Agripedia

बदलत्या हवामानाचा (Climate change) परिणाम इतर पिकांप्रमाणे केळीवरही दिसू लागला आहे परंतु हा परिणाम मिश्र स्वरूपाचा आहे.

Updated on 12 March, 2022 3:25 PM IST

बदलत्या हवामानाचा (Climate change) परिणाम इतर पिकांप्रमाणे केळीवरही दिसू लागला आहे परंतु हा परिणाम मिश्र स्वरूपाचा आहे. 

वाढत्या तापमानामुळे तसेच सोसाट्याच्या वा-यामुळे झाडे उन्मळून पडणे, घड अडकणे,घड लवकर निसवणे,घडामधील फण्यांच्या तसेच फण्यांमधील केळीच्या संख्येत वाढ झाल्याचे प्रकार दिसू लागले आहेत.

रोगांमध्ये इर्वेनिया रॉट (Erwinia rot) पोंगासड (CMV) या रोगांचा प्रादुर्भाव तसेच तीव्रतेत वाढ झाल्याचे दिसते. किडींमध्ये खोडकिडा, स्पॉटेड बग (Spotted bug) व फळमाशी यांच्या प्रादुर्भावात वाढ होत आहे. 

मजुरी खर्च व मजुरांचा तुटवडा यामुळे केळी उत्पादन खर्चात वाढ होत आहे. सतत कोसळत्या बाजारभावाला पर्याय म्हणून केळीवरील मूल्यवर्धित तंत्रज्ञानाची तसेच प्रक्रिया तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे.

केळी उत्पादनातील ही आव्हाने पेलण्यासाठी केळी संशोधन केंद्र,जळगाव येथे अल्प, मध्यम तसेच दीर्घकालीन नियोजित संशोधन चाचण्यांची आखणी संशोधन संचालकांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष २0२४ पर्यंत करण्यात आलेली आहे. 

केळी संशोधन केंद्र, जळगाव येथे ज्या संशोधन चाचण्या शिफारशीसाठी अंतिम टप्प्यात आहे त्यामध्ये केळी मध्ये चंदेरी /काळा प्लॅस्टिक कागदाचे हवामानात जून / ऑक्टोबर शिवाय इतर नेमक्या, महिन्यात लागवडीची केळीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर यांचा समावेश आहे.

अधिक उत्पादन सोसाट्याच्या वा-यांना, जमिनीत कमी ओलाव्याला ही जात बळी पडते आणि झाडे उन्मळून पडतात. याशिवाय घड धारणेच्या अवस्थेत या जातीची झाडे कंबरेतून मोडतात. या जातीला पर्याय म्हणून या संशोधन केंद्राने सर्वेक्षणातून निवड पद्धतीने बुटक्या व कमी कालावधीत अधिक दर्जेदार उत्पादन देणारा

तसेच सोसाट्याच्या वा-याला, अधिक तापमान व करपा रोगाला सहनशील क्लोन (Clone) ची निवड केली असून हे नवीन सुधारित 'वाण' म्हणून प्रसारित करण्याच्या दृष्टीने अंतिम टप्प्यात आहे. 

केळी उत्पादनातील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने केळी आंतरमशागतीतील विविध कामांमध्ये यांत्रिकीकरणासाठी

उदा. घडांना आधार, घडांना स्कटॉँग बॅगचे आवरण घालणे, घड कापणी, घड कापणीनंतर उभ्या खांबांना कापणे आणि त्याचा लगदा करणे, जमिनीखालील कंद बाहेर काढणे (Cump remover) या बाबीवर कृषि अभियांत्रिकी शाखेतर्गत संशोधन आखण्यात आलेले आहे. 

महाराष्ट्रात केळी पिकावर संशोधन करणारे एकमेव केळी संशोधन केंद्र, जळगावने आजतागायत केळी उत्पादक शेतक-यांना अनेक संशोधनपर महत्वाच्या शिफारशी देऊन एकूण विक्रमी केळी उत्पादनात मोलाचा वाटा उचललेला आहे. 

केळी संशोधन केंद्र, जळगाव येथे ज्या संशोधन चाचण्या शिफारशीसाठी अंतिम टप्प्यात आहे त्यामध्ये केळी मध्ये चंदेरी /काळा प्लॅस्टिक कागदाचे हवामानात जून / ऑक्टोबर शिवाय इतर नेमक्या, महिन्यात लागवडीची केळीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर यांचा समावेश आहे.

केळी संशोधन केंद्र, जळगावचे बळकटीकरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे. संशोधनासाठी मूलभूत सोयीने सज असलेले हे संशोधन केंद्र पुढेही केळी उत्पादनातील समस्या सोडविण्यासाठी इतर तत्सम संस्थांबरोबर सक्षम राहील.

 

(माहिती संदर्भ-कृषी विभाग, महाराष्ट्र शासन)

English Summary: Know about banana crop futures ways
Published on: 12 March 2022, 03:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)