Agripedia

जमिनीखाली पिकांच्या मुळांच्या सहवासात थेंबा-थेंबाद्वारे सिंचन करण्याच्या पद्धतीला भूपृष्ठांतर्गत (सबसरफेस) ठिबक सिंचन असे म्हणतात.

Updated on 02 March, 2022 12:41 PM IST

जमिनीखाली पिकांच्या मुळांच्या सहवासात थेंबा-थेंबाद्वारे सिंचन करण्याच्या पद्धतीला भूपृष्ठांतर्गत (सबसरफेस) ठिबक सिंचन असे म्हणतात. या पद्धतीतील घटक भूपृष्ठावरील ठिबक सिंचन पद्धतीप्रमाणे असून, इनलाईन इमिटिंग पाइप्स जमिनीखाली 10-15 सें.मी. खोलीपर्यंत घालून सर्व ठिकाणी सारख्या प्रवाहाने पाणी दिले जाते. 

भूपृष्ठांतर्गत (सबसरफेस) ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे 

- जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी होते. पाणी वापर क्षमता वाढते आणि पाण्यात बचत होते. 

- जमिनीचा पृष्ठभाग कोरडा राहिल्याने तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. 

- इनलाईन इमिटिंग पाइप जमिनीत ठराविक खोलीवर (10 ते 15 सें.मी.) घातली असल्याने यांत्रिक पद्धतीने तोडणी करताना अडचण येत नाही. 

- मुळांजवळ गरजेएवढा ओलावा ठेवता येत असल्याने अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. 

इमिटिंग पाइप्सवरील ड्रीपरमधील अंतर व प्रवाह -

- जमिनीच्या प्रकारानुसार ड्रीपर्समधील अंतर ठेवल्यास पाण्याचे उभे-आडवे प्रसरण योग्य प्रमाणात होऊन

पिकास सर्वत्र समान प्रमाणात पाणी मिळते व पिकाची वाढ जोमदारपणे होते. 

- हलक्‍या वालुकामय जमिनीसाठी दोन ड्रीपर्समधील अंतर 30 सें.मी. असावे. तर मध्यम खोलीच्या जमिनीसाठी 40 सें.मी. आणि जास्त खोलीच्या चिकणमातीच्या जमिनीसाठी 50 ते 60 सें.मी. असावे. 

- ड्रीपरचा प्रवाह जमिनीत पाण्याचे होणारे प्रसरण, तसेच उसाच्या मुळांच्या व्याप्तीवर अवलंबून असते. साधारणपणे 2.5 लिटर प्रति तास प्रवाह देणाऱ्या ड्रीपर्सचा वापर करणे फायदेशीर ठरते. 

सबसरफेस ठिबक उभारणी करताना खालील काळजी घ्यावी.

- इमिटिंग पाइप्सच्या टोकांना एंड कॅप लावण्याऐवजी सर्व टोके कलेक्‍टर पाइपला जोडावीत व त्याची चरामध्ये उभारणी करावी.  

- सबमेनच्या खोलीपेक्षा कलेक्टर पाईपची खोली थोडी जास्त असू द्यावी व सबमेनपासून कलेक्टर पाईपपर्यंत थोडा उतार असू द्यावा.

- सबमेन व कलेक्टर पाइपमधिल हवा निघून जाण्यासाठी एअर व्हॉल्व्ह बसवावेत.

- सबमेन फ्लश करण्यासाठी फ्लश व्हॉल्व्ह बसवावेत.

- दाब जाणून घेण्यासाठी सबमेनवर दाबमापकाचा अवलंब करावा.

शेतकरी हितार्थ

English Summary: Know about subsurface drip irrigation
Published on: 02 March 2022, 12:41 IST