आज काळाला गरज आहे माती मधल्या कर्बाच्या नियोजनाची पण शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांचे सेंद्रिय कर्बाबाबत अनुभव घेताना,एक गोष्ट जाणवली कि,अगदी मोजक्याच शेतकऱ्यांना सेंद्रिय कर्बाचे महत्व माहीत आहे.बाकीच्यांना कर्बाच देणं घेणं नाही व बद्दल माहिती नाही.परंतु बऱ्याचदाअपुऱ्या माहितीतून सेंद्रिय कर्बाचे महत्व माहीत होते मग आपन शेतीकडे वळतो.शेती भावनिक दृष्टीकोन ठेवून जर केली त्यामध्ये काहीच वेगळेपण नाही, पण आपल्या साठी शेती बद्दल व कर्बा बद्दल अपुरी माहिती तोट्याची होऊ शकते.आपल्याला शेती करताना सर्वात महत्त्वाचा घटक सेंद्रिय कर्ब म्हणजे काय ? आणि सेंद्रीय कर्ब इतके महत्वाचे का आहे ?हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
आपल्या अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सेंद्रिय कर्ब म्हणजे मातीतील कुजलेला शेतातील काडी-कचरा किंवा कुजलेले शेणखत एखादी गोष्ट जेव्हा मातीत कुजते तेव्हा त्याचे रुपांतर सेद्रिय कर्ब मध्ये होते.सुक्ष्म जिवाणु पासून ते सर्व प्राण्यापर्यंत सर्वाचे जीवनमान कर्बा वर चालते.जसे पाण्याचे चक्र आहे तसेच कर्ब चे ही चक्र
चालूच राहते सेंद्रिय कार्बामध्ये साधारणता ६५% ह्युमस (Humas) म्हणजे जुन्या सेंद्रिय कर्बा मध्ये रुपांतरीत झालेला भाग असतो ,तर तितकेच महत्वाचे म्हणजे त्यात१० % पर्यंत जिवंत जीवाणू असतात. असे हि म्हणता येईल कि सेंद्रिय कर्बा मुळेच मातीचा कस वाढून जिवंत पण येतो.आता पाहु कर्ब का कमी झाला असेल
सध्या आपल्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब इतक्या मोठ्या प्रमाणावर कमी झाला (०.१ ते १ %) कारण शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरेकी वापर व जमिनीत कुजणाऱ्या गोष्टींचे कमी होणारे प्रमाण जसे पिक पालटणी न करणे त्यामध्ये मातीची मशागत मोठ्या प्रमाणावर करणे आणि जमिनीला विश्रांती न देणे. उन्हाळ्यातही जमिनीला ओलीत करणे.
नैसर्गिक शेती मध्ये जिथे जमिनीची मशागत कमीत कमी केली जाते अशा ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त आढळून येते.पण जमिनीची मशागत न करणे हा पर्याय तरी आता शक्य दिसत नाही.तिन्ही हंगामात पीके घेतली जाते.कोरडवाहू क्षेत्र वगळता.
हे लक्षात घ्या महाग मोलाचा सेंद्रीय कर्ब जमिनीत साठलाच नाही तर जीवाणूंना तो कोठून मिळणार ? मग त्यांची संख्या व कुजण्याची क्रिया कशी वाढेल ? मग पिकांना अन्न कसे उपलब्ध होईल ?
सेंद्रिय कर्ब हा सुक्ष्मजीवांशिवाय जमिनीत तयार होत नाही. तसेच सुक्ष्मजीव सेंद्रिय कर्बाचा वापर हा मातीचा स्रोत म्हणुन देखिल करित असतों मात्र त्यांच्या नंतर पुन्हा ते जमिनीत सेंद्रिय कर्ब टाकीत असतात. हा सेंद्रिय कर्ब सुक्ष्म जीव जमिनीत असलेल्या सेंद्रिय पदार्थांपासुनच मिळवत असतो, या कामात जीवाणू काहीप्रमाणात कार्यक्षम ठरतात,
तर बुरशी कार्यक्षम ठरतात. जमिनीत केली जाणारी मशागत मुळे सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात, तसेच त्यासोबत सुक्ष्मजीवांची संख्या देखिल कमी होते हे नियोजनाची बाब आहे.
महत्वाचे म्हणजे सेंद्रिय कर्बामुळे जिवनुंचि संख्या आणि कार्यक्षमता सुधारते आणि अन्न घटकाचे उपलब्धता मोठ्या प्रमाणात होते. हे उत्पादन वाढीसाठी या बाब अत्यंत महत्वाच्या आहे.जमिनीची उत्पादनक्षमता वाढविने ही जशी काळाची गरज आहे. तशीच जमिनीची सुपीकता टिकवणे सुद्धा गरजेचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
मिलिंद जि गोदे
milindgode111@gmail.com
Mission agriculture soil information
Published on: 05 February 2022, 09:50 IST