शेती ची मुळ समस्या समजून घेऊ बरेच शेतकरी बोलत असतात आमच्या भागात पिकांचे उत्पादन कमी झाले बुरशी व किडि चां प्रादुर्भाव आहे कोणतेही बुरशीनाशक व किटकनाशक मारा!काही फरकच पडत नाहीं, आपल्या भागातून मिरची चा विषयच संपला”.
हे बोलणेे ऐकल्या नंतर असे कळले कि काही पीक जसे मिरची ही रोगामुळे गेलीअसते तर कुठल्या तरी किटकनाशकाने ठिक झालेच असते मुळ समस्या पिकाची नाहीं, मातीची आहे, तिचा कस ( कर्ब) कमी झाला. किती कमी झाला असेल हा पाहू!सुपिक जमिनीचा सेंद्रिय कर्ब २% असतो,तर वाळवंटात तो ०.५ % म्हणजे अर्धा टक्का असतो तर मग आपल्या जमिनीचा किमान यापेक्षा जास्तच असायला हवा पण दुर्दैवाने वस्तुस्थिती अत्यंत भयानक आहे किआपल्या बागायती जमिनीचा सरासरी सेंद्रिय कर्ब ०.३ % म्हणजे वाळवंटापेक्षा दुप्पटीने निकस जमीन झाली आहे.
आपन पिकवण्याची कसरत करत आहोत. भरघोस उत्पादनाची आस लावून बसलाय
परिणाम असा की कमजोर मातेच्या पोटी अशक्त व अपंग बाळ जन्माला येते, त्याप्रमाने कोणतेहि पिक लावा, रोग आपल्याच नशिबी आले आहे
रोग कमी यावे व अनुकूल वातावरण मिळावे, याकरिता शेतकरी हायटेक टेक्नॉलॉजी वापरतात, मल्चिंग करतात, शेडनेट, पाँलिहाऊस करतात माझे ह्या हाईटेक शेतीला दुमत नाही.
पण होते काय ?परीस्थिती शेतकऱ्यांचे कर्जदेखील फिटत नाहीं.एक वर्ष पिक चांगले येते, मना सारखं समाधान होत नाही मग पुढचे काही वर्ष त्याचे झालेले पैसे पुन्हा त्यातच खर्च करायचे व पुन्हा पहिल्यासारखे उत्पन्न निघण्याची वाट पहायची, हे दुष्ट चक्र चालूच रहाते. हेच उदाहरणसोयाबिन चे पिकं पहा आले तर आले बेभरवशाचे पिक आपण घेऊ लागलो, चार-पाच वर्षांपर्यत केवळ पेरले कि पावसाच्या पाण्यावर काहीही न करता येत होते पण आजची परिस्थिती पहा, सोयाबिनला कोराजन मारायची वेळ आली
कुठे चाललाय शेतकऱ्यांचा खर्च…. कशी परवडणार असी शेती?
मला असे वाटते कि,विचार करा समस्या नीट समजून घेणे गरजेचे आहे.मुख्य उपाय मातीच्या व पिकाच्या पोषणावर करणे गरजेचे आहे,मग दुय्यम उपाय रोगांसाठी करायला हवे.पण होते ते उलटेच.पावसाळी वातावरणात किंवा प्रतिकूल वातावरणात पिकांचे पोषण अत्यल्प होते किंवा थांबते.“पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते .परिणामी प्रतिकारशक्ति कमी होते, पिकं पिवळी पडून विविध रोगांना बळी पडतात.शेतकरी किडी व रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी खूप खर्च करताना दिसतात पण, ह्या समस्येची तिव्रता (अन्नद्रव्यांची कमतरता) मुळे वाढत आहे,हे त्यांच्या लक्षात येतच नाहीं.
किडी व रोगावर औषधे मारण्याबरोबर पिकांची अन्नद्रव्यांची गरज भागवणे त्याहून महत्त्वपूर्ण आहे . अन्यथा शेतकरी किडी व रोगावर औषधे मारत रहातो व पिक कमजोर पडत जाते.
असे होते कि आपण आपला रोग तर बरा करतोच आहे, पण सलाईनच बंद पडले, मग पूर्णपणे शरीरावर अशक्त पणा जाणवतो एक दिवस पिक कायमचे सोडून द्यावे लागते.
अगदी २०-२५ वर्षांपूर्वी तर एवढे रोग नव्हते, कांदा, गव्हू इत्यादी पिके कोणतीही विशेष काळजी न घेता आजच्यापेक्षा छान पिकायचे असे काय होते जमिनीत! त्या वेळी जे होते आज नाहीं ?
थोडं गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे व
चिंतन करण्या सारखा गंभीर प्रश्न आहे.
आपला मित्र
मिलिंद जि गोदे
Published on: 16 January 2022, 08:57 IST