Agripedia

कापूस पिक लागवड करून आता ७५-८० दिवस पूर्ण होत आहे,

Updated on 14 September, 2022 8:17 PM IST

कापूस पिक लागवड करून आता ७५-८० दिवस पूर्ण होत आहे, अशा परिस्थितीत कापूस पिक बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे, परंतु सतत पाऊस सुरू आहे, काही भागा मद्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे त्यामुळे कापूस पिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.लाल्या रोग -विकृती लक्षणे व कारणे - अमेरिकन Bt कापसामध्ये जास्त प्रमाणात अढळून येते, नत्राच्या कमतरते मुळे सुरवातीला पाने पिवळी पडतात व नंतर लाल होतात, 

हलकी जमीन असेल तर अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाहीत व पाने पिवळी पडून लाल होतात,If the soil is light, nutrients are not available and the leaves turn yellow and turn red.बोंडे लागण्याच्या अवस्थेत कमाल व किमान तापमान यात कमी फरक असल्यास, बोंडे लागणे व परिपक्व होणे लवकर होते.

हे ही वाचा - व्यसनाकडे वळलेली युवापिढी महासत्तेचे स्वप्न भंग करणार!

त्यामुळे अन्नद्रव्ये त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत व त्यामुळे अन्नद्रव्ये कमतरता जाणवते व झाड लाल होते व वाढ खुंटते,शिफाशींनुसार खत मात्र न दिल्यास व अन्नद्रव्य व्यवस्थापन न केल्यास कपाशी लाल होते

रस शोषक किडींच्या जास्त प्रमाणात झालेल्या प्रादुर्भावामुळे सुध्दा कपाशीचे पाने लाल होतातपाणी जास्त व कमी झाल्यास सुध्दा कपाशी लाल होते उपाय - एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे # खत देणे सूक्ष्म अन्नद्रव्ये कमतरता असल्यास ३० gm प्रती पंप सूक्ष्म अन्नद्रव्ये याप्रमाणे फवारणी करावी दुसरा डोस देताना magnesium sulfate चा एकरी १० किलो याप्रमाणे खातासोबत वापर करणेशेतात पाणी साचून राहिल्यास पाणी काढून देणे व गरज असल्यास जमीन उलनार / फाटणार नाही म्हणून पाणी देणे

वाढीच्या अवस्थेत २ टक्के युरिया व त्यानंतर बोंडे लागण्याच्या अवस्थेत २ टक्के DAP ची फवारणी करावी तसेच magnesium sulfate ची १ टक्के याप्रमाणे फवारणी करावी तसेच आपण Amino acid चा सुद्धा वापर करू शकता तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये ३० gm प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावी रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी अंतर प्रवाही कीटकनाशक फवारणी करावी तसेच चिकट सापळे लावावे ( एकरी २०-२५ ) फवारणी मध्ये

Spinosad-45 SC 165-200gm/ha किंवाThailocoprid-21.7SC 100-120 gm/ha किंवाDiafenthiuron-50 WP-600 gm/ha किंवाDinotefuron-25 SG 125-150 gm/ha किंवाChlorantraniliprol 9.30%+ Lmbdacyhalothrin 5% ZC किंवाFlubendiamide 19.92% + Thoacloprid 19.92%w/w बोंड सड - जास्त प्रमाणात पाऊस झाला की सुरवातीच्या काळात लागलेली बोंडे सड होताना

दिसते, त्यासाठी पिकात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी तसेच असे दिसून आल्यास Copper Oxychloride ३० gm प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावी याप्रमाणे सद्यस्थितीला कापूस पिक व्यवस्थापन करणे आवश्यक, वरीप्रमाणेच कोणतेही लक्षणे दिसल्यास लगेच उपययोजना कराव्यात जेणेकरून नुकसान होणार नाही.

 

Dr Anant Ingle

Ph.D. Genetics and Plant Breeding MPKV Rahuri

Vidarbha Agriculture Development Foundation

English Summary: Know the identification and management of blight and bond rot in cotton
Published on: 14 September 2022, 04:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)