Agripedia

पिकांचा सर्वांगीण वाढीकरिता प्रमुख अन्नद्रव्य आवश्यक असतात त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात तर आपण पाहुयात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्व आणि कार्य.

Updated on 29 September, 2021 4:21 PM IST

सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्ये:-सूक्ष्म पीक पोषक अन्नद्रव्यांची कार्ये जरी वेगवेगळी असली तरी ती एकमेकास पूरक आहेत. त्यांचे वनस्पतींच्या जैव रासायनिक क्रियेत महत्त्वाचे कार्य असते. त्यांचे प्रमुख कार्य ढोबळ मानाने खालील प्रमाणे आहे.

 १. लोह:-हिरव्या पानातील हरितद्रव्याचा लोह हा जरी घटक नसला तरी अप्रत्यक्षरित्या या द्रव्याची निर्मिती आणि प्रकाश संश्लेषन क्रिया वृध्दिंगत करण्यासाठी लोह उपयुक्त ठरते. वनस्पतींच्या जीवनात ज्या विविध जैव-रासायनिक क्रिया चालू असतात त्यांना विकारांची आवश्यकता असते. या विकारांच्या क्रियेत लोहाचा प्रामुख्याने उत्प्रेरक म्हणून सहभाग असतो. लोहामुळे प्रथिनांच्यानिर्मिती कार्यासदेखील चालना मिळते. या अद्रव्याचे वहन अगदीच कमी असल्यामुळे हे अन्नद्रव्य मुळांपासून इतर अवयवात पोहचण्यास खूपच विलंब लागतो.

त्यामुळे लोहाच्या कमतरतेची लक्षणे प्रथम कोवळ्या पानांवर आणि पिकांच्या वाढ-बिंदुंवर दिसू लागतात. या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे

 २ मंगल:-मंगल पानातील हरितद्रव्याचे घटकद्रव्य आहे आणि म्हणून प्रकाश संश्लेषन क्रियेवर या अन्नद्रव्याचा परिणाम होतो. बटाट्यामध्ये भुरकट चट्टे ( स्टॅब) दिसतात.

३ जस्त:-पिकांच्या जीवनक्रमात ज्या अनेक विविध जैव-रासायनिक क्रिया चालू असतात. त्यामध्ये जस्ताला फार महत्त्व आहे. विकरांचे कार्य, वनस्पती वर्धकांची तसेच संप्रेरकांची निर्मिती आणि प्रथिनेयुक्त पदार्थ निर्माण कार्य यांमध्ये जस्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

४ तांबे:-वनस्पतींच्या वाढीसाठी ज्या अनेक जैव-रासायनिक क्रिया चालू असतात त्यांना विकारांची आवश्यकता असते. अशा अनेक विकरांचा तांबे हा एक मुख्य घटक आहे. अशा क्रिया तांब्याच्या पुरवठ्या मुळे वृध्दिंगत होतात विशेषकरून प्रथिनांची तसेच "अ' जीवनसत्वाची असतो. पिकांच्या श्वासोच्छवासाच्या क्रियेत तांबे नियंत्रकाचे कार्य बजावते.

 ५ बोरॉन:-वनस्पतींची वाढ, फुलोरा आणि फळधारणा या क्रियांसाठी विविध जैविक पदार्थाची गरज असते आणि अशा पदार्थांच्या निर्मिती कार्यास बोरॉनमुळे चालना मिळते. पिष्टमय पदार्थांची निर्मिती, त्यांचे चयापचय आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्याठिकाणी वाहून नेण्याच्या कार्यात बोरॉन उपयुक्त ठरते. व्दिदल वर्गातील पिकांत प्रथिनांचे प्रमाण तसेच गळित धान्यांमध्ये तेलांचे प्रमाण बोरॉनमुळे वाढते. नत्र स्थिरीकरण क्रियेत बोरॉन उपयुक्त ठरते असे दिसून येते.

 ६. मॉलिब्डेनम:-या अन्नद्रव्यामुळे नायट्रेट नत्राचे रूपांतर प्रथिनांमध्ये होण्यास मदत होते. व्दिदल वनस्पतीत जैविक पध्दतीने नत्र स्थिरीकरण कार्यास या द्रव्यामुळे चालना मिळते. म्हणून या अन्नद्रव्याच्या पुरेशा पुरवठ्यामुळे नत्र - स्थिरीकरण तसेच प्रथिनांची निर्मिती वाढते.

 ७. क्लोरीन :प्रकाश संश्लेषन क्रियेत क्लोरीनचा सहभाग असतो. असे अलीकडेच दिसून आले आहे.

८. निकेल :-निकेल हा युरीऐज विकाराचा प्रमुख्य घटक असून वनस्पतींच्य पानामध्ये नत्राचे चयापचय होताना युरिया या विषारी पदार्थाचे संचयन होण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी निकेलचा उपयोग होतो. निकेल हा कडधान्य पिकाच्या पुर्नउत्पादित वाढीच्या अवस्थेत नत्राचे चयापचय क्रियेत सहभागी होतो. त्यामुळे युरियाचा संचयनास आळा बसून बिजांच्या निर्मितीस सहायभुत होतो. जर जमिनीमध्ये उपलब्ध निकेलचे प्रमाण जास्त असले तर जस्त व लोहाचे वनस्पतीमार्फत शोषणावर परिणाम कमी होतो. 

संकलन - IPM school ,team

 

English Summary: know about the important works of micronutrient
Published on: 29 September 2021, 04:21 IST