1. कृषीपीडिया

लहसूनच्या पिकातून होईल चांगली कमाई. चांगल्या उत्पादणासाठी करा ह्या पद्धतीने लागवड.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
lasun lagvad

lasun lagvad

लसूण दररोज भारतीय स्वयंपाकघरात वेगवेगळ्या स्वरूपात वापरला जातो.  या कारणास्तव, त्याची मागणी कायम राहते आणि लागवड करणारे शेतकरी चांगले उत्पन्न मिळवतात.

 

आपल्या देशात लसूण मुख्यतः मसाला म्हणून वापरला जातो. त्याचबरोबर आयुर्वेदिक गुणांनी परिपूर्ण असल्याने लोक आरोग्यासाठीही याचा वापर करतात.  लसूण दररोज भारतीय स्वयंपाकघरात वेगवेगळ्या स्वरूपात वापरला जातो.  या कारणास्तव, त्याची मागणी कायम रहाते आणि लागवड करणारे शेतकरी चांगले उत्पन्न मिळवतात.

 

वास्तविक लसूण हा एक कंदयुक्त मसाला पीक आहे.  त्यात अ‍ॅलिसिन नावाचा घटक असतो.  या कारणास्तव, लसूण एक विशिष्ट प्रकारचा गंध देतो आणि त्याची चव तीक्ष्ण आहे.  लसूणच्या एका गाठीत बर्‍याच कळ्या असंतात.  ते स्वच्छ करून कच्चे किंवा शिजववुन खाल्ले जाते. लसूण मसाला तसेच औषध म्हणून वापरले जाते. लोक घशाच्या आणि पोटाच्या आजारापासून मुक्त होण्यासाठी लसूनाचे सेवन करतात.

 

 

 

या रोगांमध्ये वापरला जातो लसूण

 लसूण लोणची, भाजी, चटणी आणि मसाल्याच्या रूपात वापरला जातो. तसेच लसूण  उच्च रक्तदाब, पोटाचे रोग, पाचक समस्या, फुफ्फुसांच्या समस्या, कर्करोग, संधिवात, नपुंसकत्व आणि रक्त रोगासाठी वापरले जाते. जीवाणूविरोधी आणि कर्करोगविरोधी गुणधर्मांमुळे रोगांमध्ये वापरली जाते. आजच्या काळात लसूण फक्त मसाल्यापुरते मर्यादित नाही. आता पावडर, पेस्ट आणि चिप्स या सर्व उत्पादनातं लसूणचा प्रक्रिया केल्यानंतर वापर केला जातं आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत आहे.

 

 

 

हवामान व जमीन

समशितोष्‍ण हवामान लसूण लागवडीस उपयुक्‍त असते. मात्र अति उष्‍ण व अति थंड हवामान या पिकास मानवत नाही. समुद्रसपाटीपासून 1000 ते 1300 मीटर उंचीपर्यंत लसणाची लागवड करता येते. पिकाच्‍या वाढीच्‍या काळात 75 सेमी पेक्षा जास्‍त पाऊस पडत असल्‍यास पिकाची वाढ चांगली होत नाही. याकरता ऑक्‍टोबर महिन्‍यात केलेली लागवड अधिक उत्‍पादन देते. दिवसाचे 25 ते 28 अंश सें. ग्रे. व रात्रीचे 10 ते 15 अंश सें.ग्रे. तापमानात गडयांची वाढ चांगली होते.

 

मध्‍यम खोलीच्‍या भरपूर सेंद्रीय खते घातलेल्‍या रेती मिश्रित कसदार तणविरहित जमिनीत पीक चांगल्‍याप्रकारे घेता येते. हलक्‍या प्रकारच्‍या जमिनी, चिकण मातीच्‍या जमिनी लागवडीस योग्‍य नसतात.

 

 

 

 

पूर्वमशागत

मध्‍यम खोलीची नांगरट करुन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमीन तयार करते वेळी हेक्‍टरी 30 गाडया (15 टन) शेणखत मिसळावे. वर पाणी देण्‍यास सोईस्‍कर अशा आकाराचे (3×2) अथवा (3.5×2मी) सपाट वाफे तयार करावेत.

 

 

काढणी व उत्‍पादन

लावणीनंतर साडेचार ते पाच महिन्‍यांनी हे पीक काढणीस योग्‍य होते. पिवळी पडावयास लागली म्‍हणजे गाठे काढावयास तयार झाले असे समजावे. लसूण पातीसह तसाच बांधून ठेवावा म्‍हणजे 8 -10 महिने टिकतो. विक्रीसाठी पाती कापून गडडे स्‍वच्‍छ करुन आकाराप्रमाणे प्रतवारी करुन बाजारात पाठवतात. जमिनीचे पोत, खते व जात यावर लसणाचे उत्‍पादन अवलंबून असते. दर हेक्‍टरी 9 ते 10 टन उत्‍पादन मिळते

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters