Agripedia

माणसाला शेतीचा शोध लागला म्हणजे, त्याने मारुण खाण्याऐवजी पेरुण खायला सुरुवात केली.

Updated on 30 October, 2022 6:44 AM IST

माणसाला शेतीचा शोध लागला म्हणजे, त्याने मारुण खाण्याऐवजी पेरुण खायला सुरुवात केली. आणि एका नवीन संस्कृतीचं बिज रोवल्या गेल्.एका दाण्यात हजार दाणे निर्माण करण्याची उद्भुत क्षमता हे ह्या मातीचे सर्वात मोठे वैशिष्ट आहे .... हि क्षमता निर्माण करणारा घटक म्हणजे माती. या सुपिक मातीवरच आपल्या शेतीचा आणि अवघ्या जिवसृष्टीचा डोलारा उभा आहे.जिचा आपण काळी आई म्हणुन गौरव करतो तीच आज मरणासुन्न अवस्थेत पडलीय. थोडक्यात आपल्या जमिनीला

ग्रहण लागलय.जमिनीचे आरोग्य बिघडल्याने जमिन झपाटयाने नापिक होतेय..The eclipse has started. The land is rapidly becoming infertile as the health of the land deteriorates.आपण वेळीच जागे झालो नाही तर,

हिरवळीची पिके शेतात वाढवितात या गोष्टी, लागवड करा वाचेल मोठा खर्च

शेती , पर्यावरण आणि समाज यांच्यावर होणाऱ्या दुष्परिणामांनं आपल्याला सामोर जावे लागेल. शास्त्रज्ञ म्हणताय ,भविष्यात मुलांना नुसता सातबारा उतारा नका देवू, त्यासोबत उत्कृष्ट पध्दतीची जमिनपण दया...योग्य दिशेने प्रयत्न केले तर आपण आपली जमिन वाचवू शकतो..योग्य खत व्यवस्थापन आणि फायदेशीर शेती उत्पादन यासाठी मातीपरिक्षण हे एक शेतीच अवश्य अंग आहे .

माती परिक्षणामुळे आपल्या जमिनीचा सामु किती आहे, त्यात कुठले अन्नघटक किती प्रमाणात कमी जास्त आहेत हि माहिती मिळते. ह्यामुळे शेतकरी बांधवांच्या खर्चात बचत होवून. संतुलीत खतांचा वापरून भरघोस उत्पादन काढता येते.. माती परिक्षणाचे अमुल्य फायदे शेतकरी बांधवांना कळत आहेत.आपले आजोबा वडील हे पारंपरिक पद्धतीने शेती करत आलेत. तेही रासायनिक खतांचा वापर करतच होते.परंतु त्या वेळच्या जमिनी ह्या सुपीक जमिनी होत्या शेणखताचा योग्य वापर व्हायचा व त्याचबरोबर जमिनीची पोत टिकवून होती. आताचा विचार केला

तर परिस्थितीत बदल झालेला आहे.कारण आपली जमीन नापीक होऊ लागले शेतकरी बांधवांनी वेळीच लक्ष दिलं तर त्याचा भला मोठा फायदा होऊ शकतो आज माती परीक्षणाचे अमूल्य फायदे शेतकऱ्यांना लक्षात येत आहेत ते आपल्या शेतीचे माती परीक्षण करुन घेत आहेत.मी पंकज घटे शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की,मी कुठला शास्त्रज्ञ नसून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील बीएससी ऍग्री झालेला व्यक्ती आहे. माझ्या परीने असलेल्या अनुभवातून मी आपल्यापर्यंत माती परीक्षणाचा संदेश पोचवीत आहे.

 

श्री .पंकज घटे 

( लेखक कृषीशास्त्र विषयांत पदवीधर असून कृषी तंत्र विद्यालय मुक्ताईनगर येथे प्राचार्य आहेत )

English Summary: Keep Soil Alive Soil is a living ecosystem, not dust.
Published on: 28 October 2022, 08:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)