Agripedia

साल व शेंडा पोखरणारी अळी - या किडीचा प्रादुर्भाव पेरूवर मोठ्या प्रमाणात होत असतो. विशेषत: दुर्लक्षित बागेमध्ये हा प्रादुर्भाव आढळतो. या किडीची अळी रात्रीच्या वेळी सालीच्या आतील बाजूस शिरून आतील भागावर उपजीविका करते. त्यावेळेला ती सालीच्या भुसकाटात व तिच्या शरीरातून निघणाऱ्या धाग्यापासून तयार झालेल्या जाळीत लपून बसते. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास झाड सुकते व वाळते.

Updated on 18 December, 2021 9:21 PM IST

या किडीच्या नियंत्रणासाठी पेट्रोलमध्ये प्रोटेक्टंट पावडरचा २:१ प्रमाणात मिसळून त्यामध्ये कापसाचा बोळा भिजवून तो बोळा तारेच्या सहाय्याने छिद्रात घालावा व वरून छिद्र चिखलाने लिंपावे.

२) पिठ्या ढेकण्या ही कीड कोवळ्या फुटीतील व फळांतील रस शोषून घेते. याशिवाय किडीच्या अंगातून स्रवणाऱ्या गंधासारख्या चिकट पदार्थांवर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे फळांची प्रत बिघडते व उत्पादनात घट येते.

 

३) फळमाशी :

पेरूवर या किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येतो. पुर्ण वाढ झालेली मादी. फळाच्या सालीमध्ये होल पाडून अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळ पोखरून गरामध्ये बसतात. त्यामुळे फळ कुजते. आल्या मोठ्या होतात तसा फळाचा कुजलेला भाग वाढत जाऊन फळे गळू लागतात. या किडीचा प्रादुर्भाव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात होतो.

 

रोग - पेरू फळावरील देवी रोग - हा बुरशीजन्य रोग असून याला देवी किंवा खैऱ्या असेही म्हणतात. सतत भरपूर पाऊस व जास्त दमट हवा यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. बुरशीची वाढ फळांच्या सालीवर होत असते. हा रोग कोवळ्या, हिवाव्या फळांवर अधिक प्रमाणात आढळतो. फळांवर प्रथम रोगाचे लहान लालसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. लालसर ठिपक्यासाठी फळाची बाह्यसाल गोलाकार, करवतीसारखी फाटते व फळे तडकतात. फळावर गोलाकार काळ्या पुळ्या दिसतात. 

या रोगाचे व्रण फळामध्ये खोलवर रुतलेले नसतात. रोगट फळे चवीस पांचट लागतात. पक्व फळावर क्वचितच या रोगाची लागण होते. काही पानांवर देखील या रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो. जुन्या पानांवर रोगाचे लालसर तपकिरी रंगाचे वर्तुळाकार ठिपके दिसतात. या रोगाचा प्रादुर्भाव सरदार जातीच्या पेरूवर अधिक प्रमाणात होतो.

२) पाने तांबडी पडणे- झिंक द्रव्याच्या कमततेमुळे ही विकृती आढळते. पाने लहान राहून लांबट होतात. पानांचा हिरवा रंग जाऊन पिवळसर फिक्कट चट्टे दिसतात. क्वचित पानांच्या कडा लाल होतात व त्याचे प्रमाण वाढत जाऊन संपूर्ण पान लाल पडते. त्यामुळे पाने पक्व होण्याआधीच गळून पडतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते.

३) फांद्यावरील खैऱ्या रोग - हा बुरशीजन्य रोग असून त्याची लक्षणे फांद्यावर व सालीवर वेड्या वाकड्या आकाराचे खोलगट चट्टे दिसून येतात व साल फाटलेली दिसते. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास फांद्या सुकतात.

या कीड व रोगांवर प्रतिबंधक व प्रभावी उपाय करण्यासाठी तसेच भरघोस, दर्जेदार पेरू उत्पादनासाठी खालीप्रमाणे फवारणी करावी.

फवारणी :

१) पहिली फवारणी : (बहार धरल्यानंतर १५ दिवसांनी): जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ४०० मिली. + क्रॉंपशाईनर ४०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (बहार धरल्यानंतर ४५ दिवसांनी): जर्मिनेटर ७५० मिली.+ थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ३०० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (बहार धरल्यानंतर ७५ दिवसांनी): थ्राईवर १ लि.+ क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + प्रिझम ७५० मिली.+ न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ३०० ते ४०० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (बहार धरल्यानंतर ९० ते १०५ दिवसांनी) : थ्राईवर १॥ लि. + क्रॉंपशाईनर १॥ लि. + राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ४०० ते ५०० मिली + २५० लि.पाणी.

माल चालू झाल्यानंतर १५ ते २१ दिवसांच्या अंतराने वरील फवारणीप्रमाणे फवारणी चालू ठेवावी. म्हणजे प्रत्येक तोड्याचा माल उत्तम प्रतीचा मिळून उत्पादनात वाढ होते.

English Summary: Know about Peru's diseases and pest
Published on: 18 December 2021, 09:21 IST