पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे आपण वर्षातून 2/3 पिके घेऊ लागलो त्याप्रमाणात रासायनिक खतांचा हि वापर वाढला, आणि त्याचा व्हायचा तो परिणाम आज आपल्याला दिसत आहे, आपल्या शेत जमिनीची उत्पादकता दरवर्षी घटत चालली आहे.रासायनिक खते (केमिकल्स) मुळे आपल्या जमिनीतील जिवाणूंची संख्या नगण्य झाली आहे, शेतजमिनी निकृस्ट ,बंजर, खारट,चिबड होत चालल्या आहेत,जमिनीची उत्पादकता दिवसेंदिवस घटत चालली आहे आणि त्याला कारण म्हणजे सेंद्रिय खतांचा अभाव.जोपर्यंत आपण शेतीत सेंद्रिय खतांचा व जिवाणूंचा वापर वाढवत नाही तोपर्यंत आपले शेती चे उत्पन्न वाढणार नाही, आणि म्हणून रासायनिक खतांचा वापर 50% ने कमी करा व 50% सेंद्रिय खत्यांचा वापर वाढवा.बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत वापरा.जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत,
पाझर तलावातील गाळ, हिरवळीची खते, विविध प्रकारच्या पेंडी, गांडूळ खत ,शेतात शेळ्या मेंढ्या बसवा, कोंबळी खत, हाडांचा चुरा, आणि मुख्य म्हणजे जमिनीतील पिकांचे अवशेष जमिनीतच कुजू द्या जाळू नका.वरील सर्व गोष्टींपासून आपल्या शेतजमिनीत ह्युमस चे प्रमाण वाढेल व ह्युमस पासून सेंद्रिय कर्ब तयार होईल, हाच सेंद्रिय कर्ब जिवाणूंचे खाद्य असतो, त्यामुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल, व आपला रासायनिक खतांवरचा खर्चही कमी होईल.
सेंद्रिय खताचें फायदे
सेंद्रिय खतामुळे मातीतील कणांची रचना दाणेदार बनते,शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते. कणांची रचना उत्कृष्ट झाल्यामुळे जमिनीची जलधारणा शक्ती वाढते. निचरा व्यवस्थित होतो व हवा खेळती राहते,त्यामुळे मातीच्या कणांतील मुलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होते.
हे सेंद्रिय खत जमिनीत पिकांचे गरजेनुसार अन्नद्रव्ये पुरवून पिकाची भूक भागवितात व जमिनीची सुपिकता वाढवतात.
सेंद्रिय पदार्थाच्या आच्छादनामुळे जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा आघात कमी होऊन,जमिनीची धूप कमी होते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीच्या खालच्या थरापर्यत हळुहळु झिरपुन जमिनीतील उपलब्ध ओलावा पिकांना जास्त काळ मिळु शकतो जमिनीचा आकसपणा,चिकटपणा,टणकपणा,भेगा पडणे इ. अनावश्यक क्रिया कमी होतात.त्यामुळे जमिनीची मशागत चांगल्या प्रकारे करता येते.
सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमीन सछिद्र बनते.मुळांची संख्या वाढते तसेच फळांचे वजन व आकारमानात सुध्दा वाढ होऊन उत्पादन वाढीस लागते.
मुरमाड जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सर्वसाधारणपणे कमी असल्याने सेंद्रिय खतांचा वापर केल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते.
जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे विघटन होऊन ह्युमिक ,फुल्विक व ह्युमीक मध्ये रुपांतर होते. या पदार्थामुळे पिकांचे वाढीत लक्षणीय फरक आढळून येतो. तसेच जमिनीतील पालाश खनिजांचे विघटन होऊन जमिनीतील उपलब्ध पालाशचे प्रमाण वाढते.
खारट व चोपण जमिनीचा खारट व चोपणपणा कमी होऊन भौतिक गुणधर्मात अमुलाग्र बदल होतात.उदा. जमिनीची जलधारणा शक्ती,पाणी मुरण्याचा वेग,जमिनीची वाहकता,जमिनीतील हवेचे प्रमाण,चिकटपणा,मातीची रचना तसेच एकनिष्टता व संलग्न दाब इ.भौतिक गुणधर्मात सुधारणा होते.
सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमिनीतील जीवाणूंच्या संख्येत वाढ होऊन त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. परिणामी पिकास उपलब्ध अन्नद्रव्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो.
वरील सर्व कारणांसाठी आपण आपल्या शेतीत सेंद्रिय खतांचा वापर वाढावा ,सेंद्रिय खतांमुळे पिकांची प्रतिकार क्षमता वाढेल व आपले शेती उत्पनातं आपोआप वाढ होईल.
श्री शिंदे सर
9822308252
Published on: 04 January 2022, 06:51 IST