Agripedia

कॅरियर किंवा बेस म्हणजे काय - जैविक उत्पादनांच्या स्पोअर्स ला किंवा मायसेलियम ला कशामध्ये तरी एकत्र करुन त्याची गुणवत्ता टिकवणे, शेतात वापरण्यासाठी सुलभ व्हावे यासाठी कॅरियर चा म्हणजेच वाढिव पदार्थाचा वापर केला जातो. ह्या पदार्थास कॅरियर किंवा बेस असे म्हणतात. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या जैविक उत्पादनांत ४ प्रमुख प्रकारचे कॅरियर वापरले जातात.

Updated on 19 December, 2021 1:34 PM IST

उत्तम कॉरियर चे मुलभुत गुणधर्म -

कॅरियर चा प्रमुख उद्देश हा की, जैविक उत्पादन शेतात वापरल्यानंतर त्यात असणाऱ्या स्पोअर्सला किंवा मायसेलियम ला रुजण्यासाठी आणि सुरवातीच्या काळात वाढीसाठी पोषक ठरतिल अशा पदार्थानी युक्त असावे.

तसेच ते जैविक उत्पादने तयार करणाऱ्या कंपनी कडुन शेतकऱ्यांच्या शेतात वापरले जाईल तितक्या काळापर्यंत मुळच्याच गुणधर्मांनी युक्त असावे. त्यातील स्पोअर्स ची संख्या कमी होता कामा नये.

जो कॅरियर वापरला जाणार आहे तो निर्जंतुकिकरण केलेला असावयास हवा आहे. जेणे करुन मुळच्या जीवाणू अगर बुरशी मध्ये भेसळ होणार नाही.

 

कॅरियर किंवा बेस चे प्रकार -

1. लिग्नाईट -

लिग्नाईट म्हणजेच एक प्रकारचा कोळसा असतो. जीवाणु किंवा बुरशीचे स्पोअर्स ह्यामध्ये एकत्र करुन बाजारात विक्रिसाठी पाठविले जातात. सध्या हा अशा प्रकारच्या कॅरियर चा वापर अत्यंत कमी झालेला आहे. लिग्नाईट मधुन जीवाणू किंवा बुरशी जिवंत झाल्यानंतर त्यांच्यासाठी तात्काळ उपलब्ध होईल अशा प्रकारचे खाद्य मिळत नाही, आणि साठवणुकित देखिल अडचणींचा सामना करावा लागतो. लिग्नाईट बेस किंवा कॅरियर हे पाण्यात विरघळत नसल्याने ते ड्रिप सिस्टिम द्वारे वापरता येत नाही. लिग्नाईट चा कॅरियर म्हणुन वापर केला असता, अशा उत्पादनांची महत्तम विक्रि कालवधी (Expiry Date) हा ३ महिने असा असतो. काही ठिकाणी ६ महिने देखिल असतो.

2. टाल्कम पावडर -

जी पावडर माणसे तोंडाला लावण्यासाठी वापरतात त्या पावडर मध्ये जीवाणूं चे स्पोअर्स किंवा बुरशीचे स्पोअर्स एकत्र करुन विक्रिसाठी पाठवले जातात. टाल्कम पावडर देखिल पाण्यात विरघळत नसल्या कारणाने सदरिल बेस असलेली उत्पादने ड्रिप मधुन वापरता येत नाहीत. टाल्कम चा कॅरियर म्हणुन वापर केला असता, अशा उत्पादनांची महत्तम विक्रि कालवधी (Expiry Date) हा ३ महिने असा असतो. काही ठिकाणी ६ महिने देखिल असतो.

 

3. लिक्विड बेस -

लिग्नाईट आणि टाल्कम पावडर चा बेस असलेल्या उत्पादनांतील शेतात वापरण्या संबंधीच्या त्रुटी दूर करण्यासाठी लिक्विड बेस चा वापर केला जातो. लिक्विड बेस म्हणजे, पाण्यात जैविक उत्पादने एकत्र करुन ती विक्री साठी पाठवली जातात. लिक्विड बेस मध्ये जिवंत स्वरुपातील बुरशी असल्यास, त्यांचे जीवन चक्र हे बाटलीत देखिल सुरुच असते. अशा प्रकारे बुरशी त्यांचे जीवनचक्र पुर्ण करत असल्याने, त्यांच्या द्वारा स्रवल्या गेलेल्या पदार्थाचे प्रमाण बाटलीत वाढुन, ते जीवाणू अगर बुरशीसाठी विषबाधक ठरुन त्यांचा मृत्यु देखिल होतो. बाटलीतच जीवाणू तसेच बाटलीतील द्रावण हे ट्रान्सपोर्ट मध्ये सतत हलत असण्याची देखिल शक्यता असते. त्यामुळे आधीपासुनच सुप्तावस्था सहज संपवता येईल असे वातावरण आणि साठवणुकीसाठी गरजेचे असलेले तापमान न पाळल्याने, सुप्तावस्थेतील जीवाणू अगर बुरशी देखिल जिवंत होवुन बाटलितच वाढण्याची शक्यता असते. आपण जैविक उत्पादनांच्या बाटल्या फुगलेल्या अनेक वेळेस बघितले असेल, अशा

