Agripedia

नुकताच पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर,सांगली व कोकणात चिपळूण,महाडमध्ये महापूर येऊन गेला.सर्वात जास्त नुकसान हे शेती क्षेत्राचे झाले. सर्व स्तरावरून जीवनमान पूर्वस्तरावर आणण्याचे प्रयत्न चालू असले तरी न भरून निघणारे नुकसान हे झालेच. सर्व परिस्थिती लवकर पूर्वपदावर येवो होच ईश्वरचरणी प्रार्थना..

Updated on 05 October, 2021 8:41 AM IST

पावसाने उघडीप दिल्याने विविध किडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. 

थोडक्यात हुमणी किडीचे जीवनचक्र:-

हुमणी किडीचे जीवनचक्र मुख्यतः भुंगा- अंडी- अळी (हुमणी)-कोष आणि पुन्हा भुंगे अशा प्रकारे हुमणी किडीची जीवनसाखळी पूर्ण होते.भुंगा अवस्था मार्च-एप्रिल मध्ये पडलेल्या वळीव पावसानंतर जमिनितील भुंगे सक्रिय होऊन कडूलिंब,वड,बाभूळ या झाडांवर पाने खाण्यासाठी जमा होतात. भुंगे काळे टपोरे असतात त्यानंतर नर मादी भुंग्याचे मिलन होऊन मादी अंडी घालण्यासाठी जमिनीत जातात.एक मादी भुंगा 60 ते 70 अंडी घालतो. तर नर भुंगा लगेच मरून जातो. हे सर्व जून महिन्यापर्यंत चालू असते त्यानंतर अंड्यातून हुमणी बाहेर पडते.

सुरवातीस सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करते मग थोडी मोठी झाल्यानंतर पिकांच्या मुळावर हल्ला करते.हुमणीचे डोके काळे किंवा राखडी रंगाचे असते.डिसेंबर महिन्याअंती हुमणीची पूर्ण वाढ झालेली असते.मग पूर्ण वाढ झालेली हुमणी कोषावस्थेत जाते.अळी स्वतः भोवती द्रव स्त्राव करून आजूबाजूच्या मातीने टणक आवरण बनवते.आतमध्ये कोषावस्थेत जाते.राखाडी रंगाचा कोष असतो. पुढे 20 ते 25 दिवसानंतर कोषातून भुंगा बाहेर पडतो.कोषातून बाहेर आलेला भुंगा जमिनीमध्येच राहतो.जेव्हा पुन्हा चांगला वळीव पाऊस होईल तेव्हाच ते भुंगे जमिनीबाहेर पडतात.अशा प्रकारे हूमनीची एका वर्षात एक पिढी जन्म घेते. 

पावसाळ्यातील हूमनीचे व्यवस्थापन:-

सध्या हुमणी किडीची भुंगा अवस्था कमी झाली आहे.तर हुमणीअळी अवस्थेची सुरवात होतेय. जर आपण उन्हाळ्यामध्ये पडलेल्या वळीव पावसानंतर कामगंध सापळे,प्रकाश सापळे वापरून किंवा कडुलिंबाच्या झाडावर येणारे भुंगे वेचून नष्ट केले असतील तर आपल्या क्षेत्रात हुमणी ची अळी अवस्था खूप कमी प्रमाणात दिसेल कारण भुंगा ही एकमेव अवस्था आहे जी जमिनी बाहेर असते आणि हीच अवस्था नियंत्रणात आणने सोपे व प्रभावी असते.जर आपण एक भुंगा नष्ट केला तर पुढे होणाऱ्या 60 ते 70 हुमणी अळ्यांना प्रतिबंध करत असतो.

हुमणी किडीची पिकावर विशेषतः ऊसावर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लक्षणे दिसायला चालू होतात. जुलै-ऑगस्ट संपेपर्यंत बर्यापैकी पाऊस हा असतोच तसेच हूमनीची सुरवातीची अळी अवस्था पिकाची मुळे न खाता सेंद्रिय पदार्थ खात असतेत्यामुळे ऊस हिरवागार दिसत असतो,पण जसा श्रावनानंतर ऊन पावसाचा खेळ चालू होतो आणि मोठी होत असलेली हूमनी अळी पिकाच्या मुळावर उपजीविका करायला चालू करते तसतसे उन्हामुळे ऊसाची सुकलेली पाने,मुळासहित सहज उपसून येणारे ऊस,थोड्याश्या वाऱ्यामुळे पडणारा ऊस अशी लक्षणे दिसायला चालू होतात. आणि मग आपल्याला समजते की हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा झालेला आहे.

मग आता पिकास प्रादुर्भाव होण्याआधीच लहान अवस्थेत असलेल्या अळीस नियंत्रित करणे खूप गरजेचे आहे.

जैविक नियंत्रण:-

जसे आपल्याला त्वचेचे फ़ंगल रोग होतात तसे हूमनीच्या अळीअवस्थेस मेटारझीअम ऍनिसोप्लि नावाची बुरशी रोगग्रस्त बनवून मारून टाकते.

मेटारझीअम ऍनिसोप्लि बुरशी पूर्णपणे पर्यावरण पूरक व मानवास कोणताही धोका पोहचवत नाही.

मेटारझीअम ऍनिसोप्लि बुरशी आणल्यानंतर 15 ते 20 किलो मातीमध्ये 3 ते 5 किलो मिसळून एखाद्या पोत्यावर पसरून अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवावे. रोज त्यावर पाणी शिंपडावे.आठ दिवस त्यामधील ओलावा नियंत्रीत ठेवावा.

ही बुरशींची युक्तमाती आपण आपल्या एक एकर क्षेत्रात सरी मधून विस्कटू शकतो.

 त्यानंतर या बुरशींची लागण हुमणीस होऊन ती मरून जाते.

 कोणत्याही रासायनिक लागवडीसोबत या मित्रबुरशीचा वापर करू नये.तसेच बुरशी वापरण्याआधी 15 दिवस व वापरानंतर रासायनिक लागवड देणे टाळावे.

कृषी विज्ञान केंद्र तळसंदे,कोल्हापूर येथे ही बुरशी उपलब्ध आहे.किंवा आपल्या गावातील कृषी सहाय्यक गावामध्ये उपलब्ध करून देऊ शकतात.

रासायनिक नियंत्रण जवळजवळ सर्व ठिकाणी उपलब्ध होत असते त्याविषयी सविस्तर बोलत नाही. कार्बोफ्युरॉन, फॉरेट,फीप्रोनिल व क्लोरोपायरीफॉस चे मिश्रण यामधील कोणतेही रसायन रायायनिक लागवडीमधून देऊ शकतो. पण हे देताना नेहमी मुळांमध्ये जाईल अशा पद्धतीने द्यावे.अतिवापर टाळावा. 

जर रासायनिक उपचार केल्यानंतर मेटारझिअम वापरनार असाल तर कमीतकमी 15 दिवसाचे अंतर ठेवावे.

कोणतीही कीड असो एकात्मिक व्यवस्थापनाशिवाय त्यांचे समूळ उच्चाटन होऊ शकत नाही. म्हणूनच हुमणी किडीचे नियंत्रण करण्यासाठी सापळे लावून भुंगे नष्ट करणे तसेच मित्रबुरशीचा वापरही तितकाच महत्वाचा.

संकलन - IPM school.

 

English Summary: Kharif management of Humani insects
Published on: 05 October 2021, 08:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)