Agripedia

पूर्व हंगामी पावसाला सुरुवात झाली की नियत्रंण करण्याची योग्यवेळ आहे. या काळात अगदी कमी खर्चात आपण हुमणी किडीचे नियंत्रण प्रकाश सापळेद्वारे करू शकतो. पूर्व हंगामी पावसाळा काळात हुमनी किडीचे प्रजनन काळ चालू होतो. या काळात हुमनी किडीचे काळ्या व करड्या रंगाचे (शेण किडे) भुंगेरे प्रजनन करीता बाहेर पडण्यास मोठ्या प्रमाणात सुरूवात होते.

Updated on 27 June, 2021 10:16 PM IST

पूर्व हंगामी पावसाला सुरुवात झाली की नियत्रंण करण्याची योग्यवेळ आहे. या काळात अगदी कमी खर्चात आपण हुमणी किडीचे नियंत्रण प्रकाश सापळेद्वारे करू शकतो. पूर्व हंगामी पावसाळा काळात हुमनी किडीचे प्रजनन काळ चालू होतो. या काळात हुमनी किडीचे काळ्या व करड्या रंगाचे (शेण किडे) भुंगेरे प्रजनन करीता बाहेर पडण्यास मोठ्या प्रमाणात सुरूवात होते.

त्यावेळेस शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील कडूलिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली अत्यंत अल्प खर्चाचा प्रकाश सापळा तसेच एरंड आंबवण सापळा (एरंडीच्य बिया भरडून रात्रभर पाण्यात भिजवून एका पसरट भांड्यात ठेवावे) आजपासूनच़ चालू करून भुंगेरे अवस्थेत या किडीचे अत्यंत कमी खर्चात नियंत्रण करुया.

एकात्मिक व्यवस्थापन

उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी.
मे-जून महिन्यांत पहिला पाऊस पडताच भुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुनिंब इ. झाडांवर पाने खाण्यासाठी व मीलनासाठी जमा होतात. झाडावरील भुंगेरे रात्री 8 ते 9 वाजता बांबूच्या काठीने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावेत. ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. या प्रक्रिया प्रादुर्भाव प्रक्षेत्रातील शेतक-यांनी सामुदायिकपणे केल्यास अधिक फायदा होतो.
जोपर्यंत जमिनीतून मुंगेरे निघत आहेत, तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवावा.

प्रकाश सापळेद्वारे नियत्रंण फायदे

प्रकाश सापळा म्हणजे कडुलिन्ब किंवा बाभळीच्या झाडाखाली एक बल्ब ( वीजेचा किंवा चार्जिंग बॅटरीचा ) लावून त्या खाली मोठ्या घमेल्यात किंवा सपाट वाफा बनवून पाणी सोडणे आणि त्यात 1 लिटर डिझेल किंवा रॉकेल किंवा पेट्रोल मिसळणे त्यात हुमाणीचे भुंगेरे पडून मरून जातात एका प्रकाश सापळ्यात दररोज किमान 100 भुंगेरे अडकून पडून मरून जातात आणि एक मादी भुंगेरा 50 ते 60 अंडी घालून त्यातून किमान 50 हुमनीच्या आळी तयार होतात अशाप्रकारे 100 मादी भुंगेरे जर प्रकाश सापळ्यात मरून गेले तर एका सापळ्यामुळे जवळपास 5000 हुमनीची अळी कमी खर्चात नियंत्रीत होणार आहे. एका गावात किमान 10 शेतकऱ्यांनी जरी सापळे लावले तरी 50,000 हुमनी अळ्या आपण नष्ट करू शकतो.

शेतकरी बंधूंनो सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे हुमानीचे भुंगेरे मान्सून पाऊस सुरू होइपर्यंतच़ म्हणजेच 20 ते 25 जूनपर्य़ंत दिसतील त्यांनतर त्यांची अंडी अवस्था व अळी अवस्था सुरू होईल आणि या अवस्थेत हुमनी आळी नियंत्रीत करणे अत्यंत खर्चिक, अवघड होऊन जाते आणि हे तुम्हाला सांगायची गरज नाही.

 

एरंडी अंबावन सापळे
एरंडीच्या बीया 2 किलो
बेकरीतील 25 ग्रँम इस्ट पावडर मिसळून घ्यावे.
50 ग्रँम बेसन पीठ
1 ते 1.5 लिटर पाणी

वरील मिश्रण ओतून ढवळून घ्यावे. हे आमिष एका पसरट मातीचे मडके किंवा भाड्यात मध्ये द्रावण आंबवून घेतल्यानंतर त्या मडके मध्ये उर्वरित पाण्याने भरून ते मडके किंवा पसरट भांडे किंवा पसरट हौद गतवर्षी हुमणीग्रस्त झालेल्या क्षेत्रातील किंवा शेतातील कडूलिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली मडक्याचे तोंड उघडे ठेऊन पुरावे.

 

मागील दोन वर्षापासून बदलते हवामान तसेच उन्हाळा मधला अवकाळी पाऊस यामुळे आपल्या भागातील प्रमुख पिकावर हळद ऊस सोयाबीन आणि अदरक मोठ्या प्रमाणात हुमनीचा प्रादुर्भाव झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठे नुकसान व खर्च हुमानी नियत्रंण वर झाला होता.म्हणूनच आपल्या सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे.

आजपासूनच कमीत-कमी प्रती हे. ५ प्रकाश सापळे तरी आपली शेतातील कडूलिंब आणि बाभळीच्या झाडाजवळ लावावेत चला तर मग मोठ्या प्रमाणात आपल्या गावात प्रकाश व एरंडी बियाणे अंबावण सापळे लावूया आणि हुमनी नियंत्रण मोहीम यशस्वी करूया.

लेखक- प्रविण. सरवदे कराड
प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Kharif Season Preparation: Control of Humani insects by light traps
Published on: 27 June 2021, 10:02 IST