Agripedia

शेतकरी मित्रांनो कपाशीचे पीक त्याच्या विविध वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्य शोषण कसे करते या संदर्भात एक पोस्ट आपण यापूर्वी पाहिली.

Updated on 28 June, 2022 8:34 PM IST

शेतकरी मित्रांनो कपाशीचे पीक त्याच्या विविध वाढीच्या अवस्थेत अन्नद्रव्य शोषण कसे करते या संदर्भात एक पोस्ट आपण यापूर्वी पाहिली. सर्वसाधारणपणे आपण पाहिले की कापूस पिकाला 45 दिवसानंतर ते 100 /110 दिवस मोठ्या प्रमाणावर नत्र,स्फुरद,पालाश व इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कशी व किती भासते हे आपण दिलेल्या तक्त्याप्रमाणे पाहिले.यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे कीप्रा.दिलीप शिंदे सर आपणास यापूर्वीच्या पोस्टमध्ये

सांगितले आहे की कापसाच्या लागवडीच्या अगोदर किंवा कापसाच्या लागवडीबरोबर बेसल डोस टाकला गेला गेलाच पाहिजे. याचे कारण असे की नत्र वगळता स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांना पिकाला उपलब्ध होण्याचा कालावधी ही खते जमिनीवर टाकल्या पासून सर्वसाधारणपणे 40 दिवसापासून ते 75 दिवसापर्यंत आहे.आणि हे प्रमाण सुध्दा जमिनीच्या गुणवत्तेवर,सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.

त्याच प्रमाणे पालाश या अन्नद्रव्याची गरज सुद्धा 60 दिवसापासून पुढे आहे. त्यामुळे बेसल डोस कापूस लागवडी अगोदर किंवा त्या बरोबर देणे अत्यावश्यकच आहे.बेसल डोस दिल्यामूळे आपण दिलेली अन्नद्रव्ये कापूस पिकाला त्याचे गरजेच्या वेळी योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे कापसाचे उत्पन्न चांगल्या प्रकारे येते व कमी रासायनिक खतांमध्ये आपल्याला भरघोस उत्पन्न घेता येते.

बेसल डोस दिल्यामूळे आपण दिलेली अन्नद्रव्ये कापूस पिकाला त्याचे गरजेच्या वेळी योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे कापसाचे उत्पन्न चांगल्या प्रकारे येते व कमी रासायनिक खतांमध्ये आपल्याला भरघोस उत्पन्न घेता येते.यासाठी मी प्रा दिलीप शिंदे सर यांनी शेतकऱ्यांना बेसल डोस साठी आग्रह केलेला आहे की यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ होईल.वरील नत्र, स्फुरद, पालाश या अन्नद्रव्यांच्या पिकाला उपलब्धतेच्या दिवसांना शास्त्रीय आधार आहे.

 

प्रा. दिलीप शिंदे सर

9822308252

English Summary: Know the basal dose and importance of cotton crop
Published on: 28 June 2022, 08:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)