गारबेज एझाईम हे टॉनिक म्हणून काम करते पिकांवर तसेच त्याच्या उग्र वासामुळे कीटक शेतात येत नाहीत. गार्बेज एंजाइम कसे बनवायचे त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊ.साहित्य:-१५० - २०० लिटर प्लास्टिक टाकी, १०० लिटर पाणी, १० किलो काळा गुळ व ३० किलो फळे व भाजीपाला.पद्धती ३० किलो फळे व भाजीपाला बारीक करुन १० गुळ बारीक करुन सर्व एका ड्रम मध्ये टाकावे. त्यामध्ये १०० लिटर पाणी टाकावे. झाकण लावून सावलीत ठेवा. दर ५ दिवसांनी ढवळावे. ९० दिवसांनी हे तयार होते.९० दिवसांनी गाळून घ्यावे. त्याच्यातला चौथा शेतात टाकावा. गाळलेले गारबेज एंझाईम सावलीत ठेवावे.संपेपर्यंत वापरू शकतात.याच्यात सर्वप्रकारची फळे भाज्या जी उपलब्ध असतील ती वापरु शकतात. लसुण, मिरच्या, कडुलिंबपाला, लिंबोळया, विविध वनस्पति, गव्हांकुर ई चा वापर करावा
प्रमाण:-१५ लि पाणी + ६० ते ९० मीली गारबेज एंझाईम फवारणीसाठी.५ लि गारबेज एंझाईम + २०० लि. पाणी ड्रिचींगसाठी.१ लि पाणी + १५० मिली गारबेज एंझाईम बियाणे प्रक्रियासाठी.मिलीबगसाठी गारबेज एंझाईम १.५ ते २ लिटर + २०० लिटर पाणी टाकून फवारणी करावी.सर्वप्रकारच्या पिकांवर फवारणी व जमीनीवर ड्रिचींग करावी.गारबेज एंझाईम हे संजीवक, बुरशीनाशक, किटनाशक म्हणून काम करते.विविध अमिनो आम्ले, पोषक द्रव्य, अन्नद्रव्य असतात.पिकात प्रतिकार क्षमता वाढवते.गारबेज पिकात प्रतिकारक्षमता निर्माण करते,जमिनीत दिल्यास त्यातील साखर जिवाणू घेवुन जास्त कार्यक्षम पणे पिकाला हवे ते घटक उपलब्ध करुन देतात.
गार्बेज एंजाइम कसे बनवायचे त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊ.साहित्य:-१५० - २०० लिटर प्लास्टिक टाकी, १०० लिटर पाणी, १० किलो काळा गुळ व ३० किलो फळे व भाजीपाला.पद्धती ३० किलो फळे व भाजीपाला बारीक करुन १० गुळ बारीक करुन सर्व एका ड्रम मध्ये टाकावे. त्यामध्ये १०० लिटर पाणी टाकावे. झाकण लावून सावलीत ठेवा. दर ५ दिवसांनी ढवळावे. ९० दिवसांनी हे तयार होते.९० दिवसांनी गाळून घ्यावे. त्याच्यातला चौथा शेतात टाकावा. गाळलेले गारबेज एंझाईम सावलीत ठेवावे.संपेपर्यंत वापरू शकतात.याच्यात सर्वप्रकारची फळे भाज्या जी उपलब्ध असतील ती वापरु शकतात.
सर्वप्रकारच्या पिकांवर फवारणी व जमीनीवर ड्रिचींग करावी.गारबेज एंझाईम हे संजीवक, बुरशीनाशक, किटनाशक म्हणून काम करते.विविध अमिनो आम्ले, पोषक द्रव्य, अन्नद्रव्य असतात.पिकात प्रतिकार क्षमता वाढवते.गारबेज पिकात प्रतिकारक्षमता निर्माण करते,जमिनीत दिल्यास त्यातील साखर जिवाणू घेवुन जास्त कार्यक्षम पणे पिकाला हवे ते घटक उपलब्ध करुन देतात.पिकावर फवारणी केल्यावर किड पळ काढतात हरीण जंगली प्राणी यांच्या वासाने पिक खात नाही असा अनुभव आहे.
जैविक शेतीकरी
शरद केशवराव बोंडे
Published on: 07 June 2022, 08:02 IST