Agripedia

या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाणी वरच्या बाजूला आकसलेली दिसतात. हिरव्या पानावर टाचणीच्या टोकासारखे कोळी पिवळसर पांडू रखे ठिपके दिसतात. असे असंख्य ठिपक्या नंतर एकमेकात मिसळतात व अशी पाने नंतर पिवळसर दिसतात.

Updated on 08 April, 2022 11:09 AM IST

 या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाणी वरच्या बाजूला आकसलेली दिसतात. हिरव्या पानावर टाचणीच्या टोकासारखे कोळी पिवळसर पांडू रखे ठिपके दिसतात. असे असंख्य ठिपक्या नंतर एकमेकात मिसळतात व अशी पाने नंतर पिवळसर दिसतात.

पिवळ्या पानाचे निरिक्षण केल्यास आपणास पानाच्या खालच्या बाजूला लाल कोळी चे सूक्ष्म जाळे दिसतात. काही पानाच्या मध्यभागी पानाच्या मुख्य शिरेभोवती हलके तपकिरी चट्टे पडलेल्या सारखे दिसतात. करपल्यासारखे ठिपके(अनियमित) दिसतात.जास्त प्रादुर्भाव असल्यास संपूर्ण पाने पिवळी पडून वरच्या बाजूला आकसून वाळतात. व गळून पडतात व पूर्ण झाड पर्णहीन होते. ही अवस्था प्रामुख्याने कपाशीच्या बोंडे भरण्याच्या ते फुटण्याच्या अवस्थेत दिसत असल्यामुळे बोंडातील सरकी भरत नाही, अपरिपक्व अवस्थेत बोंडे फुटतात व पर्यायाने उत्पादनात घट होते.

 कोरडवाहू कपाशी मध्ये पाण्याचा ताण पडल्यामुळे पाने मलूल व नुसतेच पडलेली दिसून येतात तसेच पाने पिवळसर होतात. अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास शेतकरी बंधूंचा नेमका कोळी मुळे पिकास झालेला प्रादुर्भाव ओळखण्यात गोंधळ उडतो व काय करावे हे समजत नाही.म्हणून पिकाने नियमित सर्व क्षणांमध्ये करून नेमकी समस्या ओळखून वेळीच योग्य उपाय योजावेत.

नक्की वाचा:या २७ किटकनाशकांवर बंदी होणार का? केंद्राकडून या आठवड्यात होऊ शकतो निर्णय, शेतकऱ्यांना हा आहे उत्तम पर्याय

सद्यस्थितीत कोरडवाहू कपाशीला पाण्याचा ताण बसत असून जमिनीला भेगा पडल्या आहे. दिवसाचे वातावरण उष्ण व कोरडे असून असे हवामान या किडीसाठी पोषख आहे

1)  ठीपक्याची कोळी - आकाराने सूक्ष्म (0.3 ते 0.4 मीमी) असून भिंगाच्या साहाय्याने दिसतात ते हिरवट पिवळे ते केसरी रंगाचे असून पाठीवर दोन्ही बाजूने दोन काळे ठिपके दिसतात. नुकत्याच अंड्यातून निघालेल्या अळीला सहा पाय असतात तर प्रौढ व पिलांना आठ पाय असतात. या सर्वच अवस्था कपाशी पिकांना नुकसान कारक असून ते सोडेच्या साहाय्याने पानाच्या पेशींमधील रस शोषण करतात. हा कोळी जाळे विणतो व असे जाळे आपण प्रादुर्भावग्रस्त पानाच्या खालून पाहू शकतो हा कोळी सोयाबीन, भेंडी, भाजीपालावर्गीय पिके,कडधान्य, तेलबियावर सुद्धा आढळून येतो.

2) जीवनकाल :- प्रौढ कोळी हिवाळ्यात जिवंत सहन वर्षभर सक्रिय असतात. या किडीला पंख नसल्यामुळे तिचा प्रसार सरपटत चालून तसेच हवेद्वारे होतो. मादी अंडी पानाखाली घालते. एक मादीच्या 30 दिवसाच्या कार्यकाळात साधारणपणे 100 अंडी देते.