प्रकारे बाटल्या फुगण्याचे कारण हे बाटलीत असलेले जीवाणू अगर बुरशी जिवंत झाल्याने त्यांच्या श्वसनामुेच होत असते. लिक्विड कॅरियर असलेल्या उत्पादनांसाठीचे तापमान अनेक ठिकाणी पाळले जाणे शक्य होत नाही. लिक्विड बेस मधिल उत्पादनांची कमी कालावधीची एक्सपायरी डेट आणि जीवाणू अगर बुरशी जिवंत होण्याचा जो धोका असतो, त्याला टाळण्यासाठी अनेक वेळेस लिक्विड बेस असलेली उत्पादने हि फ्रेश म्हणजे तयार केली की कमी दिवसांतच वापरावीत अशी शिफारस केली जाते. ह्या अशा शिफारशीच्या सोबत ह्या उत्पादनांची संख्या म्हणजेच सी.एफ.यु. हा कमी असल्या कारणाने तो वाढविण्यासाठी गुल,ताक, दही, स्लरी ह्यात भिजत घालण्याची जोरदार शिफारस केली जाते.

4. डेक्सट्रोज -

डेक्सट्रोज म्हणजे ग्लुकोज सारखा साखरेचा (कर्बोदकांचा) एक प्रकार आहे. डेक्सट्रोज मध्ये पाण्यात विरघळण्याची क्षमता असल्या कारणाने सदरिल उत्पादने पाण्यात पुर्णपणे विरघळतात, ज्यामुळे ड्रीप मधुन तसेच फवारणीतुन वापरण्यास अडचण येत नाही. डेक्सट्रोज ह्या कॅरियर मध्ये लिग्नाईट आणि टाल्कम पावडर प्रमाणेच कोरड्या स्वरुपातील कॅरियर मध्ये जैविक उत्पादने देणे शक्य होते. डेक्सट्रोज हे जैविक घटकांच्या पोषणासाठी देखिल उपयुक्त ठरत असल्या कारणाने, नव्याने रुजलेल्या म्हणजेच सुप्तावस्था संपवुन जिवंत झालेल्या जीवाणू आणि बुरशींच्या साठी अन्न म्हणुन कार्य करते. ह्यामुळे सुखातीच्या काळातील वाढ हि चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते. डेक्सट्रोज मध्ये अधिक जास्त प्रमाणात जीवाणू किंवा बुरशी देणे शक्य होते. (जास्त स्पोअर काउंट - जास्त सी.एफ.यू.). ह्या बेस मधिल उत्पादनांची एक्सपरायरी डेट हि जास्त काळ असु शकते. पुर्णपणे कोरडे, पाण्यात विद्राव्य, जास्त स्पोअर्स सामावुन घेण्याची क्षमता असल्या कारणाने आणि सोबतच मोठी शेल्फ लाईफ (जास्त काळाची एक्सपायरी डेट) असल्या कारणाने डेक्सट्रोज बेस असलेली उत्पादने हि ईतर तिनही प्रकारच्या कॅरियर पेक्षा उजवी ठरतात यात संशय नाही.

लिग्नाईट, टाल्कम पावडर, लिक्विड तसेच डेक्सट्रोज च्या व्यक्तिरिक्त ग्रॅन्यूल्स कॅरियर चा वापर करुन देखिल जैविक उत्पादने सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

निर्जंतुकीकरण केलेले कॅरियर हे अधिक चांगल्या प्रकारे कार्य करु शकत असल्याने बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांच्या कॅरियर चे निर्जंतुकिकरण केलेले असणे हे अत्यंत गरजेचे आहे. आधीपासुनच ईतर सुक्ष्मजीवांनी बाधीत असलेल्या कॅरियर मध्ये जर जैविक उत्पादने टाकलीत ता त्यांच्या संख्येवर विपरति परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजारातुन आणलेली उत्पादने शेतात वापरल्यानंतर त्यातील सुप्तावस्थेत असलेले बीजाणू अथवा स्पोअर्स हे रुजतात, बोली भाषेत जर्मिनेट होतात हाच शब्द सध्या जास्त वापरला जातो. 

 

एस व्ही अँग्रो सोल्यूशन्स् प्रा ली

कृषक ऑरगॅनिक्स्

पिंपळगाव बसवंत.

English Summary: Learn about game of soil and microbs
Published on: 19 December 2021, 01:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)