महाराष्ट्रात बहुतेक प्रत्येक भागात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शिमला किंवा ढोबळी मिरची आणि हिरवी मिरची आहारात सहसा दररोज वापरली जाते.. सध्या मिरची उत्पादक शेतकरी एका मोठ्या समस्येने ग्रस्त आहेत. ती म्हणजे “ मिरची पिकावरील व्हायरस/चुरडा – मुरडा
आपणा सर्वांना माहीतच आहे जसे माणसात काही विषाणूजन्य रोग आहेत. उदा. swine flu ( H1 N1 )यांच्यावर खात्रीशीर असा उपाय आज तागायत उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे मिरची पिकावरील विषाणूजन्य रोगांचे आहे. हा रोग शेतात येऊ न देणे किंवा पसरू न देणे हा एकच पर्याय आज शेतकरी बंधू समोर आहे. आजकाल बाजारातखूप काही औषधे वायरस नियंत्रक म्हणून शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात पण आल्यामुळे अजिबात नियंत्रण मिळत नाही.ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे यासाठी या लेखात आपण मिरची पिकावरील व्हायरस कसा रोखायचा याची माहिती घेऊ.
रोगाची लक्षणे
या रोगामुळे पानांच्या आकारात बदल होतो. तसेच पाने काठाने गुंडाळतात आणि झाडांची वाढ खुंटते.पाने गुंडा आल्यामुळे झाड पडल्यासारखे दिसते अशा झाडांना फळे लागत नाहीत आणि थोड्या प्रमाणात लागली तरी त्यांचे फळात रूपांतर होत नाही.
रोगाचा प्रसार
आपणास माहीत असेल की साधारणपणे कोणत्याही रोगाचा प्रसार हा हवा पाणी माती किंवा बियाणे मार्फत मधून होतो. पण या विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे, पांढरी माशी, मावा आणि कोळी या रस शोषणाऱ्या किडी मार्फत होत असतो.ह्याक्रियाविशेषण साठी वाहक म्हणून कार्यकर्ता जवा रस शोषणाऱ्या किडी अशा झाडावर रस शोषण करतात त्यावेळेस रसासोबत हा विषाणू सुद्धाकिडीच्या शरीरात प्रवेश करतो.आणि जेव्हा निरोगी वनस्पतीवर परत या किडी रस शोषण करतात त्यावेळेस हा विषाणू निरोगी झाडांमध्ये प्रवेश करतो.
नियंत्रणाचे उपाय
- मिरची पिकामध्ये स्वच्छता ठेवून पीक तणमुक्त ठेवावे.
- रोप नर्सरी मधुन विकत आणण्यापेक्षा शेतकरी बंधूनी स्वतः तयार करावीत कारण जवळपास 50% रसशोषक किडी या नर्सरी अवस्थेत पिकाला लागतात आणि त्या काळात हा विषाणू पसरतो झटपट वाढविण्याच्या नादात नर्सरी चालक नात्राच्या अमर्याद मात्रा देतात आणि जाड लुसलुशीत होऊनकिडीस जास्त बळी पडते.
- रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून टाकावे व जाळून नष्ट करावीत. जेणेकरून या रोगाचा संपूर्ण पिकामध्ये प्रादुर्भाव होणार नाही.
- मिरची पीक क्षेत्राच्या कडेला दोन तीन ओळी मध्ये ज्वारीची लागवड करावी.
- फुल किडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील (5 एस. सी.) 15 मि.ली. व लाल कोळी च्या नियंत्रणासाठी फेनाक्झाक्वीन(10 ईसी ) 25 मि.लि. प्रति 10 लिटर प्रमाणे नॅपसॅक पंपाने फवारावे.
- पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी डाय फेनथिरिओन 50 डब्ल्यू पी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- मावा, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8 एस एल 4 मि.ली. किंवा थायोमेथोक्झाम 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
Published on: 09 February 2022, 03:12 IST