Agripedia

मौजे. घुंगर्डे हादगाव येथे बुधवार दिनांक 8/6/2022 रोजी खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळावा कृषि विभाग, अंबड

Updated on 11 June, 2022 1:50 PM IST

मौजे. घुंगर्डे हादगाव येथे बुधवार दिनांक 8/6/2022 रोजी खरीप हंगाम पूर्व शेतकरी मेळावा कृषि विभाग, अंबड व इफको खत कंपनी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंडळ कृषि अधिकारी शहागड श्री. श्रीपाद शेळगावकर,कृषि पर्यवेक्षक श्रीमती शुभांगी शिंदे व इफको कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक श्री.साकळे सर हे उपस्थित होते.या प्रसंगी खरीप हंगामातील कापूस पिकाबाबत मार्गदर्शन करताना कृषि सहाय्यक श्री अशोक सव्वाशे म्हणाले कि, पाण्याची उपलब्धता व जमिनीच्या मगदूर यानुसार योग्य कापसाच्या बियाणाची निवड करावी,

एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड व्यवस्थापन, कृषि निविष्ठा खरेदी करते वेळी अधिकृत विक्री केंद्र कडून पक्के बिल घ्यावे, जोडओळ पद्धतीने लागवड करताना दोन ओळीतील व झाडातील योग्य अंतर ठेवावे तसेच कामगंध सापळे, पिवळे व निळे चिकट सापळे, सापळा पिके, ५ टक्के निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यांचा वापर करून रासायनिक किटकनाशकावरील ख़र्च कमी करावा या बाबत आवाहन केले.कृषि सहाय्यक श्री प्रविण सानप साहेब मेळाव्यास मार्गदर्शन करताना म्हणाले कि, सोयाबीन पिकातील कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन घेण्या साठी घरगुती बियाणाची प्रतवारी करणे, बियाणांची उगवण क्षमता तपासून पाहणे,

बीज प्रक्रिया करणे, बी बी एफ यंत्र लागवड आणि टोकण पेरणी पद्धत, लागवड अंतर, पेरणीची खोली, एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड व्यवस्थापन या अष्ट सुत्रीचा वापर शेतकऱ्यांनी करावा म्हणजे उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ होते तसेच इफको कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री. अशोक साकळे साहेब, यांनी इफको कंपनीच्या कार्य पद्धती विषयी व नव्याने बाजारात आलेल्या नॅनो यूरिया विषयी शेतकरी बंधूना मार्गदर्शन केले. नॅनो यूरियाची अर्धा लिटरची बाटली पारंपारिक यूरियाच्या एका पोत्याएवढे पोषक तत्व देते. पिक उत्पादनासाठी फायदेशीर आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल असे नॅनो यूरिया देशातील कृषि क्षेत्राचा कायापालट करू शकते तसेच नॅनो यूरियाच्या वापरामुळे पर्यावरण,

पाणी आणि मातीचे प्रदूषण ही होणार नाही व बाटली स्वरूपात मिळणार असल्याने साठवणूक साठी लागणारे गोदाम, वाहतुक आदींच्या खर्चात ही बचत होणार आहे. येत्या खरीप हंगामात सर्व पिकांना वाढीच्या अवस्थेत फवारणीसाठी फायदेशीर ठरणार आहे.कार्यक्रमाच्या शेवटी केलेल्या मार्गदर्शनाच्या बाबत प्रश्नमंजुषा घेण्यात आली व उत्तर देणाऱ्या शेतकरी बांधव यांना छत्री वाटप करण्यात आली. सदरील कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन कृषि सहाय्यक श्री गोवर्धन उंडे यांनी केले तर यावेळी कार्यक्रमाला सावता काळे(Agricoss )श्री.कोळेकर, श्री. बाबूराव कदम, उद्धवसिंग चव्हाण, ज्ञानेश्र्वर देशमुख, राजुसिंग पवार, गणेश फिस्के, प्रेमसिंग परिहर, परभतसिंग परिहार, रतन सिंग कचोर, प्रदीप जोशी, कबिरसिंग पवार आणि बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थित लाभली होती.

English Summary: Kharif season pre-farmers meet held at Ghungarde Hadgaon.
Published on: 11 June 2022, 01:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)