Agripedia

शेतात एकच एक पीक न घेता पीक फेर बदल केल्याने काय फायदे होतात जाणून घ्या.

Updated on 29 January, 2022 10:36 PM IST

शेतात एकच एक पीक न घेता पीक फेर बदल केल्याने काय फायदे होतात जाणून घ्या.

पीक फेरपालट ही एक प्राचीन कृषी पद्धती आहे. वर्षानुवर्षे प्रत्यक्ष अभ्यासाने यात बदल होत आलेले आहेत.

१) जमिनीची सुपीकता वाढते 

विशिष्ट पीक हे जमिनीत विशिष्ट प्रकारची तत्वे सोडतात. तर काही विशिष्ट प्रकारची अन्नद्रव्ये शोषतात. त्यामुळे पिकांच्या फेरपालटाने जमिनीतील या पोषक तत्वांचे संतुलन होते व जमिनीची सुपिकता वाढते

२) पीकांचे उत्पादन वाढते:

फेरपालटीमुळे जमिनीतील न वापर झालेल्या अन्नद्रव्यांचा, साधनांचा वापर होतो व पीकांचे उत्पादन वाढते. 

३) मातीच्या पोषक तत्वांमध्ये वाढ होते:

विशिष्ट पीकांमुळे मातीतील विशिष्ट प्रकारचे जिवाणू समृद्ध होत असतात त्यामुळे मातीच्या पोषक तत्वांमध्ये वाढ होते त्यामुळे माती सुपीक व संतुलित बनते.

 ४) रोग व कीडींना आळा बसतो:

फेरपालटीने रोग व कीड यांचा जीवन क्रम थांबतो. त्यांचे निवासस्थान नसल्याने त्यांची पुढील पिढी बंद होते. रोग व किडे पुढील पीकांत संक्रमित होण्याचा धोका टळतो. 

५) मातीच्या संरचनेत सुधारणा होते.

पीक फेरपालटीने मातीच्या संरचनेत ही लक्षणीय सुधारणा होऊन परिणामी उत्पादनात वाढ झालेली आपणास दिसून येते.

याप्रकारे पिकांचे नियोजन केल्यास, शेतीमधून नक्कीच जास्तीतजास्त उत्पन्न घेता येईल.

पीक फेरपालट ही एक प्राचीन कृषी पद्धती आहे. वर्षानुवर्षे प्रत्यक्ष अभ्यासाने यात बदल होत आलेले आहेत. 

 

नैसर्गिक विषमुक्त शेती,महाराष्ट्र.

English Summary: Know about Crop rotation this benifits
Published on: 29 January 2022, 10:36 IST