Agripedia

कोल्हापूर जिल्ह्यातील सोयबीन पिकावर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव होत आहे. महापुरात नदीकाठच्या शेतीतील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना महापुरापासून सोयाबीन आता तांबेऱ्यामुळे अडचणीत आला आहे. ऊस, भाजीपाला आणि सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे.

Updated on 18 September, 2021 12:52 PM IST

कोल्हापूर जिल्ह्यातील सोयबीन पिकावर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव होत आहे. महापुरात नदीकाठच्या शेतीतील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना महापुरापासून सोयाबीन आता तांबेऱ्यामुळे अडचणीत आला आहे. ऊस, भाजीपाला आणि सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे.

दोन महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरात नदीकाठावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचा सोयाबीनला फटका बसला. महापुरात झालेल्या पिकाच्या नुकसानीतून शेतकरी अद्याप बाहेर पडला नसताना पुन्हा सोयाबीनवरील तांबेऱ्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या अनेक भागातील सोयाबीन पक्कतेच्या अवस्थेत आहे. काही भागातील सोयाबीन पक्कव होण्याच्या अवस्थेत आहे. अपक्कतेच्या अवस्थेतील सोयाबीनला तांबेऱ्याचा काही प्रमाणात फटका बसणार आहे.

हेही वाचा : सोयाबीन पिकावरील रोगांची ओळख व त्यांचे व्यवस्थापन

उत्पादन घटून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. जून दरम्यान सोयाबीनची पेरणी केली. या नंतर पक्कतेत बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी चार-चार वेळा औषधांच्या फवारण्या कराव्या लागल्या. चांगला दर असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. काही सोयाबीन महापुरात गेला, तर काही सोयाबीनवर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या तांबेरा रोगावर नियंत्रण करावी याची माहिती घेऊ...

हा रोग बुरशीजन्य असून या रोगांमुळे सुरुवातीला झाडाच्या पानाची खालची बाजू पिवळसर तांबूस ठिपक्यांनी दिसते व नंतर हेच ठिपके पानाच्या वरच्या बाजूवर आल्याचे दिसते. हा रोग हवेमार्फत पसरतो आणि काहीच अवधीमध्ये त्या परिसरातील सर्व पिकावर पसरतो.

- रोगाची तीव्रता जास्त असल्यास ही बुरशी पानाच्या देठावर पसरते त्यामुळे मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन शेंगा पोचट व दाणे चपटे राहतात, आणि उत्पादनात ५० ते ८० टक्क्यांपर्यंतची लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते.

 

व्यवस्थापन:-

- या रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिबंधक जातीची लागवड हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे. उदा, फुले कल्याणी (डी. एस.२२८), फुले अग्रणी (के.डी. एस.३४४) व फुले संगम(के.डी. एस.७२६)

- प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी लवकर म्हणजे १५-२५ मे च्या दरम्यान करावी. त्यामुळे तांबेरा रोग येण्याच्या आधी पिक परिपक्व होऊन येणाऱ्या रोगापासून बचाव होतो.

- रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोपीकोण्याझोल २५% प्रवाही १० मिली. किंवा हेक्झाकोण्याझोल ५ % प्रवाही १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे एक नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. देशातील या पिकाखालील असलेल्या क्षेत्रापैकी जवळपास ३५ टक्के क्षेत्र हे एकट्या महाराष्ट्राच आहे. सोयाबीनमध्ये १८-२० टक्के तेलाचे आणि ३८-४० टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे. जनावरांसाठी तसेच कुक्कुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो. आंतरपीक, दुबारपीक तसेच पीक फेरपालटीमध्ये सोयाबीन अतिशय महत्वाचे पीक आहे.

English Summary: Kolhapur soybean infestation, how to control the disease
Published on: 18 September 2021, 12:48 IST