Agripedia

शेतकऱ्याच्या घरात जर एखादा बकरा विकला तर हजार-दोन हजार मिळतात, कोंबडी विकली तर शे-पाचशे मिळतात.

Updated on 24 January, 2022 6:57 PM IST

शेतकऱ्याच्या घरात जर एखादा बकरा विकला तर हजार-दोन हजार मिळतात, कोंबडी विकली तर शे-पाचशे मिळतात. पण तोच धावणारा बैल असेल तर त्याची किंमत लाखांच्या घरात जाते.

शर्यतीची परंपरा फक्त हौस आणि मौज म्हणून नाही. शेतकऱ्यांचे एक पारंपारिक साधन आहे, शेतीची कामं संपली की उन्हाळ्याचा हंगाम चालू होतो, त्यावेळी गावागावात जत्रा-यात्रा भरतात. 

त्यामध्ये कुस्त्यांची मैदाने देखील भरतात, तशाच पद्धतीने बैलांची मैदानं पारंपरिक आहेत.

महाराष्ट्राची परंपरा आणि शर्यतीमुळे निर्माण होणारा आर्थिक गणिताकडे पाहिलं तर हे लक्षात येतं की, बैल शर्यतीत धावतो. त्यावेळी त्याची किंमत वाढते. त्याचा एक खरेरीदार वर्ग निर्माण होतो.

पूर्वी बैलांची मैदानं ही मर्यादित असायची आता त्याला व्यावसायिक रूप आलं आहे. व्यावसायिक स्वरूपात बैलाची किंमत वाढली जाऊ लागली. त्यामुळे आज बैलाचं स्वतंत्र अर्थकारण निर्माण झालंय.

बैलगाडा शर्यत असेल तर त्या ठिकाणी जत्रा-यात्रेचे स्वरूप येते, मग छोटे-छोटे व्यवसायिक जसे हातगाडी, भेळ विक्रेते, जनावरांचे साहित्य, अवजार विक्री करणाऱ्यांचा अर्थकारण चालतं.

तसंच, आपल्याकडे दिवाळी किंवा इतर धार्मिक सणांच्या माध्यमातून जशी बाजारपेठ चालते, तसे बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांची बाजारपेठ आहे.

आर्थिक गणिताकडे पाहिलं तर हे लक्षात येतं की, बैल शर्यतीत धावतो. त्यावेळी त्याची किंमत वाढते. त्याचा एक खरेरीदार वर्ग निर्माण होतो.

तर अशी आहे बैल आणि बैलगाडा शर्यतीचं अर्थकारण.

शेवटी पुन्हा हरण्या बैलाकडे यायचं झाल्यास, हरण्या बैलाला 35 लाखांएवढी चांगली किंमत आली असली तरी पाटलांना तो विकायचा नाहीय. बैलांचा नाद करत त्यांना शर्यतीतला मान आणि समाधान महत्त्वाचं वाटतंय.

 

विजय जाधव

English Summary: Know about bull and economic
Published on: 24 January 2022, 06:57 IST