Agripedia

रोज उत्पन्न वाढेल या आशेवर कोणी काय सांगल ते प्रयोग करून अंगावर कर्ज वाढवून ठेवायचं काम शेतकर्या कडून चालू आहे.

Updated on 20 November, 2021 8:53 PM IST

आज यश मिळेल उद्या नफा होईल, हे केल तर पान रूंद होतात, ते केल तर पांढर्या मुळ्या सुटतात, अमुक फवारणी केली की वजन वाढते, अमुक खते घेतली की फुटवे चांगले निघतात. सगळे शेतकर्याची फसवणूक करून पैसे कमावणारेच. 

  रास्त भाव, हमी भाव, एम एस पी, स्वामीनाथन, रंगनाथन ही मागणी केली की योग्य दर मिळेल, तो आयोग लागू झाला पाहिजे मग उत्पन्न दिडपट मिळेल. असे ऐकून ऐकून दर वर्षी अनुभव घेत देत फक्त कर्ज वाढत गेल भावा, तुमची पोस्ट वाचली आणि कमेट करावं वाटल, खरच किती वर्षे हे प्रयोग करत जायचे?

 एक एक प्रयोग फेल गेला कि नशीबाला दोष देत एक एक वावर कधी इकल कळाल नाही. 

   कर्ज काढून पाण्यासाठी पाईपलाईन केली , घरच औत असल तर नांगरट चांगली होते, ट्रॅक्टर घेतला, शेणखता साठी जनावर केली, शेतीला जोडधंदा असावा म्हणून कोंबड्या शेळ्या, कर्ज काढून घेतली, 

कुणी सांगीतलं शेततळ काढा, कुणी सांगीतलं ड्रिप करा,मिरची लावा, कापुस लावा,भुई मुंग लावा,धान लावा, सोयाबिन लावा, द्राक्षे लावा, केळी लावा, डाळीब लावा, पपई लावा, वांगी लावा, सगळे उद्योग थाबले फक्त वाढल ते कर्ज.  

  सरकार कडून मिळाली सवलत फसवी, दररोज चारा घालून वाढवलेल्या बोकडावर जस कापण्यासाठी अंगावर मांस वाढण्याची वाट पाहात सांभाळले जाते. तसे शेतकर्या बघण्याची सगळ्यांची दृष्टी. खतवाला, औषधवाला, बॅकवाला, सावकार, आडत्या, साखर कारखानदार, दुध संघवाला, सगळे शेतकर्याची कापायला येण्या पुरतीच मदत. शेतकरी मोठा व्हावा ही कोणाचीच इच्छा नाही.  बोकडाला जस मालकाची आपल्यावर मर्जी आहे वाटून उड्या मारत जगत असते, आणि शेवटी कळतं यान आपल्याला का सांभाळले, तसे वेळ गेल्यावर कळत शेतकर्याला उत्पादन वाढवायला का सांगीतले ते.  

वर्षातून तीन तीन पीक घेऊन, पाणी पाजून पाजून, खत घालून घालून शेती नापीक होते, तरी प्रयोग थांबत नाही. ज्याला त्याला विचारल तर म्हणतय घरची शेती आहे, पडीक पाडायच काय? आणि पळून पळून प्रयत्न करून उत्पन्न डब्बल करायच्या नादात कर्ज डब्बल कधी होते कळत नाही. खर आहे 

रोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आमचं मन सुन्न करीत नाही.कुणीही बोलायला तयार नाही.

     शेती ही संस्कृती आहे असे ऐकून ऐकून कान पिकले आहेत. शेती करणारा शेतकरी तिथेच मातीत गाडल्या जातो आहे. बापाच्या छातीवर हात ठेवून झोपणाऱ्या मुलांना विचारा एकदा की तू का ठेवतो छातीवर हात? तेव्हा त्याचं उत्तर येते की बाप जिवंत आहे का हे चेक करावे म्हणून ठेवावा लागतो हात.भयाण आहे हे सर्व. आमच्या शेतीची पार वाट लावून टाकली इथल्या राजकीय सत्तेने. शेतीवर कविता करणारे छान जगतात. शेतीवर कादंबरी लिहिणारे खुशाल जगतात.

शेतकरी आत्महत्या वर पुस्तक लिहिणारे सुद्धा मजेतच असतात.शेती कशी करावी हे सांगणारे तर अधिकच मजेत आहेत. प्रत्यक्ष शेतीत राबणारा जीव मात्र कासाविस होतो आहे. त्याला त्याच्या प्रश्नांचे उत्तर शोधू दिले जात नाही.

विनोद धोंगडे नैनपुर

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

📞 ९९२३१३२२३३

English Summary: Learn about the frauds committed in the hope of increasing farmers' income.
Published on: 20 November 2021, 08:53 IST