Agripedia

शेतकरी भावांनो कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केली

Updated on 06 November, 2022 11:10 AM IST

शेतकरी भावांनो कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी जाहीर केली आहे सांगली जिल्ह्यातील केवळ दत्त इंडिया कारखान्याने एक रकमी एफ आर पी जाहीर केली आहे उर्वरित कारखान्यांनी याबाबतीत चकार शब्द

काढलेला नाही त्यामुळेच एक रकमी एफ आर पी जाहीर करा,Declare an amount of FRP that is not drawn, वजनातील काटा मारी बंद करा,

पाच हजार रुपये प्रति महिना पेन्शन देणारी 'ही' योजना; जाणून घ्या

काटे ऑनलाईन करा,तोडीचे पैसे बंद करा, शेताच्या बांधावर रिकवरी काढण्याची पद्धत सुरू करा, मशीन तोडणी कपात दीड टक्के च करा आदीसह अन्य

मागण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे आपल्या हितासाठी, आपल्या फायद्यासाठी ,आपली होणारी लूट थांबविण्यासाठी राजकारण, पक्ष. गट, नेता थोडा वेळ बाजूला ठेवा आणि रॅलीत सहभागी व्हा .रॅलीचा मार्ग गुरुवारी सकाळी नऊ वाजता उदगिरी

कारखाना, तेथून विराज कारखाना, क्रांती व सोन हिरा कारखाना सांगता दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सर्वोदय हुतात्मा राजारामबापू ,कृष्णा, विश्वास असे रॅलीचे नियोजन केले आहे 

 

महेश खराडे 

8329121717

9850693701

English Summary: Keep politics aside, apply to NADA to stop sugarcane rate, katamari, todi money because of self-respect....
Published on: 06 November 2022, 07:38 IST