काहीं दिवसापासून वातावरणात खुप बदल झाला आहे पाऊस प्रमाण कमी झालं असलं तरी धुक्याच प्रमाण वाढण्याची शक्यता आहे!!सकाळी धुकं आणि दिवसभर कडक ऊन यामुळे वेगवेगळ्या पिकावर परिणाम होतं आहे.सकाळी पिकाच्या पानावर दवं बिंदू साठल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे या वातावरणात बुरशी चे बिजाणू लवकर वाढतात
त्यामुळे वेगवेगळ्या बुरशी रोगाचा प्रादुर्भाव पिकावर होतं आहे!! जसे ब्लाईट,दहिया, डाउनी मिल्ड्यू , एन्थ्रेक्नोज यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे!Disease outbreaks like Downy Mildew, Anthracnose are on the rise!अधिक थंडी मुळे पिकाची वाढ थांबते व फळ फुलांची गळ होते!मित्र किडिंची संख्या पण कमी होते धुकं जास्त वेळ राहिल्या मुळे पिकाची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते त्याचा परिणाम उत्पादन वर होतो!!पिक स्ट्रेस मध्ये जाते!!
अशा वेळी आपण काय काळजी घ्यायला हवी ?पूर्ण धुकं हाटेपर्यंत कीटकनाशक फवारणी करता येत नाही.बुरशीच्या प्रादुर्भाव पाहून बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी!शेताजवळ, बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा, कोरडे तण, सुकलेले लाकूड आदी हवेच्या प्रवाहाच्या उलट दिशेला पेटवून धूर करावा. त्यात दगडी कोळसा टाकून धूर व उष्णता रात्रभर राहील असे पाहावे.
पिकास थोडे पाणी द्यावे. शेतात पाणी सोडल्याने तापमान ०.५ ते २ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते. ज्या दिवशी धुके पडण्याची शक्यता असेल त्या दिवशी पाण्यात विरघळणाऱ्या गंधक पावडरीची (८० टक्के) ४० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी...धुक्याचा प्रभाव कमी करण्यासाठी दरवर्षी शेतात अल्प प्रमाणात वाळू मिसळावी. किंवा शिंपडून टाकावीत स्युडोमोनस फ्लुरोसन्स एक किलो प्रति एकर प्रमाणात फवारावे..
Published on: 02 September 2022, 04:09 IST