कांद्यापासून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे कांद्याच्या सुधारित जाती निवडणे. तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर कल्याणी येथील विधानचंद्र कृषी विद्यापीठ आयोजित अखिल भारतीय कांदा आणि लसूण नेटवर्क संशोधन प्रकल्प कार्यशाळेत कांद्याच्या ५ सुधारित जातींना मान्यता देण्यात आली आहे. कांद्याची लागवड राष्ट्रीय स्तरावर चांगली मानली जाते. आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या ५ सुधारित जातीबद्धल सांगणार आहोत.
सुधारित जाती:-
१) भीमा गडद लाल:-
भीमा गडद लाल जातीच्या कांद्याची लागवड दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, ओडीसा, तमिळनाडू आणि राजस्थान या भागात खरीप हंगामात केली जाते. भीमा लाल गडद या जातीपासून प्रति एकर २० - २२ टन उत्पन्न निघते. ९० ते ९५ दिवसात हे शिजते आणि तयार होते. या जातीचा आकार आकर्षक जे की गडद लाल आणि गोलाकार सपाट असतो.
२) भीमा सुपर:-
खरीप हंगामात उशिरा येणारे पीक म्हणून भीमा सुपर पीक घेता येते. या जातीचे उत्पादन खरीप हंगामात २० ते २२ टन प्रति एकर भेटते तर खरिपात उशिरा ४० ते ४५ तीन प्रति एकर उत्पादन मिळते. खरीप हंगामात ही जात १०० - १०५ दिवसात पिकटी तर उशिरा १०५ - ११० दिवसात पिकते. दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, ओडीसा, तमिळनाडू आणि राजस्थान या राज्यात ही जात पिकवली जाते.
३) भीमा लाल:-
या जातील महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यात रब्बी हंगाम येण्यापूर्वी च मान्यता दिली गेली आहे. मात्र आता दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, ओडीसा, तमिळनाडू आणि राजस्थान या राज्यात सुद्धा खरीप हंगामात मान्यता देण्यात आली आहे. खरीप मध्ये १०५ ते ११० दिवसात तर उशिरा खरिपात ११५ - १२० दिवसात ही जात परिपक्व होते. खरिपात १९ ते २१ तीन प्रति एकर तर उशिरा खरिपात ४८ - ५२ टन प्रति एकर उत्पन्न मिळते.
४)भीमा श्वेता:-
भीमा श्वेता या जातीच्या पांढऱ्या कांद्याची लागवड रब्बी हंगामात केली जाते. दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, ओडीसा, तमिळनाडू आणि राजस्थान या राज्यात या जातीच्या लागवडीसाठी मान्यता दिली आहे. ११० - १२० दिवसात ही जात परिपक्व होते. खरीप हंगामात जवळपास १८ - २० टन प्रति एकर तर रब्बी मध्ये २६ - ३० टन प्रति एकर असे उत्पन्न मिळते.
५)भीमा शुभ्रा:-
दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, ओडीसा, तमिळनाडू आणि राजस्थान या राज्यांमध्ये भीमा शुभ्रा या जातीच्या लागवडीसाठी मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्यात उशिरा खरिपासाठी मान्यता दिली आहे. ही जात खरिपात ११० - ११५ ते उशिरा खरिपात ११५ - १२० दिवसात परिपकव होते. खरिपात १८ - २० टन प्रति एकर तर उशिरा खरिपात ३६ - ४२ टन प्रति एकर उत्पन्न मिळते.
Published on: 03 November 2021, 04:24 IST