विविध पिकांवर येणारे व्हायरस हे पिकाच्या पेशीत राहणारे सुक्ष्मजीव आहेत. जगातिल पहिला शेती क्षेत्रात येणारा व्हायरस हा मार्टिनस बेजिरिन्क या डच शास्रज्ञाने १८९८ मधे शोधुन काढला. तंबाखु पिकावरिल टोबॅको मोझॅक व्हायरस चा या शास्रज्ञाने शोध लावला होता, ज्यास ते त्यावेळेस द्रव स्वरुपातील जिवंत संसर्ग करणारे द्रव असा उल्लेख करत.
पिकावरिल व्हायरस च्या कोअर मधे न्युक्लिक असिड असते.Picavril virus contains nucleic acid in its core.न्युक्लिक असिड हे एकतर रायबो न्यक्लिक असिड (RNA) किंवा डि ऑक्सिरायबो न्युक्लिक असिड (DNA) असते. सर्वच प्लांट व्हायरस हे रॉड किंवा आयसोमेट्रिक आकाराचे असतात. व्हायरसच्या कोअर च्या बाहेरिल बाजुस प्रोटिन्स (प्रथिने) चे कवच असते. पिकावरिल व्हायरस ला पिकामधे
शिरण्यासाठी छिद्र लागते, त्याशिवाय ते पिकांस शीरु शकत नाहीत. ह्या अशा जखमा पिकावर नैसर्गिक किंवा मानव निर्मित घटनांनी होत असतात. खालिल ठिकाणी पिकावर विविध नैसर्गिक आणि मानव निर्मित कारणांमुळे होणा-या जखमांची माहीती आहे, यापैकि एकही घटना घडत असेल तर ती पिकात व्हायरस शिरण्यास मदत करेल. त्यानुसार योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे ठरते.
मुळांची वाढ होत असतांना, नविन मुळी फुटणे.जोराचा वारा ज्यामुळे पिकाचे अवयव तुटतात अगर त्यांना इजा होते.फवारणी करतांना फांदी, पान वै तुटणे.रसशोषक किडिंचा प्रादुर्भाव मुळांवरिल सुत्रकृमींचा प्रादुर्भाव विविध प्रकारचे कलम करुन पिकांची लागवड करत असतांना.पिकावर येणारे व्हायरस हे प्रामुख्याने निमॅटोड, रस शोषक किडी, बुरशी, पॅरासिटिक प्लांट याव्दारे पसरत असतात.
यापैकि किडिंमुळे आणि निमॅटोड मुळे शेती पिकांत जास्तीत जास्त प्रमाणात व्हायरस चा प्रसार होतो, यांना व्हेक्टर म्हणुन ओळखले जाते. हे व्हेक्टर जेव्हा पिकावर हल्ला करतात तेव्हा त्यांच्या शरिरात आधीपासुनच असलेला व्हायरस पिकात शिरतो, हि क्रिया अगदी १ ते ५ सेकंदात पुर्ण होते. त्यामुळे रसशोषक किड पिकांस दंश किंवा जखम करु
रसशोषक किड पिकांस दंश किंवा जखम करु शकणार नाही असे एखादे किटकनाशक फवारणे किंवा अशा किडिंना रोपांपासुन लांब ठेवणे गरजेचे असते. रसशोषक किडिंसाठी वापरले जाणारे किटनाशक हे किडिवर प्रक्रिया करुन तिला मारण्यासाठी ३० मिनिट ते २ दिवस देखिल लागतात, त्यादरम्यान होणारे व्हायरस चे संक्रमण थांबवणे जड जाते.
Published on: 10 August 2022, 12:50 IST