Agripedia

यंदा मॉन्सून चांगला होणार असल्याचा प्राथमिक अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. खरीप हंगामातील आपली पेरणी लांबणीवर पडून येऊ यासाठी शेतकऱ्यांसाठी काळजी घेतली पाहिजे. आज आपण पेरणी करताना कोण- कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी याची महिती घेणार आहोत.

Updated on 28 April, 2020 5:38 PM IST


यंदा मॉन्सून चांगला होणार असल्याचा प्राथमिक अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. खरीप हंगामातील आपली पेरणी लांबणीवर पडून येऊ यासाठी शेतकऱ्यांसाठी काळजी घेतली पाहिजे. आज आपण पेरणी करताना कोण- कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी याची महिती घेणार आहोत. उशीरा पेरणीसाठी जास्तीत जास्त प्रमाणावर आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. खरीप हंगामामध्ये 25 ते 45 सेमी खोलीच्या जमिनीवर आंतरपिके घेण्याची शिफारस केलेली आहे. बाजरी आणि तूर (2 : 1) आंतरपीक घेतल्यास सलग पिकापेक्षा निश्चितच जास्त फायदा मिळत असतो. बाजरी आणि सुर्यफूल ही पिके 90 ते 100 दिवसात तयार होतात तर तूर पिकाचा पक्वता कालावधी 145 ते 150 दिवसांचा असल्यामुळे पिकांच्या योग्य वाढीस जमिनीतील उपलब्ध ओलाव्याची गरज वेगवेगळ्या वेळी भागविली जाते. पावसामध्ये खंड पडल्यास कमीत कमी एक पीक तरी निश्चित पदरात पडते. व अवर्षण परिस्थितीवर मात करण्यास मदत होते.

आंतरमशागत महत्त्वाची
पिकांमधील आंतरमशागत फार महत्त्वाची असते. जमिनीतून बाष्पीभवन होऊन पाणी हवेत उडून जात असते. त्यामुळे जमिनीतील ओल कमी होते. कोळपणी केल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातून होणारे बाष्पीभवन कमी होते आणि ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते. तणांचे प्रमाण जास्त असल्यास तणही पिकांच्या बरोबरीने पाणी शोषण करतात म्हणून तण नियंत्रण केल्यामुळे ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

दोन टक्के युरिया फवारणी करावी
जर पावसाने खंड पाडला तर पिकांवर परिणाम होत असतो. पिकांची वाढ, अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते. याससह अन्नद्रव्य शोषण्याची क्रिया. मुळाद्वारे पाणी ओढण्याची क्रियाही मंदावत असते. काही काळानंतर पावसाने हजेरी लावली तर पिकांच्या मंदावलेली क्रिया पुर्ववत करण्यासाठी पिकांवर २ टक्के युरियाची फवारणी करावी.

आच्छादनाचा वापर
आच्छादनामुळे 25 ते 30 टक्के उत्पादनामध्ये वाढ होते. जमिनीच्या पृष्ठभागावर पिकांच्या ओळीमध्ये काडी-कचरा, पीक अवशेष, पाला पाचोळा, उसाचे पाचट इत्यादी सेंद्रीय पदार्थाचे प्रति हेक्टरी 5 टन याप्रमाणे आच्छादन करावे. भाजीपाला, फळपिके यासारख्या नगदी पिकांमध्ये सेंद्रीय पदार्थाऐवजी प्लॅस्टीक फिल्मचे आच्छादन करावे. यामुळे पिकांना अधिक फायदेशीर होऊ शकतो.

सोर्स - विकासपिडिया

English Summary: keep in mind these things for more production while kharif harvesting
Published on: 28 April 2020, 05:37 IST