Agripedia

आपल्या देशात ६२ टक्के पिकाखालील क्षेत्रात नत्र कमी आहे.

Updated on 14 September, 2022 8:11 PM IST

आपल्या देशात ६२ टक्के पिकाखालील क्षेत्रात नत्र कमी आहे. स्फुरद ४६ टक्के क्षेत्रात कमी आहे तर पालाश २२ टक्के क्षेत्रात कमी आहे. रासायनिक खतांचे दुष्परिणाम, अफाट किमती यामुळे ती शेतकऱ्यांना परवडत नाहीत. यासाठी जिवाणू खतांचा वापर अधिक फायदेशीर ठरेल. जैविक किंवा जिवाणू खते म्हणजे नैसर्गिक खते होत. प्रयोग

शाळेत जिवाणूची वाढ करून व ते एकाद्या माध्यमात मिसळून अशी खते तयार केली जातात. Such fertilizers are prepared by growing bacteria in the school and mixing them in a medium. इंग्रजीत यास बॅक्टेरियल कल्चर असे म्हणतात.जिवाणू खतांचे अनेक प्रकार आहेत.

हे ही वाचा - मातीची तयारी , पिकांची फेरपालट व त्याचे महत्व

उदाहरणार्थ :- नत्रस्थिर करणारे जिवाणू खत, स्फूरद विरघळविणारे जिवाणू खत, कचरा कुजविणारे जिवाणू खत इत्यादी.आजपासून आपण प्रत्येक शेती उपयोगी जिवाणू विषयी अगदी बारीक माहिती बघणार आहोत .तर

मग चला सुरू करू आपल्या पहिल्या जिवाणू पासून रायझोबियम जिवाणू- या जिवाणूंचे कार्य सहजीवी पद्ध्तीने होते. हे जिवाणू हवेतील नत्र द्विदल पिकाच्या मुळाच्या गाठीमध्ये स्थिर करतात, पिकाला नत्राची तर जीवाणुला अन्नाची गरज असून ती एकमेकांच्या देवाणघेवानीने होत असल्याकारणाने या जीवाणुला सहजीवी जिवाणू असे म्हणतात. 

हे जिवाणू पिकांच्या मुळांवर गाठी तयार करून हवेतील नत्र शोषून घेतात व तो अमोनियाच्या स्वरूपात पिकांना पुरवतात.पेरणीपूर्वी बियाण्यावर रायझोबियमची बीजप्रक्रिया करून पेरल्याने रोपाच्या मुळावर कार्यक्षम गुलाबी गाठी तयार होतात. त्यामध्ये रायझोबियम जीवाणूच्या मदतीने हवेतील मुक्त नत्राचे स्थिरीकरण होते. तो नत्र नंतर पिके आपल्या वाढीसाठी उपयोगात आणतात.

रायझोबियम जिवाणू मुख्य फायदा : रायझोबियम जीवाणूच्या मदतीने हवेतील मुक्त नत्राचे स्थिरीकरण होते. तो नत्र नंतर पिके आपल्या वाढीसाठी उपयोगात आणतात.त्यामुळे पिकांची वाढ जोमाने होते .

 

जिवाणूंविषयी अधिक माहितीसाठी संपर्क : कृषी चिकित्सालय नारायणी, विंग A/8, पत्रकार नगर, लिशा हॉटेल मागे, कोल्हापूर 416003

संपर्क : 9529260883

English Summary: Learn about the many types and benefits of bacterial fertilizers
Published on: 14 September 2022, 07:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)