 त्यांच्या 5 अवस्था असतात( अंडी अळी पिल्ले )( प्रोटोनीम्फ वड्युटोनीम्फ व प्रौढ ) एक पिढी कमीत कमी चार ते पाच दिवसाची असू शकते. छोट्या व एकापाठोपाठ पिठ्या व जास्त अंडी देण्याची क्षमता असल्यामुळे या किडीचा उठेक होण्याची तसेच त्यांच्यामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होण्याची दाट शक्यता असते. किडींचा प्रादुर्भाव सर्वसाधारण पानाच्या देठा भोवती मुख्य शिरेच्या आजूबाजूला व पाने मुडपण्याच्या ठिकाणी एकवटला असतो.

3) लाल कोळी :- लाल रंगाचे कोळी सूक्ष्म असून ते जाळे विणतात. पिल्ले हिरवट रंगाचे असून शरीरावर गर्द ठिपके असतात. ते प्रामुख्याने पानाच्या खालच्या बाजूने उपजीविका करतात. प्रौढ अवस्था सर्वसाधारण 10 दिवसाची असते.भाजीपाला पिके व शोभेची झाडे यावर या किडीचा प्रादुर्भाव जास्त असतो.

4) पिवळे कोळी :- लाल कोळी पेक्षा सूक्ष्म, पिवळसर रंगाचे असून पाठीवर पांढुरक्या रेषा असतात.भिंगातून पाहिल्यास स्पष्ट दिसतात. हे कोळी जाळे विणत नाही. यांची वाढ चार ते पाच दिवसात पूर्ण होते.( 22.5° से.ते 27.0 से.) मादी सरासरी 5 ते 8 अंडी देते. हा कोळी पांढरी माशी च्या पायाला चिकटून इतरत्र पसरतो. किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने नवीन व कोवळ्या पानावर जास्त असतो. संपूर्ण वाढ झालेली अळी सुप्तावस्थेत( 3 ते 11 दिवस )जाते. व त्यानंतर प्रौढावस्थेत परावर्तित होते.

नक्की वाचा:कवठ वृक्ष आणि फळाचे अप्रतिम फायदे

एकीकृत व्यवस्थापन :

1) कापूस पिकाची योग्य पीक फेरपालट करावी.

2) कपाशीत चवळीचे आंतरपीक घ्यावे या वळी पिकावर कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे पोषण होईल.

3) वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहित ठेवावे त्यामुळे किडीच्या पर्यायी वाघ तिचा नाश होईल.

 शेताच्या बांधावरील कपाशीवरील कीडीच्या पर्यायी खापतये जसे उदा. अंबाडी, हॉलीहोंक, रानभेंडी इ. कावून नष्ट करावी. मृद परीक्षणाच्या आधारावर खत मात्रेचा अवलंब करून दोन ओळीतील बहिण आठातील अंतर योग्य तेच ठेवावे.

 आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा त्यामुळे कपाशीचे पीक टाकणार नाही. पर्यायाने अशा पिकावर किडीही कमी प्रमाणात राहतील.

4) वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त पाने जमा करून किडी सहित नष्ट  करावेत.

5) रस शोषक किडी वर उपजीविका करणारे नैसर्गिक कीटक उदा. सिरफिठ माशी, कालीन, बालकिडे, कायसोपाई संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक कोळी नाशकांचा वापर टाळावा.

6) कपाशीच्या अलीकडील काळात येणाऱ्या रस शोषक किडी चे ( मावा, तुडतुडे, फुलकिडे ) नियंत्रणासाठी शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा व बहुआयामी ( बॉडस्पेक्ट्रम ) कीटकनाशकांचा अवास्तव्य वापर केल्यास व एकापेक्षा जास्त कीटकनाशकाचे फवारणी मध्ये मिश्रण केल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.

7) लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास कपाशीवर कोळी या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास डायकोफॉल18.5 टक्के 54 मि.ली. किंवा स्पायरोमेसीफेन 22.9 टक्के 12 मि.ली. यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकांची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी|

English Summary: koli insect is very harmful nad dengerous in bt cotton crop
Published on: 08 April 2022, 11:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)