Agripedia

जमीनिचा कस कमी होत असल्याने जमीन भुसभूशीत होत नाही ,परिणामी पिकांच्या मुळांची वाढ होत नाही .

Updated on 27 January, 2022 6:36 PM IST

जमीनिचा कस कमी होत असल्याने जमीन भुसभूशीत होत नाही ,परिणामी पिकांच्या मुळांची वाढ होत नाही .

ह्या सगळ्यावर एकच उत्तर मेपल ऑर्गटेक इंडिया लि. या संस्थेने आपल्या शेतकऱ्यांसाठी शोधून काढले आहे .

हा प्रॉडक्ट पूर्ण पने ऑर्गेनिक आहे.

देशातील शेतकर्यांची रासायनिक खतांची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आयात करावी लागतात. आपल्या देशात रासायनिक खतांचा वापर वाढत चालला असला तरी उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी वापरत येणारी खतांची मात्रा कमी आहे. रासायनिक खतांच्या सतत वापरामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंचा र्हास होतो व जमिनीची उत्पादकता कमी होते.

मेपल इ.एम 1( इ.एम द्रावण): वापराचे फायदे

जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

जमिनीची उगवण क्षमता तसेच उत्पादन वाढते.

जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढवते.

जमिनीतील क्षार कमी करते तसेच जमीन सुपीक बनवते.

  दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यातही पिकांना तग धरून राहण्यास मदत करते.

 झाडांना पोषक अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत करते.

कर्बग्रहण क्रिया वाढून पानांमध्ये काळोखी वाढण्यास मदत होते.

• ईएम द्रावणांच्या वापरामुळे बी उगवण क्षमता वाढते.

• ईएम द्रावणांच्या वापरामुळे झाडाची अन्न्यद्रव्ये शोषून घेणारी क्षमता वाढते, परिणामी पिकाची चांगली वाढ होते.

• ही द्रावण जमिनीमध्ये 'अँटिओक्सिडेंड'चे काम करून पीकवाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात.

• रोपवाटिकेमध्ये ईएमचा वापर केल्यामुळे रोपांच्या मुळांची वाढ चांगली होते, रोपे तजेलदार होतात.

• सर्व फळपिकांमध्ये वापर करता येऊ शकत असला तरी विशेषतः ईएम द्रावणांच्या वापरामुळे केळी पिकाची एकसारखी वाढ होते. मोसंबी, संत्र्याच्या झाडांना फुले लागण्याचे प्रमाण वाढते, फळधारणा चांगली होते. तसेच फळांची गुणवत्ता वाढते. चिकू, पेरू, डाळिंब, द्राक्ष या फळपिकांमध्येही ईएम द्रावणांमुळे उत्पन्न व गुणवत्ता वाढते.

• सेंद्रिय घटकांच्या वाढीमुळे पीकांच्या पांढऱ्या मुळ्या वाढतात. विशेषतः ऊस या पिकाची वाढ चांगली होते. मुळांची वाढ, पेरांची संख्या, फुटव्यांची संख्या, तसेच पेऱ्यातील अंतर वाढते. ईएम द्रावणांच्या वापरामुळे तृनधाण्यात ५० टक्क्यांपर्यंत उत्पन्नात वाढ होऊ शकते.

• ही द्रावण आम्लधर्मी असल्यामुळे ठिबक सिंचन संचामध्ये अडकणारे क्षार विरघळून जातात. शेवाळ वाढत नाही.

• बाजारातील इतर सेंद्रिय तसेच रासायनिक औषधांपेक्षा ईएम द्रावण स्वस्त असल्याने उत्पन्न खर्चात बचत होते.

• या द्रावणांचा सामू सर्वसाधारणपणे ३.५ ते ३.८ इतका असतो. जमिनीचा वाढलेला सामू कमी करण्यासाठी या द्रावणाच्या वापर करतात.

• मातीतील जीवाणूंच्या कार्याला मदत करून मातीतील जैविक वातावरण सुधारण्यास मदत करते.

• जिवाणू खतांचा ईएम सोबत केलेला वापर जास्त परिणामकारक दिसून येतो.

• जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये चांगल्या पद्धतीचा परिणाम दिसून येतो.

• या द्रावणांच्या वापरामुळे पालापाचोळा लवकर कुजतो तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थही लवकर कुजतात.

• गांडूळ खताच्या वाफ्यावर याची फवारणी केली असता लवकर खत तयार होण्यास मदत होते.

• काही देशांमध्ये या द्रावणांचा प्रभावशाली वापर दूषित पाणी शुद्धीकरण प्रणालीत करत आहेत.

• ही द्रावणे पर्यावरण रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात.

• ईएम द्रावणाची शेतीपूरक व्यवसाय करण्याच्या ठिकाणी फवारणी केली असता तेथील दुर्गंधी कमी होते, डास, चिलटे, माश्या कमी होतात.

हानिकारक जंतूंनी दूषित परीसंस्था बदलून तिचे रुपांतर उत्पादक परिसंस्थेत करणारी, माफक किमतींमध्ये मिळणारी हि द्रावणे आपल्या देशात दुर्लक्षितच आहेत. त्यांचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे.

बाजारात अनेक खाजगी कंपन्यांचे ईएम द्रावणे उपलब्ध आहेत, खरेदी

करताना त्यांची गुणवत्ता तपासावी. ईएम द्रावणांसाठी आपल्या भागातील कृषि सेवा केंद्रामध्ये संपर्क करावा.

 

शिंदे सर

9822308252

English Summary: Know about e am microbs for farmer
Published on: 27 January 2022, 06:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)