Agripedia

खरिपाच्या पेरणीचे दिवस उंबरठ्यावर आहेत मान्सून केरळ मध्ये दाखल झाल्याचे भारतीय हवामान संकेत देत आहे

Updated on 10 June, 2022 7:27 PM IST

खरिपाच्या पेरणीचे दिवस उंबरठ्यावर आहेत मान्सून केरळ मध्ये दाखल झाल्याचे भारतीय हवामान संकेत देत आहे शेतकरी बांधवांची आपल्या शेतात खरीप पीक नियोजनाची तयारी जोरात चालू आहे बियाणे उपलब्धता बाबत मार्केट मध्ये चौकशी करत आहे गेल्या 12 वर्षाचा माझा विस्तार कामाचा तुमच्या सोबतचा अनुभव सांगतो की बऱ्याच वेळेस आपण पाऊस सुरू झाला की शेतात पेरणीची घाई करतो पण या वर्षी थोडे सावध रहावे लागणार आहे त्याचे महत्वाचे कारण म्हणजे खरिपातील सर्वच पिकाचे प्रतिकिलो दर वाढलेले आहे शिवाय काही पिकाचे बियाणे सध्या तरी तुटवडा असल्याचे भासत आहे

अर्थात ही प्राथमिक अवस्था आहे त्यामुळे बियाणे योग्य ठिकाणी योग्य ओलित स्थिरावल्याशिवाय चांगली उगवण होत नाही या वर्षीचा उन्हाळा फार मी मी म्हणणारा होता त्यामुळे पहिले एकदोन पाऊस पडल्यावर देखील जमीन लगेच कोरडी होईल इतकी धरती माता तप्त झालेली आहे शिवाय लागवडी नंतर पाऊस येईल असे वातावरण हवे त्यामुळे या वर्षीच्या खरीप पेरणीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे पेरणीपूर्वी काही बाबीवर आपण डोळस विचार करा 1 एकच पीक किंवा एकच वान असा आग्रह धरू नका 2 आंतरपीक घेण्याकडे कल असावा

3 पेरणीसाठी रुंद वरंबा सरी या पद्धतीचा विचार कर 4 पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्य करा यासाठो शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करा 5 बीटी कापूस लागवडीसाठी आपला गावातील,स्वतःचा मागील अनुभव महत्वाचा राहील 6 कडधान्य पिकाची सलग व अंतरपिकासाठी निवड करा 7 तणनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा8 पेरणीसोबत बेसलडोसचा अवश्य वापर करा आपण बऱ्याच वेळेस विशेषतः बीटी कापूस पिकासाठी एक महिन्याचे झाल्यावर खतदेण्याचे करता पण ते योग्य नाही 

कापूस पिकास चाळीस दिवसाने पाते येतात त्यामुळे खते ही पेरणीसोबत देण्याचे नियोजन करा 9 कापूस पिकावर गुलाबी बॉण्ड अळी आणि मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी या किडीच्या व्यवस्थापणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन सूत्र अवलंब करा 10 कोरडवाहू साठी तूर बिडीएन 711 आणि सिंचन व्यवस्था असेल तर गोदावरी या वाणाचा वापर करा 11 तीच जमीन आणि तेच पीक असे नियोजन करू नका पीक फेरपालट सूत्र अवश्य अंमलबजावणी करा 

 

अधिक माहितीसाठी संपर्क जरूर करा

डॉ सूर्यकांत पवार 9422178982

रामेश्वर ठोंबरे

विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र औरंगाबाद

English Summary: Kharif sowing should not be rushed without adequate rainfall
Published on: 10 June 2022, 07:27 IST