महाराष्ट्रात मसाल्याच्या तिखटपणापासून द्राक्षेच्या गोडव्यापर्यंत सर्व पिकवले जाते अहो पिकवलच नाही जात तर ह्याच्या उत्पादनात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. फक्त मसाल्याचे पदार्थ आणि द्राक्षे ह्याचेच उत्पादन घेतले जाते असं नाही तर डाळिंब, कांदा, काजु इत्यादीच्या उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आज आपण काजूच्या उत्पादनात महाराष्ट्राच्या बळीराज्याचा किती मोलाचा वाटा आहे ते जाणुन घेणार आहोत.
सर्वोत्तम ड्रायफ्रुटसमध्ये काजुची गणना केली जाते, एवढेच नाही काजु खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जस्त, लोह, मॅंगनीज, पोटॅशियम, कॉपर आणि सेलेनियम सारखे खनिज घटक काजुमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. पण काजुची लागवड आणि काजुची प्रक्रिया करणे खूप कठीण आहे. काजुला देश -विदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे साहजिकच काजुची लागवड शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न कमवून देऊ शकते. केरळ, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये काजूची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पण महाराष्ट्रही या बाबतीत कमी नाही.
कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रात 1.91 लाख हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड केली जाते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, कोल्हापूर आणि सांगली जिल्हे यासाठी प्रसिद्ध आहेत. तर संपूर्ण देशात या पिकाखालील क्षेत्र 10.10 लाख हेक्टर एवढे आहे, आणि उत्पादनचा विचार केला तर ते 7.45 लाख मेट्रिक टन एवढे आहे. काजू हा मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो म्हणुन हे परकीय चलन मिळवणारे एक प्रमुख पीक आहे.
काजूच्या लागवडीसाठी नेमकी जमीन आणि हवामान कशे असावे
कृषीतज्ञांच्या मते, काजू हे उष्णकटिबंधीय पीक आहे, जे उष्ण हवामानात चांगले उत्पादन देते. ज्या ठिकाणी दंव पडण्याची शक्यता असते किंवा जिथे लांबपल्ल्याचा हिवाळा असतो अशा भागात काजुची लागवड खुप प्रभावित होते, म्हणुन अशा भागात काजुची लागवड करू नये. समुद्रसपाटीपासून 700 मी. उंचीचे क्षेत्र तसेच जेथे तापमान 200 सेंटीग्रेडपेक्षा जास्त राहते, अशा ठिकाणी काजुची लागवड करणे फायद्याचे ठरते आणि काजूचे चांगले उत्पादन मिळते. समुद्र किनारपट्टी लाभलेले तसेच लाल आणि लेटराइट माती असलेल्या जमिनीत काजुची लागवड करणे खुपच फायदेशीर ठरते.
काजूच्या सुधारित जाती नेमक्या कोणत्या बरं
काजूच्या काही सुधारित वाणी खालीलप्रमाणे:- वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 6, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 8, वेंगुर्ला 9 प्रमुख आहेत.
काजूचे उत्पादन कुठे कुठे
कच्च्या काजू उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो, तर आयव्हरी कोस्ट हे काजु उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. जरी उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागत असला तरी काजूच्या प्रक्रियेत मात्र भारत अव्वल स्थानी विराजमान आहे. जर भारतातील काजु उत्पादनचा विचार केला तर देशातील पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी भागात सर्वाधिक काजूचे उत्पादन घेतले जाते. भारतातील लागवडिखालील जमिनीचा विचार केला तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. येथे दरवर्षी 225000 टन काजूचे उत्पादन होते.
Source - Tv9 Bharatvarsh Hindi
Published on: 27 September 2021, 03:41 IST