Agripedia

भारत देशातील वाढती लोकसंख्या शहरीकरण, उंचावलेले राहणीमान इत्यादी

Updated on 21 October, 2022 8:04 PM IST

भारत देशातील वाढती लोकसंख्या शहरीकरण, उंचावलेले राहणीमान इत्यादी कारणामुळे दुध, अंडी, मांस इत्यादी बाबींची गरज ही सतत वाढत राहणारी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये पशुपालन व दुग्धव्यवसाय हा अधिक उत्पादन, आर्थिक स्थैर्य देणारा शेतीपूरक जोडधंदा म्हणून नावारुपाला येत आहे.समतोल आहारासाठी महत्वाचे आहे. एका पूर्ण वाढ झालेल्या जनावराला १२ ते १३ किलो एकदल हिरवा

चाऱ्याची ८ ते ९ गुंठे क्षेत्रावर रब्बी हंगामात ज्वारी, मका, ओट, संकरीत नेपियरची लागवड करावी.Sorghum, Maize, Oats, Hybrid Napier should be planted in Rabi season. तसेच तेवढाच द्विदल हिरवा चारा उत्पादनासाठी लसुनघास, बरसीम (घोडाघास) इत्यादी ४ गुंठे क्षेत्रावर पेरणी करावी.ज्वारी : ज्वारी हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असे महत्त्वाचे पारंपारिक चारा पीक आहे. अवर्षणप्रवण भागात व हलक्या जमिनीत देखील तग धरुन राहण्याची क्षमता असल्याने निश्चित चारा उत्पादन देणारे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते.

ज्वारीचा कडबा देखील जनावरांना खाद्य म्हणून देता येतो. ज्वारीचे चाऱ्याकरिता विकसित केलेले वाण सुमारे ३-४ मीटर उंच वाढतात. त्याची ताटे हिरवीगार, पालेदार, रसाळ, रुचकर, पौष्टिक असल्यामुळे जनावरे ती आवडीने खातात. ज्वारीच्या चाऱ्यात ८ ते १० टक्के प्रथिने असतात. या चारा पिकांसाठी मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन लागते. पूर्वमशागतीच्या वेळी हेक्टरी ५ टन भरखत म्हणून शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.

रब्बी हंगामात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पेरणी करावी. पेरणीसाठी रुचिरा, फुले अमृता, मालदांडी ३५-१, फुले गोधन या जातींची ३० सेंमी अंतरावर पाभरीने पेरणी करावी. पेरणीपुर्वी प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक चोळावे. पेरणीसाठी हेक्टरी ४० किलो बियाणे लागते.हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ४० किलो पालाश द्यावे त्यापैकी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश पेरणीच्यावेळी व उर्वरित

५० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावेपिकाची वाढ झपाट्याने होत असल्याने सुरुवातीला पहिली खुरपणी लवकर करुन शेत तणविरहीत ठेवावे.१० ते १२ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात अधिक माहितीसाठी संपर्क : ०२४२६-२४३२४९

 

प्रा. प्रसन्नकुमार सुराणा, डॉ.संदिप लांडगे आणि डॉ. विजयकुमार शिंदे

अखिल भारतीय समन्वीत चारा पिके संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी

English Summary: Know profitable cultivation of fodder crops in rabi season
Published on: 21 October 2022, 08:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)