Agripedia

भाजीपाला ची लागवड करताना कधीही बाजारपेठेची मागणी लक्षात घेणे फार गरजेचे असते. त्यानुसार भाजीपाला पिकांच्या जातींची निवड,त्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन,खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड रोग नियंत्रण यावर भर देणे फार महत्त्वाचे असते. भाजीपाला पिकांमध्ये अशा काही भाजी आहेत की ज्या फार कमी वेळेत व कमी खर्चात जास्तीचे उत्पादन मिळवून देऊ शकतात.परंतु अशा भाज्यांची लागवड बाजारपेठेचा अचूक अंदाजघेतल्यावरच करावा. त्या लेखात आपण अशा भाज्या विषयी माहिती घेणार आहोत.

Updated on 26 September, 2021 3:35 PM IST

 भाजीपाला ची लागवड करताना कधीही बाजारपेठेची मागणी लक्षात घेणे फार गरजेचे असते. त्यानुसार भाजीपाला पिकांच्या जातींची निवड,त्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन,खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड रोग नियंत्रण यावर भर देणे फार महत्त्वाचे असते. भाजीपाला पिकांमध्ये अशा काही भाजी आहेत की ज्या फार कमी वेळेत व कमी खर्चात जास्तीचे उत्पादन मिळवून देऊ शकतात.परंतु अशा  भाज्यांची लागवड बाजारपेठेचा अचूक अंदाजघेतल्यावरच करावा. त्या लेखात आपण अशा भाज्या विषयी माहिती घेणार आहोत.

  कमी वेळात येणारे भाजीपाला

  • मेथी:

जर मेथीचे लागवड टप्प्याटप्प्याने करून वर्षभर बाजारात  सतत पुरवठा केला तर चांगले उत्पन्न हातात देऊ शकते मेथीची लागवडकरण्यासाठीमध्यमकाळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. मातीचा सामू हा सात ते साडेसात पर्यंत असावा. 10 ते 12 टन शेणखत प्रति हेक्‍टरी द्यावे.

मेथीच्या सुधारित जाती

  • कसुरी मेथी – ही माहिती अधिक सुगंधित आणि स्वादिष्ट असते. कसुरी मेथी मध्ये कसुरी सिलेक्शन एक सुधारित जात आहे. या जातीचे अनेक खुडे घेता येतात.
  • पारंपारिक जाती –यामध्येपुसाअर्लीबंचिंगहे सुधारित जात आहेत. आपल्या महाराष्ट्रात मेथी नंबर 47 ही जात मोठ्या प्रमाणात लावली जाते बऱ्याच ठिकाणी स्थानिक जातींची लागवड केली जाते.

2-पालक-

पालकलागवडीसाठीमध्यमकाळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्‍यक असते.

 पालकच्या सुधारित जाती

 ऑल ग्रीन,पुसा ज्योती, पुसा हरित या पालक च्या चांगल्या जाती आहेत.

पालकची लागवड पद्धत

पालकाची लागवड ही तीन मीटर बाय दोन मीटर आकाराच्या सपाट वाफ्यांमध्येदोन ओळींमध्ये 15 सेंटिमीटर अंतर ठेवून करावी.फॅक्टरी आठ ते दहा किलो बियाणे लागते.कॅप्टन तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. पालकचा काढणी कालावधी 90 ते 115 दिवसांचाआहे.हेक्‍टरी 15 ते 20 टन उत्पादन मिळते.

कोथिंबीर –

लाम.सी.एस -2,4,6,  व्ही-1, व्ही-2,को-1 तमिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेले असून देण्यासाठी चांगलीआहे.

 कोथिंबीरीची लागवड ही तीन मीटर बाय दोन मीटर आकाराच्या सपाट वाफे मध्ये करावी. दोन ओळींमध्ये पंधरा सेंटीमीटर चे अंतर ठेवून लागवड करावी. हेक्‍टरी 60 ते 70 किलो बियाणे लागते व कालावधी हा पन्नास ते 65 दिवसांचा आहे. कोथिंबीरीचे हेक्‍टरी 70 ते 130 टन उत्पादन मिळते.

  • अळू–

अळू लागवडीसाठी मध्यम प्रतीची,  उत्तम पाण्याचा निचरा होणारी व जमिनीचा सामू हा सात ते साडेसात पर्यंत असणारी जमीन असावी. अळूची लागवड करण्याअगोदर जमिनीची मशागत करताना हेक्‍टरी दहा टन शेणखत मिसळावे. 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 80 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. नत्र व पालाश ही खते तीन समान हप्त्यांमध्ये लागवडीच्या वेळी आणि त्यानंतर दीड महिन्याच्या अंतराने द्यावे. स्फुरदयुक्त खते लागवडी वेळी द्यावीत.

 अळूच्या कोकण हरित पर्णी ही सुधारित जात आहे.

लागवडीसाठी जवळजवळ बारा हजार ते 13 हजार कंद प्रति हेक्‍टरी लागतात. लागवडीसाठी कंदांची निवड करताना ती निरोगी असावी त्या पद्धतीने करावी. आळूची लागवडीची उत्तम वेळही जून ऑगस्ट किंवा सप्टेंबर ऑक्टोबर ही आहे.

 लागवडी सरी-वरंबा पद्धतने करावी. आंतर मशागत त्यामध्ये प्रामुख्याने 20 ते 30 दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करावी. पिकाला गरजेनुसार पाणी  द्यावे.

 

 आळूची काढणी

 पानांचा उपयोग करावयाचा असल्यास दोन ते अडीच महिन्यानंतर तोडणी करावी. अशी तोडणी आठ ते नऊ महिने करता येते. कंदाचा वापर करायचा असल्यास सहा महिन्यात कंद तयार होतात.

चुका

 ही भाजीपाला वर्गीय भाजी पेरणीनंतर सुमारे 50 ते 60 दिवसांनी कापणीसाठी तयार होते. यावेळी जमिनीलगत कापणी करावी. या पालेभाजीचे चार ते पाच तोडे मिळू शकतात. जुड्या बांधून भाजी विक्रीसाठी पाठवावी.

चाकवत

 बी पेरणीनंतर 35 ते 40 दिवसात भाजी काढण्यासाठी तयार होते. भाजी कापून किंवा उपटून जुड्या बांधून विक्रीसाठी पाठवावेत.

 

English Summary: kind of vegeteble cultivate in short timing give more benifit
Published on: 26 September 2021, 03:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)