Agripedia

शेतकरी बंधूंनो मागील भागात आपण एससी व इसी(SC/EC) यातील फरक जाणून घेतला.

Updated on 21 July, 2022 4:22 PM IST

शेतकरी बंधूंनो मागील भागात आपण एससी व इसी(SC/EC) यातील फरक जाणून घेतला. आज आपण डब्ल्यू.डब्ल्यू./डब्ल्यू.एस. जी./डी.पी(WW/WSG/DP) या प्रकारच्या पावडर किंवा दाणेदार स्वरूपातील किटकनाशकांची माहिती घेऊ.१) डब्ल्यू.डब्ल्यू(WW) या प्रकारची कीटकनाशके बाजारात मिळतात. यामध्ये (ऍसिफेट,बाविस्टीन) असे अनेक प्रकार आहेत. ही कीटकनाशके बनविताना सूक्ष्म पीओपी किंवा न्यूट्रल/निष्क्रिय चुना किंवा टाल्कम पावडर वापरली जाते.या प्रकारची औषधे तयार करताना वरील चुना किंवा पीओपी हे वाहक द्रव्य म्हणून (कॅरियर मटरेल)

वापरतात.यावर मूळ औषधातील रासायनिक द्रव्य एकत्र करून हे कीटकनाशक तयार केले जाते. आपण पाण्यात एकत्र केल्यानंतर त्यातील मुळ रासायनिक द्रव्य पाण्यात सोल्यूबल/ विद्राव्य होते व आपणास योग्य तो परिणाम मिळतो. या कीटकनाशक प्रकारात वाहक किंवा कॅरियर मटेरियल चे प्रमाण कमी प्रमाणात असते.२) डब्ल्यू.एस.जी (WSG) (वाटर सोल्युबल ग्रॅन्युल्स) ही औषधे तयार करताना,त्याचे ग्राइंडिंग (बारीक कण) करताना त्याचे कण ड्रिप किंवा स्प्रे पंप यांच्या नोझल मधून पास होतील या प्रकारे ग्राइंडर केलेली असतात.उदाहरणार्थ, सल्फर गंधक हे WSG या स्वरूपात असते.

ते ड्रिप मधून किंवा स्प्रे पंप मधून जाण्यास किंवा स्प्रे करण्यात अडचणीचे ठरतात. त्यामुळे अशा प्रकारची कीटकनाशके वापरतांना फडक्याने वस्त्र गाळ किंवा गाळून घ्यावी व ती स्प्रे पंपामध्ये किंवा ड्रीप सिस्टीम सोडावी त्यामुळे आपले होणारे नुकसान टळते व आपणास कीटकनाशकाचे अपेक्षित परिणाम मिळतात.3) एस.जी.(SG) (सोल्युबल ग्रॅन्युल्स)ही कीटकनाशके तयार करताना योग्य प्रमाणात स्टार्च व पीओपी यांचे मिश्रण कीटकनाशक टाकून नूडल्स/ शेवाया तयार केल्या जातात.त्या पाण्यात टाकल्या असता विरघळतात.उदाहरणार्थ -एक्टारा.

४) डी.पी.(DP) (डस्टिंग पावडर) ही कीटकनाशके तयार करताना कॅरियर किंवा वाहक मटेरियल जास्त प्रमाणात वापरतात. कारण ही कीटकनाशके कोरड्या स्वरूपात डस्टर द्वारे पिकावर धुरळणी केली जातात.यामुळे ही कीटकनाशके पाण्यात द्रावण शील असत नाही. यासाठी यांचा फवारणीसाठी उपयोग करू नये.उदाहरणार्थ -फेनवलरेट ५ टक्के पावडर.बाजारात काही पावडर युक्त कीटकनाशकांमध्ये सूक्ष्म सिलिका अर्थात सिलिकॉन वापरले जाते. त्यामुळे त्या कीटकनाशकांचा चांगल्या प्रकारे परिणाम मिळतो,त्यामुळे बाजारात पावडर युक्त कीटकनाशके घेताना ती उपलब्ध असल्यास सिलिकॉन युक्त कीटकनाशके घ्यावी.त्यामुळे पिकास अतिरिक्त सिलिकॉन मिळून पीके सशक्त होतात व कीटकनाशकाचे अपेक्षित परिणाम मिळतात. उदाहरणार्थ -लान्सर गोल्ड.

 

प्रा.दिलीप शिंदे सर

9822308252

English Summary: Know the difference between WW/WSG/DP/SG medicines
Published on: 21 July 2022, 04:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)