत घेताना पोटॅशियम ह्यूमिक स्वरूपात विकत घ्यावे. कारण यामध्ये सर्वसाधारणपणे 6 ते 10 टक्के पर्यंत नैसर्गिक पोटॅश असतो तो पिकांना उपलब्ध होतो यामुळे झाड कणखर बनते.शेतकरी मित्रांनो ह्यूमिकॲसिड जरूर वापरा पण योग्य कंपनीचे व योग्य दुकानातून खरेदी करूनच वापरा व आपल्या पिकाचे उत्पादन वाढवा.

 

प्रा.दिलीप शिंदे सर

9822305282

English Summary: Learn Agricultural Advice- The role of humic acid in increasing cotton production
Published on: 04 July 2022, 05:11 IST