Agripedia

सध्या पावसाने उघडीप घेतलेली पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो अशा परिस्थिति पिकांची आंतरमशागत करणे महत्वाचे आहे, जेणेकरून जमिनीत ओलावा टिकून राहील.

Updated on 30 August, 2022 12:40 PM IST

सध्या पावसाने उघडीप घेतलेली पाहायला मिळत आहे. शेतकरी (farmers) मित्रांनो अशा परिस्थिति पिकांची आंतरमशागत करणे महत्वाचे आहे, जेणेकरून जमिनीत ओलावा टिकून राहील.

चांगल्या पिकांसाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न (Income farmers) वाढविण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप पिकातील आंतरमशागतीचे महत्व आणि नियोजनाविषयी माहिती दिली आहे. ही माहिती नक्कीच शेतकऱ्यांना उपयोगी पडेल.

शेतकरी मित्रांनो पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव (Weed infestation) कमी करण्यासाठी तसेच मातीतील ओलावा टिकवण्यासाठी कोळपणी करणे गरजेची आहे. तणांच्या प्रादुर्भावानुसार आणि पिकांच्या प्रकारानुसार साधारणतः २ ते ३ कोळपण्या नंतर दुसऱ्या आठवड्यापासून पाचव्या-सहाव्या आठवड्यापर्यंत कोळपणी करा.

पेरणी झाल्यानंतर पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार विशेषतः नत्रयुक्त खतांचा वापर केला जातो. खुरपणी किंवा कोळपणी झाल्यानंतर खत मातीत मिसळेल अशा पद्धतीने द्या. परंतु खत दिल्यानंतर पिकाला पाणी द्यायला विसरू नका.

Cauliflower consumption: सावधान! प्रमाणापेक्षा जास्त फुलकोबीचे सेवन केल्याने होतात गंभीर समस्या

पिकांच्या दोन ओळीत सेंद्रिय पदार्थ वापरा. उदा. गव्हाचे काड, बाजरीचे सरमाड, तुरकाठ्या, ज्वारीची धसकटे, उसाचे पाचट, पिकांचा टाकाऊ भाग इत्यादी आच्छादन म्हणून वापरा. साधारणपणे प्रती हेक्टरी पाच टन या प्रमाणात सेंद्रिय आच्छादकाचा वापर करा.

आच्छादनामुळे बाष्पीभवनाचा (Evaporation) वेग कमी होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहील. तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, जमिनीचे तापमान नियंत्रित राखणे इत्यादींचा फायदा होतो.

शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय; पीक विम्यासाठी 187 कोटी मंजूर

आंतरमशागतीचे नियोजन

1) आंतरमशागतीची कामे झाल्यावर तूर, कपाशीमध्ये दर दोन ओळीनंतर सऱ्या काढा. या सऱ्या मुळे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उपयोग होतो. तुरीच्या जोमदार वाढीसाठी १५ दिवसांनी खुरपणी करा. अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस शेतात तण येऊ देऊ नका.

2) सोयाबीन पिकाची लागवड (Cultivation of soybean crop) रुंद वरंबा सरीवर केली असल्यास रिकाम्या सरीमध्ये तण राहणार नाही याची काळजी घ्या.

3) हुलगा, मटकी, चवळी आणि राजमा ही पिके २० ते २५ दिवसांचे असतांना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करा. पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस पीक तणविरहीत ठेवा.

4) भुईमूग पिकामद्धे १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या करा व दोन खुरपण्या घ्या. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरवात झाल्यानंतर आंतरमशागत करू नका.

5) भाजीपाला पिकांमध्ये आवश्यकतेनुसार खुरपणी करून पीक तणविरहित (Crop weed free) ठेवा. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर लावा म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत. आवश्यकतेनुसार वर खतांच्या मात्रा द्या. वेलींना वळण देण्यासाठी ताटी उभारू शकता. यातून भाजीपाला वाढण्यास मदत होईल.

महत्वाच्या बातम्या 
या शुभ मुहूर्तावर करा लाडक्या बाप्पाची स्थापना; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि इतर खास गोष्टी
दिवसाला फक्त 45 रुपये वाचवून 25 लाखांचे मालक व्हा; एलआयसीची 'जीवन आनंद योजना' देत आहे संधी
आता महावितरण ठेवणार नजर; नुकसान भरून काढण्यासाठी राबविली जाणार 'ही' मोहीम

English Summary: kharif crops technically better production
Published on: 30 August 2022, 12:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)