Agripedia

बरेच शेतकरी मला कापूस वाण बाबतची माहिती विचारत आहेत, आपल्या भगवती सीड च्या 40 ग्रुप्स वर महाराष्ट्रातील कापूस

Updated on 01 May, 2022 7:42 PM IST

बरेच शेतकरी मला कापूस वाण बाबतची माहिती विचारत आहेत, आपल्या भगवती सीड च्या 40 ग्रुप्स वर महाराष्ट्रातील कापूस पिकविणाऱ्या सर्व जिल्ह्यातील शेतकरी आहेत , वेगवेगळ्या जिल्ह्यात भौगोलीक आणि हवामानाच्या, परिस्थितीनुसार ,जमिनीच्या प्रतवारी नुसार, सिंचनाच्या सोयीनुसार कापसाच्या वेगवेगळ्या जाती प्रचलित आहेत,त्यासाठी आपापल्या भागात जे वाण प्रचलित असेल ते ह्या वर्षी आपण लागवड करावे. बागायती साठी 150/155 दिवसात येणाऱ्या आणि कोरडसाठी 140 दिवसात येणाऱ्या कापसाच्या जातींची लागवड करावी ,कापसाचे बीटी वाण कोणतेही असले तरी त्याला भरपूर फुलपाती लागते ,२00/300 नक्कीच लागते ,पण ती गळून पडते सर्व फुलपाती झाडावर टिकत नाही,आपल्या नियोजन आणि व्यवस्थापनातील चुका त्याला कारनिभूत आहेत.

   सकाळी उठल्यापासून आपण आपल्या पोटाची जशी वेळोवेळी काळजी घेतो, व तसा आहार घेतो.तशी काळजी पिकांचीही घेतली पाहिजे. कापसाचे 100% उत्पादन हे वानावर अवलंबून आहे असे नाही, तर 80% आपल्या सर्व प्रकारच्या नियोजनावर, व व्यवस्थापनावर, आणि, 20% वानावर अवलंबून असते.त्यासाठी योग्य वेळी पेरणी, प्रत्येक ठिकाणी फक्त एकच रोप ठेवणे,

कृषी खात्याने शिफारस केलेल्या खतांचे डोस वेळेवर देणे, कीटक नाशकांची योग्य वेळी व योग्य त्या कीटकनाशकांची फवारणी, सतत वापसा स्थितीतच पाण्याचे/सिंचनाचे नियोजन,आंतर मशागत,शेत तणविरहित ठेवणे, सगळ्यात महत्वाचे आहे.त्यासाठी कृषी सेवा केंद्र संचालक, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, तद्न्य व प्रगतीलशील शेतकरी, तद्न्य मार्गदर्शक यांचा सल्ला घ्यावा. सर्व प्रकारचे नियोजन व व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास तुम्ही कोणतीही बीटी कापसाची व्हरायटी लावल्यास चांगले उत्पन्न येते, थोडक्यात सांगायचे झाल्यास नियोजनाच्या बाबतीत वेळ,योग्य ती खते, औषधी,पाणी,मशागत केल्यास कोणत्याही व्हरायटीचे चांगले उत्पन्न घेता येते.

ग्रुप्स वरील बऱ्याच शेतकाऱ्यांची अपेक्षा अशी आहे की मी, कोणते वाण चांगले आहे ते सांगावे, मित्रानो मी वर सांगितल्या प्रमाणे तुम्ही कोणतेही कापसाचे वाण लावा सर्व प्रकारचे व्यवस्थापन व नियोजन योग्य पद्धतीने करा, सर्वच कापूस वाणांचे उत्पन्न चांगले येते, आपल्या भगवती सीड्सच्या सर्वच ग्रुप्स वर तुम्हाला पाहिजे ते मार्गदर्शन व सल्ला मिळेल.

