Agripedia

कडूनिंबाच्या पिकलेल्या फळांपासून तयार होणारा हा अर्क मावा, तुडतुडे, अमेरिकन बोंडअळी, पाने पोखरणारी व देठ कुरतडणारी अळी, फळमाशी, खोडकीडा इत्यादी किडींवर अत्यंत प्रभावी आहे. ५% प्रमाणात फवारणी केल्यास हे किड नियंत्रण सुनिश्चित करता येते.

Updated on 23 May, 2025 5:15 PM IST

रासायनिक कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे पिकांचे नुकसान, मातीच्या गुणवत्तेचा ऱ्हास, मानवी आरोग्यावर दुष्परिणाम आणि पर्यावरणीय संकटे या समस्या गंभीर बनल्या आहेत. यावर एक नैसर्गिक, प्रभावी किफायतशीर उपाय म्हणजे निंबोळी अर्क. हे किटकनाशक घरच्या घरी तयार करता येते, तेही कोणताही अतिरिक्त खर्च करता.

निंबोळी अर्क म्हणजे काय?

कडूनिंबाच्या पिकलेल्या फळांपासून तयार होणारा हा अर्क मावा, तुडतुडे, अमेरिकन बोंडअळी, पाने पोखरणारी देठ कुरतडणारी अळी, फळमाशी, खोडकीडा इत्यादी किडींवर अत्यंत प्रभावी आहे. % प्रमाणात फवारणी केल्यास हे किड नियंत्रण सुनिश्चित करता येते.

घरच्या घरी निंबोळी अर्क तयार करण्याची सोपी पद्धत :

. निंबोळ्यांची तयारी : बांधावर किंवा रस्त्याच्या कडेला पडलेल्या पिकलेल्या निंबोळ्या गोळा करा. त्यातील साल गर काढून फक्त बिया स्वच्छ धुवून सावलीत वाळवा. कोरड्या ठिकाणी साठवून ठेवा.

. निंबोळी पावडर तयार करणे : या बिया खलबत्यात किंवा पल्वरायझरमध्ये बारीक करून किलो पावडर तयार करा. ती लिटर पाण्यात भिजवा. दुसऱ्या भांड्यात लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा भिजत ठेवा.

. अर्क तयार करणे : दुसऱ्या दिवशी निंबोळी अर्क कपड्यातून गाळा. त्यात साबणाचे द्रावण मिसळा. हे मिश्रण ९० लिटर पाण्यात मिसळून १०० लिटर फवारणीयोग्य द्रावण तयार करा.

  • फायदे :
  • प्रभावी कीड नियंत्रण
  • अत्यल्प खर्च
  • सहज उपलब्ध घरच्या घरी तयार करता येणारा उपाय
  • पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी सुसंगत
  • उत्पादन खर्चात बचत, नफ्यात वाढ

निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करावा. बाजारातील दर्जाहीन सेंद्रिय किटकनाशकांपेक्षा घरचा अर्क अधिक प्रभावी सुरक्षित ठरतो.

शेतकरी बंधूंनो,

स्वतःच्या शेतात निंबोळी अर्क वापरून कीड नियंत्रण करा, पर्यावरणाचे रक्षण करा आणि शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारा.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा :
तालुका कृषि अधिकारी / मंडळ कृषि अधिकारी / कृषि सहाय्यक
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.

English Summary: Kharif Season Awareness Prepare neem extract at home effective and eco-friendly insecticide
Published on: 23 May 2025, 05:15 IST