Agripedia

कढीपत्ता एक बारमाही मसाल्याचे झाड आहे, कढीपत्त्याला गोड कडूनिंब असेही म्हणतात. त्याचे झाड कडुनिंबासारखेच असते, परंतु त्याची पाने काठावरुन कापलेली नसतात. त्याच्या झाडाची लांबी 14 ते 18 फूट पर्यंत जाऊ शकते. कढीपत्त्याचा वापर भाजीची चव वाढवण्यासाठी केला जातो.

Updated on 05 September, 2021 11:27 AM IST

कढीपत्ता एक बारमाही मसाल्याचे झाड आहे, कढीपत्त्याला गोड कडूनिंब असेही म्हणतात.  त्याचे झाड कडुनिंबासारखेच असते, परंतु त्याची पाने काठावरुन कापलेली नसतात.  त्याच्या झाडाची लांबी 14 ते 18 फूट पर्यंत जाऊ शकते. कढीपत्त्याचा वापर भाजीची चव वाढवण्यासाठी केला जातो.

 त्याची पाने मुख्यतः चवदार पदार्थांमध्ये वापरली जातात.  या कारणास्तव, लोक त्यांना फक्त 2.5 मीटर पर्यंत वाढू देतात, कारण त्याच्या रोपावर फुले आल्यानंतर त्याची वाढ थांबते.

 

 

 

कढीपत्ताचा उपयोग

कढीपत्त्याची पाने दक्षिण भारतातील विविध व्यजणांमध्ये चव म्हणून वापरली जातात.  त्याचे बाष्प तेल साबण सुगंधांमध्ये स्टॅबिलायझर म्हणून वापरले जाते. कढीपत्ता अन्नाची चव आणि सुगंध दोन्ही वाढवते, म्हणून दक्षिण भारतीय भाज्यांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या झाडांची पाने, झाडाची साल आणि मुळे देशी औषधांमध्ये टॉनिक, उत्तेजक, कार्मिनेटीव्ह आणि भूक वाढीसाठी म्हणून वापरली जातात.

कोणते हवामान आणि तापमान उपयुक्त ठरते कढीपत्ता लागवडीसाठी

 

कढीपत्ता उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय हवामानाची वनस्पती आहे.  हे उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय हवामानात चांगले वाढते. याला पूर्ण सूर्यप्रकाशासह उबदार तापमान आवश्यक आहे. हिवाळ्यात किमान तापमान 10 डिग्री सेल्सिअस आणि उन्हाळ्यात जास्तीत जास्त 40 डिग्री सेल्सिअस तापमानात या वनस्पतीचा विकास चांगला होतो. कढीपत्ताचे पिक समुद्र सपाटीपासून 1000 मीटर उंचीवर देखील घेतले जाऊ शकते.

 

 

 

कढीपत्ता लागवडीसाठी उपयुक्त जमीन

 

योग्य पाणी व्यवस्थापनासह सुपीक चिकणमाती असलेली जमीन योग्य आहे. पाणथळ चिकणमाती, काळी माती असलेली शेतजमीन कढीपत्त्याच्या लागवडीसाठी योग्य नाही. एकदा लागवड केल्यानंतर याची झाडे 10 ते 15 वर्षे उत्पन्न देतात. पावसाळ्यात पाणी साचल्याने कढीपत्त्याच्या रोपांमध्ये विविध प्रकारचे रोग होण्याची शक्यता वाढते.  कढीपत्ताच्या पिकासाठी 6 ते 7 दरम्यान मातीचे पीएच मूल्य योग्य असल्याचे मानले जाते.

लागवडीसाठी पूर्वमशागत

 

