Agripedia

सध्या गहू उत्पादनामध्ये आपण स्वयंपूर्ण बनलो आहोत व राखीव साठेसुद्धा ओसंडून वाहत आहेत.

Updated on 03 November, 2022 3:58 PM IST

सध्या गहू उत्पादनामध्ये आपण स्वयंपूर्ण बनलो आहोत व राखीव साठेसुद्धा ओसंडून वाहत आहेत. तेव्हा, आता आरोग्यासाठी परिपूर्ण पोषणतत्त्वे असणार्‍या जुन्या जातीकडे सर्वांचे लक्ष जात आहे.खपली गव्हाखाली सध्या मर्यादित क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर व सातारा जिल्ह्यांत तसेच दक्षिण महाराष्ट्राला लागून असणार्‍या कर्नाटकाच्या धारवाड, बेळगाव, विजापूर व गुलबर्गा जिल्ह्यांमध्ये याची लागवड केली जाते. त्याचप्रमाणे गुजरातमधील सौराष्ट्र, तामिळनाडू आणि

तेलंगणामध्ये अत्यंत मोजक्या ठिकाणी खपलीची लागवड केली जाते.Shellfish is cultivated in very few places in Telangana. महाराष्ट्रात खपली म्हणून ओळखला जाणारा हा गहू

रब्बी ज्वारीची लागवड करा या सुधारित पद्धतीनेच

गुजरातेत ‘पोपटिया’ तर कर्नाटकात ‘सांबा’ म्हणून ओळखला जातो. काहीजण याचा ‘जोडगहू’ असाही उल्लेख करतात. खपली गव्हाखाली भारतात अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्र आहे. यातील बहुसंख्य खपली ही स्थानिक स्वरूपात खाण्यासाठी वापरली जाते. बाजारपेठेमध्ये गव्हाच्या किमतीच्या तुलनेत खपलीस पन्नास टक्के अधिक दर मिळतो.खपली गव्हाचे वैशिष्ट्य म्हणजे तो काढणीनंतरही

टणक अशा टरफलात असतो. बियाणे म्हणूनही तो टरफलासहित वापरला जातो. जेव्हा खपली गव्हाचा खाण्यासाठी उपयोग करायचा असेल तेव्हा तो गिरणीत नेऊन भरडावा लागतो. यातील गहू तांबड्या रंगाचा व लांबसडक असतो. एक क्विंटल खपलीपासून सत्तर किलो गहू निघतो. या गव्हाच्या पिठापासून आपण चपात्या, रोटी बनवू शकतो. या चपात्या चवीला इतर सरबती वाणापेक्षा गोडसर असतात. त्याचप्रमाणे हा गहू ओलावून, जाड भरडून, गूळ घालून खीर करता येते, जी अतिशय पौष्टिक असते. तिलाच काही भागांत ‘लापशी’

म्हणतात. पूर्वी ग्रामीण भागामध्ये ग्रामदेवतेच्या नैवेद्यासाठी (भंडारा) घराघरांतून खपली गहू गोळा केला जायचा. त्याचप्रमाणे शेवया, कुरडया, बोटुकली इत्यादी पदार्थ यापासून बनवले जातात. तेलंगणामध्ये काही धार्मिक कार्यक्रमांमध्ये खपली गव्हापासून बनविलेले पदार्थच आवश्यक असतात. समाजामध्ये खिचडी खिर बनविण्यासाठी खपलीचा वापर केला जातो. खपलीचा उत्कृष्ट प्रतीचा रवा बनतो. शिरा, उपमा यांसारख्या भारतीय पदार्थांत याचा उपयोग केला जातो. तसेच चांगल्या प्रतीचा पास्ता व इतर उपपदार्थांसाठी याचा वापर सर्वोत्तम ठरतो. सरबती गव्हापेक्षा हा पास्ता यामधील असणार्‍या गुणामुळे उच्च प्रतीचा असतो. त्याची किंमतही जास्त असते.

English Summary: Know the benefits, importance, demand, special aspects of Khapali wheat
Published on: 02 November 2022, 08:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)