हे असे टॉनिक आहे जे झाडाला सक्शम बनविते फुलांची संख्या वाढविते फळांवर चकाकी आणते आता आपण हे बनवायच कस हे पहानार आहोत.
साहीत्य -दहा लीटर वेस्ट डिकंपोजर मलटीफ्लाय केलेले तीन भाज्या कोबी फ्लावर पालक कारले शेवगा यापैकी कोणत्याही तीन भाज्या घ्या तीन प्रकारची गोड फळे घ्या त्यात केळी पिकलेली गाजर डाळिंब पेरू सफरचंद कोणतेही तीन फळे घ्या
कृती- भाज्या बारीक चिरून घ्या फळे ही बारीक चिरून घ्या दहा लीटर ची झाकण असलेली बकेट घ्या
बकेट मध्ये दहा लीटर वेस्ट डिकंपोजर मलटीफ्लाय केलेले घ्या त्यामधे फळे व भाज्या चीरलेल्या बकेट मध्ये टाकुन घ्या एक कीलो गुळ विरघळुन घ्या बकेट मध्ये टाकुन घ्या चांगले एकजीव होईपर्यत काठीने चांगले हलवुन घ्या आता बकेटवर झाकण ठेवुन हवाबंद करा ही बकेट सावली मध्ये ठेवायचच रोज सकाळ संध्याकाळी बकेट मधली हवा काढुन टाकायची ही बकेट आपल्याला एकवीस दिवस ठेवायची आहे. एकवीस दिवसात आपल गारबेज एनझाईम तयार झालेल आहे आता आपण ते वापरायच कस ते पाहू
हे गारबेज एनझाईम फवारनी साठी प्रमाण प्रती लीटर वीस मिली म्हणजे पंपाला तीनशे मिली टाकायच आहे गारबेज एनझाईम कळी असताना फवारा फुले आसताना फवारू नये फळे लागल्यानंतर फवारले तर फळांन वर एव्हडी चकाकी येते की एकच नंबर गारबेज एनझाईम चा उपयोग पिकांच्या जोमदार वाढीसाठी होतो मादी कळी लागन्यासाठी होतो पीकांवर चकाकी येते गारबेज एनझाईम चा उपयोग जनावरांच्या गोचड्या लिखा उवा पिसवा मरून जातात पाणी शुध्द करन्या साठी गारबेज एनझाईम चा उपयोग होतो हे गारबेज एनझाईम तीन वर्ष रहाते
मित्रांनो गारबेज एनझाईम एकदा बनवा वापर करा नक्कीच शेतकरी याना याचा फायदा होनार आहे तरी मित्रांनो गारबेज एनझाईम एकदा वापरून पहा. हे टॉनिक आहे जे झाडाला सक्शम बनविते फुलांची संख्या वाढविते फळांवर चकाकी आणते.गारबेज एनझाईम चा उपयोग पिकांच्या जोमदार वाढीसाठी होतो मादी कळी लागन्यासाठी होतो पीकांवर चकाकी येते गारबेज एनझाईम चा उपयोग जनावरांच्या गोचड्या लिखा उवा पिसवा मरून जातात
Published on: 31 January 2022, 07:58 IST