कांद्याची काढणी केल्यानंतर त्याची प्रतवारी करणे, कांदा सुकविणे, पात कापणे, बाजारभाव मिळेपर्यंत कांद्याची तात्पुरती साठवण करणे या गोष्टींकडे अनेकदा नीट लक्ष दिले जात नाही. केवळ कांद्याच्या लागवडी नंतर जात आणि हवामानानुसार कांदा ३ ते ५ महिन्यात काढणीस तयार होतो.
कांदा पक्व झाल्यावर नवीन पाने येण्याचे थांबते. पानांतील अन्नरस कांद्यामध्ये उतरून कांदा घट्ट होऊ लागतो.
कांदा बिजोत्पादन बाबत महत्वाचा लेख
पात पिवळसर होऊ लागते आणि, गड्ड्याच्या वर आपोआप वाकून खाली पडते.The leaf starts to turn yellow and automatically bends and falls down on top of the tuber. यालाच 'माना पडणे' असे म्हणतात. या वेळी कांद्याची मुळे सुकू लागतात आ णि त्यांची जमिनीची पकड सैल पडू लागते. साधारणपणे ३० ते
४० % झाडांच्या माना पडल्यानंतर कांदा काढणीस तयार झाला असे समजावे.सर्व कांदा एकाच वेळी काढणीला तयार होत नाही. मान पडल्यानंतर आणि पात सुकल्यावर कांदा काढावा. कांदा जसजसा तयार होईल तसतसे काढण्याचे काम खरीप हंगामात करतात. कारण खरीप हंगामात माना लवकर पडत नाहीत. कांदा पक्व झाला तरीही पातीची वाढ चालूच राहते. अशावेळी पक्व कांदा बधून काढावा. परंतु रांगडा
किंवा उन्हाळी कांदा काढणीला एकाच वेळी तयार होतो.या कांद्याची काढणी जानेवारी ते मे महिन्यापर्यंत चालते. या कांद्याच्या माना आपोआप पडतात. सर्व माना पडल्यानंतर कांदा एकाचा वेळी काढावा. कांद्याची पात ओलसर असतानाच कांदा उपटून काढावा. पात वाळली तर कांदा उपटून निघत नाही. अशा वेळी तो खुरप्याने किंवा कुदळीने काढावा लागतो.
Published on: 31 October 2022, 07:08 IST