केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात,त्यांना कीटकनाशके असे म्हणfतात.उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी.याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून,पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो.
किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन,मेटाल्डीहाईड,केलथेन इत्यादी आहेत.किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात.It is formulated to spray evenly over a large area. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत.
१) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन,१० टक्के कार्बारील.२) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते.प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी.,
गंधक ८० टक्के जलद्राव्य, ॲसीफट ७५ टक्के.३) प्रवाही प्रारुप : यात मूळ विषांचे प्रमाण २० ते ५० टक्केपर्यंत असते. हे प्रारुप पाण्यात विरघळून फवारणी करता येते. उदा. मॅलाथियान ५० ई.सी., फेनव्हेलरेट २० ई.सी.४) दाणेदार प्रारुप : या प्रारुपाचे कण मोठे असतात व त्यात मूळ विषाचे प्रमाण ३ ते १० टक्के असते. या प्रारुपाचा वापर जमिनीत टाकण्यासाठी करतात.
सर्वसाधारणपणे आंतरप्रवाही औषधे या प्रारुपात मिळतात,थायमेट १० टक्के,कार्बोफ्युरान ३ टक्के.किटकनाशकांचा वापर: किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या किटकनाशक औषधाचा योग्य तिव्रतेचा फवारा मारणे आवश्यक आहे. द्रावणाची तिव्रता कमी झाल्यास कीड मरणार नाही व जास्त झाल्यास त्याचे अनिष्ठ परिणाम होतील.
Published on: 30 August 2022, 05:50 IST