कपाशीची प्रारंभीची पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरवात होते. त्यानंतर पानांमधील हरितद्रव्य नष्ट होऊन अंथोसायनीन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते. त्यामुळे पाने लाल रंगाची दिसू लागतात. लाल झालेली पाने शेवटी गळून पडतात."लाल्या' विकृती ही नत्र, मॅग्नेशिअम आणि जस्ताची कमतरता आणि अन्य कारणांमुळे दिसून येते.विकृती दिसण्याची संभाव्य कारणे1) पूर्वी कपाशी लागवड केलेल्या शेतात पुन्हा कपाशीची लागवड करणे.
2) ऊस, केळी यांसारखी जास्त अन्नद्रव्यांची गरज असणाऱ्या पिकांनंतर त्या शेतात कपाशीचे पीक घेतल्यास त्यास आवश्यक प्रमाणात अन्नद्रव्ये मिळत नाहीत. 3) हलक्या जमिनीत कपाशीची लागवड केल्यास लाल्या विकृती दिसते.If planting in a light soil, the flood disorders appear.4) जमिनीत पाणी साचून राहिल्यास किंवा पाण्याचा जास्त काळ ताण पडल्यास झाडे जमिनीतील नत्र,मॅग्नेशिअम व जस्तासारखी आवश्यक मूलद्रव्ये व्यवस्थितरीत्या शोषून घेऊ शकत नाहीत, त्यामुळे "लाल्या'ची लक्षणे दिसतात.
5) प्रामुख्याने बोंडे धरण्याच्या अवस्थेत पानामध्ये नत्राची जास्त गरज असते. या काळात पानांमधील नत्राचे प्रमाण 1.5 टक्क्यापेक्षा कमी झाल्यास पाने लाल होतात.6) नत्राची मात्रा विभागून न दिल्यास विकृती दिसते.7) बीटी जनुकामध्ये बोंडाचे बोंड अळ्यांपासून संरक्षण होते. परिणामी, झाडावर जास्त बोंडे टिकून राहतात.या बोंडांना पोषणासाठी जास्त नत्राची गरज असते.झाडास जमिनीतून आवश्यक त्या प्रमाणात नत्र न मिळाल्यास बोंडासाठी लागणाऱ्या नत्राची गरज
पानांतून भागवली जाते. त्यामुळे पानांतील नत्राचे प्रमाण कमी होऊन ती लाल पडू लागतात. 8) पिकाच्या शेवटच्या अवस्थेत जास्त वेगाने वारे वाहत असल्यास पिकाचा कालावधी काही प्रमाणात कमी होता, त्यामुळे पाने लाल पडतात.9) साधारणतः ऑक्टोबर व त्यापुढील महिन्यांत तापमान अचानक कमी झाल्यास (21 अंश से.पेक्षा) किंवा रात्रीचे तापमान 15 अंश से.पेक्षा कमी झाल्यास ऍन्थोसायनीन नावाचे लाल रंगाचे द्रव्य पानात जमा होते, त्यामुळे पाने लाल दिसू लागतात.
10) कपाशीवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास पान सुरवातीस कडेने लाल पडून नंतर संपूर्ण पानच लालसर दिसते.11) तुडतुड्यांशिवाय फुलकिडे व लाल कोळ्याच्या (माईट) प्रादुर्भावामुळेही काही प्रमाणात पाने लालसर दिसतात.नियंत्रणाचे उपाय - 1) कपाशीसाठी योग्य जमिनीची निवड करावी, हलक्या जमिनीत कपाशीचे पीक घेऊ नये. 2) पाणी साचणाऱ्या जमिनीमध्ये कपाशी घेणे टाळावे, पाणी साचल्यास त्वरित चर काढून ते पाणी शेताबाहेर काढून द्यावे.
3) खताची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी. नत्राची मात्रा कोरडवाहूसाठी दोन वेळा आणि बागायतीसाठी तीन वेळा विभागून देणे अतिशय आवश्यक आहे.4) पाते लागणे, बोंडे भरणे आदींसारख्या महत्त्वाच्या वाढीसाठी अवस्थेत दोन ते तीन वेळेस दोन टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी करावी.5) "लाल्या'ची लक्षणे दिसताच 40 ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
शिफारशीनुसार दोन ते तीन फवारण्या कराव्यात किंवा जमिनीतून 20 ते 30 किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रति हेक्टरी द्यावे.6) तुडतुडे, फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल, तर नियंत्रणासाठी 20 मि.लि. फिप्रोनील (पाच एस.सी.) किंवा आठ मि.लि. लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (पाच एस.सी.) किंवा 20 मि.लि. बुप्रोफेझीन (25 एस.सी.) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Published on: 14 August 2022, 07:49 IST