प्रादुर्भावित पिके:-
सोयाबीन,तंबाखू,टोमॅटो,कापूस,तूर,भुईमूग हरभरा, मिरची, मक्का, एरंड, वाटाणा, कोबी,फ्लॉवर,सूर्यफूल,भेंडी,ज्वारी या पिकासह 120 अन्य वनस्पतीना प्रादुर्भाव करते.
जीवनचक्र:-
या किडीचे जीवनचक्र पतंग-अंडी-अळी-कोष आणि पुन्हा पतंग या अवस्थेतून पूर्ण होते. पतंग राखाडी रंगाचा असतो.मादी पतंग नर पतंगापेक्ष्या आकाराने मोठा असतो. मादी एकावेळी 250-300 अंडी देवु शकते. आपल्या 8-10 दिवसांच्या पतंग अवस्थेत 4 ते 5 वेळा अंडी देते.त्यामुळे किडीची संख्या झपाट्याने वाढते.अंडी दिसायला पिवळसर पांढरी असतात.अंडी पानांच्या खालील दिलेली आढळतात.त्यामधून ३-४ दिवसात अळी बाहेर पडते. अळी १५-२० दिवसात पूर्ण वाढते. या काळात ५ ते ६ वेळा कात टाकते. पूर्ण वाढ झालेल्या अळीचा रंग काळसर/हिरवट व अंगावर काळे ठिपके असतात. पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी मातीमध्ये किंवा पालापाचोळ्यामध्ये कोषावस्थेत जाते.कोष तपकिरी रंगाचा असतो. ७-८ दिवसात त्यामधून पुन्हा पतंग बाहेर पडतो.
अळी ओळखावी कशी:-
या अळीसारख्या दिसणाऱ्या बऱ्याच प्रकारच्या अळ्या आहेत. त्यामुळे ओळखणे कठीण होते. मुख्यतः अळीचा रंग काळपट/हिरवट/राखाडी दिसून येतो. सोबत अंगावर काळे गडद ठिपके दिसून येतात. अळीच्या तिसऱ्या अवस्थेत इतर काळ्या ठिपक्या ऐवजी, मानेवर दोन डार्क ठिपके व एकदम शेवटी 2 लहान लहान ठिपके असतात आणि डोक्यावर इंग्रजी अक्षर Y उलटे चिन्हांकित असते जर अशी अळी असेल तर Spodoptera litura आहे. असे समजावे.
एकात्मिक व्यवस्थापन:-
या किडीची प्रजनन क्षमता जास्त असल्याने कीड झपाट्याने वाढते व वर्षभर सक्रिय असते. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही. यामध्ये पारंपारिक,जैविक,यांत्रिक व रासायनिक पद्धतींचा एकत्रित वापर केला जातो व सुवर्णमध्य साधून किडीवर नियंत्रण जाते.जे पर्यावरण पूरक व कमीतकमी खर्चात होते.
पारंपारिक पद्धती:-
कीड वर्षभर सक्रिय असते,त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शेताची किमान दोन वेळेस नांगरणी करून घ्यावी. किडीचे जमिनीमध्ये असणारे कोष नष्ट होतील किंवा उघडे पडल्यामुळे पक्ष्यांचे नैसर्गिक भक्ष बनतील.
आपल्या भागातील किडीचा प्रादुर्भाव ओळखून कीड/सहनशील वाणांची लागवडीसाठी निवड करावी.
यांत्रिक पद्धती:-
सुरवातीस दिसणाऱ्या अळ्या, कोष,अंडीपुंज वेचुन शेताबाहेर नष्ट करावेत.
पीक १५-२० दिवसांचे झाल्यानंतर एकरी किमान ८-१० कामगंध सापळे लावून घ्यावॆत. किडीचे पतंग सापळ्यामध्ये अडकतात व किडीची जीवनसाखळी तुटते.शेतामधील किडीचे प्रमाण समजते, किड सर्वेक्षण करण्यात मदत होते.
पतंग एकावेळी २५०-३०० अंडी देत असतो. त्यामुळे एक जरी पतंग सापडला तरी पुढे भविष्यात होणाऱ्या २५०-३०० अळ्या थांबतात. व नैसर्गिकरित्या कीड नियंत्रण होते.
सोयाबीन/तंबाखू क्षेत्रात हेक्टरी २५-३० पक्षीथांबे लावून घ्यावेत.विविध पक्ष्यांना आमंत्रित केले जाते त्यामुळे अळी अवस्था पक्ष्यांचे नैसर्गिक बनते.
जैविक पद्धती:-
पिकाची लागवड झाल्यानंतर सुरवाती निमतेलाची फवारणी करावी. त्यामुळे किडीची अंडी, लहान अळ्यांचे निर्मूलन होईल.
एस. एल. एन. पी. व्ही. 500 एल. ई. विषाणू 2 मी. ली. प्रति लिटर पाणी किंवा नोमुरीया रीलाई या मित्रबुरशीची 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव दिसताच फवारणी करावी.
वरील उपायाचा एकात्मिक पद्धतीने वापर करावा,कीड नियंत्रण हमखास होईलच पण तरीसुद्धा एखाद्यावेळी जेव्हा शेतातील किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या(सरासरी १० अळ्या प्रति झाड ) वर जाईल तेव्हाच रासायनिक पद्धतींचा अवलंब करावा.
रासायनिक पद्धती:-
Carbaryl 50 WP किंवा chlorpyriphos 20 EC २०मिली प्रति पंप
रासायनिक कीटक नाशके खरेदी करताना लेबल क्लेम नक्की तपासा. रासायनिक नियंत्रणावरील खर्च कमी करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती अवलंबवावी.
संकलन - IPM school
लेखक - महेश कदम,हातकणंगले विजय भेडवाडे,जयसिंगपूर प्रणव पिंजरे,कोल्हापूर अमोल कोंढाळकर,नसरापूर,भोर प्रज्वल रौंदळे,अकोलाविराज ठाणेकर,कोल्हापूर मिलिंद जि गोदे,अमरावती, शरद बोंडे,अचलपूर
Published on: 11 October 2021, 05:57 IST