 आपल्या माहिती साठी एक गोस्ट सांगतो कोणतेही नवीन कापूस वाण 5/6 वर्ष चांगले व जास्त उत्पन्न देते आणि हळूहळु त्याची उत्पादनक्षमता 5 वर्षानंतर कमी कमी होत जाते, त्यासाठी दर 4/5 वर्षांनी आपण नवीन बियाणे शोधून त्यांची लागवड केली पाहिजे,कंपन्या सांगतात पाच ग्रॅम चे 6,7 ,8,ग्रॅम चे बोडाचे वजन आहे , इतके वजन फक्त खालच्या बाजूला लागलेल्या व पहिल्या बहराचे व पहिल्या थरातील बोडाचे असते, बाकी शेंड्याकडच्या बोडाचे वजन कमी कमी होत जाते ,सरासरी कमीत कमी साडेचार ग्रॅम समजून चालावे.एका झाडाला 80/100 कैरी असली तर त्यापासून 350 ते 400 ग्रॅम कापूस मिळतो.त्यासाठी कापूस पीक दाटले जाऊ नये

 व बागायती कापसाची झाडांची एकरी संख्या साधारणतः 4400 ते 5500 च्या दरम्यान ठेवावी.आणि कोरड साठी 7000 ते 8000 ठेवावी.आपल्या जमिनीची सुपीकता व प्रकार या नुसार अंतर ठेवून लागवड करावी.

 मित्रानो संपूर्ण देशभरात 150 /200 परवाना धारक कंपन्या कापूस बियाण्याचा व्यवसाय करतात, याव्यतिरिक्त 100 पेक्षा जास्त कंपन्यांचे इल्लीगल बियाणे मार्केट मध्ये विकले जाते, सर्व मिळून 1000/1200 प्रकारचे कापूस बियाणे देश भरात विक्री केले जाते.त्यात चांगले कोणते हे ठरविणे जिकिरीचे काम आहे,मी वर सांगितल्या प्रमाणे उत्पादनात 80% आपले नियोजन/व्यवस्थापन ला महत्व आहे व 20% बियांन्या लाआहे.

इल्लीगल कापूस बियाण्याची अजिबात लागवड करू नका, बीटी कापूस जरशी गायी सारखा खादाड आहे, त्याला जितके संतुलित अन्न द्रव्ये पुरवली तितकि त्याच्या उत्पादकतेत वाढ होते.  मित्रानो आपल्या भागात प्रचलित वाणांची लागवड करावी, नवीन वाण 1/2 बॅग ट्राय करा व पुढच्या वर्षी जास्त लागवड करा.

ग्रुप मधील बरेच शेतकरी मला चांगले बियाणे कोणते ते सांगा असे प्रश्न विचारतात, ह्या वर्षी खालील कापूस वानचे अनुक्रमने सगळ्यात चांगले उत्पन्न मिळाले आहे.

1) V555आणि V111

2) अग्रितोप् 777(ओरिजनल 777)

अग्रितोप् 444(ओरिजनल 444)

टीप ऍग्रिटोप च्या वरील दोन व्हारायट्या 777 आणि 444 मागच्या वर्षी ट्रायला दिलेल्या होत्या ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाची परमिशन मिळाली आहे, त्या विक्रीस उपलब्ध होतील. अग्रितोप् 777 आणि 444 हे 2 वाण महाराष्ट्र तील अनेक् शेतकऱ्यांनी लागवड करून अनुभव घेतलेला आहे.

3)एक्को 4)नामकॉत् 615

5)ध्रुवगोल्ड,6)गुरू11

7)नायक, 8)मोक्ष 9)धन्देव्, 10)जंगी

 इ. आहेत. या 10/11 वानाचि लागवड करा, निश्चित उत्पन्न चांगले मिळेल. या व्यतिरिक्त तुमच्या भागातील प्रचलित वाण लागवड करावी.कंपन्या च्या भंपक जाहिराती ना अजिबात बळी पडू नये.वर सांगितलेले कापसाचे 10 प्रकारचे बियाणे मिळाल्यास माझ्या विस्वासावर लागवड करा निश्चितच फायदेशीर ठरेल. 

 

श्री शिंदे सर 

भगवती सिड्स,चोपडा, जिल्हा जळगाव,

 भ्रमणध्वनी - 9822308252

English Summary: Kharif season 2022 for Bhagwati seeds cotton and seeds advice
Published on: 01 May 2022, 07:36 IST