जिवामृत हे खत नसून अनंत कोटी उपयुक्त सुक्ष्म जिवानुंचे सर्वोत्तम विरजन आहे.
तसेच सर्वोत्तम बुरशिनाशक ( fungicide)
सर्वोत्तम विषाणू नाशक
(antiviral)
जंतूरोधक ( antidavil )
व सर्वोत्तम संजिवक ( harmons) आहे. फक्त एक वेळ वापरून पिकांचं निरीक्षण करा.
जिवामृत कसे तयार करावे?
200 ली. पाणी
त्यात 10 की. देशी गाईचेच शेण (जर्सी चे अजिबात नाही)
5 ते 10 ली. देशी गाईचेच गोमुत्र ( जर्सी प्राण्याचे अजिबात चालणार नाही )
1 की. काळा गुळ ( केमिकल नसलेला)
किंवा 4 ली.ऊसाचा रस
किंवा 10 की.ऊसाचे तुकडे किंवा 10 की.गोड ज्वारीचे तुकडे
किंवा 1 की.गोड फळाचा गर
आणी
1 की. बेसन व
1 मुठ बांधावरची जिवानु माती.
हे सर्व बॅरेल मध्ये टाकून चांगले ढवळुन पोते झाकून ठेवावे,
सकाळ - संध्याकाळ 1 मिनिट काठीने ढवळावे .सुर्यप्रकाश व पावसाचे पाणी बॅरेलमध्ये पडू नये.
48 तासा नंतर जिवामृत वापराला तयार होते जास्तीत जास्त 7 दीवसापर्यंत वापरता येते.7दीवसानंतर सडण्याची क्रिया चालू होते.
जिवामृत कसे द्यावे?
1) सिंचनाच्या पाण्यातून देणे.
2)सरळ जमिनीवर टाकणे
3)उभ्या पिकावर फवारनी करणे
तिन्ही प्रकारे सर्वोत्तम रिझंल्ट.
जिवामृताच्या फवारनी चा परिणाम.
1) कोणत्याही झाडांची हीरवी पाने दीवसा अन्न निर्मिती करतात.या प्रक्रीयेला प्रकाशसंश्लेषन क्रिया म्हणतात. एक चौ.फुट हीरवे पान एका दीवसात सुर्यप्रकाशामधुन 12.5 kg. कॅलरी सुर्य ऊर्जा पानामध्ये जमा करतात व हवेतून कर्बाम्ल वायु घेऊन(कार्बनडायऑक्साईड)व जमिनीतून पाणी घेउन 1 चौ.फुट पान एका दीवसाला 4.5 ग्रॅम अन्न निर्मिती करतं, व त्यापासून आपल्याला 1.5 ग्रॅम अन्नधान्याचं उत्पादन मिळतं , 2.5 ग्रॅम फळांचं व ऊसाचं टनेज मिळतं .
याचा अर्थ जर आपन पानाचं आकारमान दुप्पट केलं तर उत्पादन दुप्पट होईल . पानाचं आकारमान वाढवनारे काही संजिवके (harmons) असतात ते जिवामृता मध्ये असतातच म्हणून जिवामृत फवारले कि पानाचा आकार वाढतो.
2) पिकांच्या पानावर सतत रोग निर्माण करना-या बुरशिंचा व जंतूंचा हल्ला होत असतो . जिवामृत हे अत्यंत उपयुक्त बुरशिनाशक व जंतूरोधक आहे म्हणून जिवामृत फवारल्यावर पिकावर रोग येत नाही.
3) पिकावर किडींचा हल्ला सतत होत असतो व जर पानामध्ये प्रतिकारशक्ती नसेल तर पानं किडींना बळी पडतात. जिवामृतामध्ये पानांना प्रतिकारशक्ती देनारे काही antibiotics असतात त्यामुळे जिवामृत फवारनीने पानामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते व पिकं किडीपासून वाचतात.
4)आणीबाणीत जर मुळ्याच्या माध्यमातून पानांना नत्र मिळाला नाही तर पानांची वाढ थांबते परंतु काही जिवानू असे आहेत कि जे पानावर बसून थेट हवेतून नत्र घेतात व पानांना पुरवतात.
त्यापैकी acito dizotopicus सारखे जिवानू यामध्ये मुख्य भुमिका वटवतात . हे जिवानु जिवामृतात असतातच त्यामुळे हे जिवानु हवेतून नत्र घेउन पानांना देतात व झाडांची वाढ चालु ठेवतात.
5) सुर्यप्रकाशा सोबत अतीनील किरनां सारखे अत्यंत घातक विविध किरनं येत असतात ते किरनं पानावर पडले किंवा झाडांमधील अनुवंशिक गुणधर्मांमध्ये बदल होतो व झाडामध्ये विकृती निर्माण होते .जिवामृताची फवारनी या विविध किरणांपासुन सहनशीलता देते.
6)वेगवेगळ्या पिकांच्या पानांना सुर्यप्रकाशाची वेगवेगळी तिव्रता सहन करण्याची क्षमता असते .जेंव्हा ऊन्हाळ्यामध्ये ( मार्च ते जुन) सुर्य प्रकाशाची तिव्रता 8000 ते 12000 फुट कँडल पर्यंत वाढते .ज्या पिकांना ही तिव्रता सहन होत नाही त्या पिकांची पाने या उन्हामध्ये बाष्पीभवनाचा वेग वाढवतात . त्यामुळे पानामध्ये ओलावा टीकत नाही व पानं सुकन्याची शक्यता असते आशा वेळी पानं मुळ्यांना संदेश पाठवतात , संदेश मिळताच मुळ्या पाणी पानाकडे पाठवतात. ओलावा पानामध्ये येताच ताबडतोब बाष्पीभवनाने निघुन जातो , अशा त-हेने जमिनीतील ओलावा वेगाने घटतो परिणामी पानं पिवळी पडतात , करपतात व सुकतात . जिवामृताची फवारनी केल्यानंतर अती उष्णतामाना मध्ये पानावर असलेले पर्ण छीद्र बंद होतात , बाष्पीभवन थांबते व उष्णतेच्या लाटेतही पिक करपत नाही.
जीवामृत फक्त 7 दिवस वापरावे
Published on: 29 January 2022, 01:31 IST