कढीपत्त्याच्या लागवडीसाठी, 2 ते 3 वेळा नागरणी करावी प्रत्येक नांगरणीनंतर फळी मारून शेत सारखे करावे. शेतात ढेकळे राहू नका देऊ आणि शेत भुसभूशीत बनवावे.  यानंतर, शेतात तीन ते चार मीटर अंतरावर खड्डे तयार करा. हे खड्डे एका ओळीत तयार करा आणि ओळींमध्ये समान अंतर ठेवा. त्यानंतर, या खड्ड्यांमध्ये योग्य प्रमाणात जुने शेणखत आणि सेंद्रिय खत मिसळा आणि 15 दिवस आधी ते खड्डे भरा. माती भरल्यानंतर खड्ड्यांना पाणी द्या. खतांची मात्रा: कढीपत्त्याचा वापर औषधे आणि मसाल्यांमध्ये केला जातो. या कारणास्तव, सेंद्रिय खताचाच वापर त्याच्या उत्पादनात केला पाहिजे. त्याच्या लागवडीसाठी खड्डे तयार करताना शेतात सुमारे 250-300 क्विंटल कुजलेले शेणखत समप्रमाणात मिसळावे. त्यानंतर, प्रत्येक तिसऱ्या महिन्यात दोन ते तीन किलो सेंद्रीय कंपोस्ट झाडांना लावले पाहिजे.

 

 

कढीपत्त्याची वाण

 

शेतकरी बहुधा कढीपत्त्याच्या स्थानिक जातींना प्राधान्य देतात. कृषी विज्ञान विद्यापीठ, धारवाड यांनी नुकतेच कढीपत्त्याची दोन प्रकार, DWD-1 आणि DWD-2 जारी केले आहेत, ज्यात अनुक्रमे 5.22 आणि 4.09 टक्के तेलाचे प्रमाण आहे. दोन्ही जातींना खुप छान सुगंध आहे.

 

 

 

 

कढीपत्ता लागवड कशी आणि कधी होते

 

कढीपत्त्याची लागवड डायरेक्ट बियाण्यांद्वारे केली जाते, तसेच शेतकरी कलम करूनही लागवड करू शकतात. बहुतेक लोक बियाणे द्वारे लागवड पसंत करतात. बियाणे आणि कलम या दोन्हीपासून लागवड केल्याने समान उत्पादन मिळते. त्याची बियाणे शेतात तीन ते चार मीटर अंतरावर तयार केलेल्या खड्ड्यांमध्ये लावली जातात. कढीपत्ता हिवाळा हंगाम वगळता कोणत्याही वेळी लावला जाऊ शकतो, परंतु मार्चमध्ये त्याची लागवड करणे चांगले. मार्चमध्ये बियाणे लागवड केल्यानंतर, ते सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान उत्पादणासाठी तयार होतात. त्याची पहिली काढणी बिया पेरल्यानंतर सात महिन्यांनी केली जाते. त्यानंतर प्रत्येक तिसऱ्या महिन्यात वनस्पती उत्पादणासाठी रेडी असते.

 

 

 

 

 

 

पाणी व्यवस्थापन तण नियंत्रण

 

कढीपत्ता वनस्पतीला पाण्याची गरज जास्त असते. शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात नियमितपणे पिकाला पाणी देणे आवश्यक आहे. त्याच वेळी, हिवाळ्यात कमी पाणी द्या, परंतु लक्षात ठेवा की यावेळी खत अजिबात देऊ नका. पाणी दिल्यानंतर जमिनीत ओलावा असतो आणि तेव्हा पिकातून तण काढून टाकावे. वर्षातून 1-2 वेळा तण काढणे आवश्यक आहे.  तण काढताना झाडांना माती लावावी, जेणेकरून मुळे उघडी राहणार नाहीत.

 

 

 

 

 

कढीपत्त्याची पाने केव्हा तयार होतात

 

जेव्हा कढीपत्त्याच्या झाडाची पुरेशी वाढ होते, तेव्हा शेतकरी त्याची पाने कापू शकतात. तसे पाहता,गरज असल्यास त्याची पाने कधीही तोडली जाऊ शकतात. बियाणे वाढल्यानंतर सात महिन्यांनंतर त्याची झाडे पहिल्या तोडणीसाठी तयार होतात. पहिल्या तोडणीनंतर, झाडे तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात पुन्हा तोडणीसाठी तयार होतात.  फुले येण्यापूर्वी त्याची झाडे कापली पाहिजेत.  कारण वनस्पती फुलांच्या नंतर वाढत नाही.

 

 

 

 

कढीपत्ता उत्पादन

 

कढीपत्त्याचे उत्पादन हेक्टरी 2 ते 4 टन आहे.

कढीपत्ता सुकवून त्याचे पावडर किंवा तशीच वाळलेली पाने विक्रीसाठी पाठवली जातात.

English Summary: know about curry leaves farming
Published on: 05 September 2021, 11:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)