आदरणीय डायरेक्टर सरांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता के. बी. एक्सपोर्टस् संचलित गॅलेक्सी को. ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून वाढदिवसाला उत्साहात सुरुवात झाली त्यानंतर शहरातील अशोका हॉटेल येथील प्रशस्त सभागृहात डायरेक्टर श्री. सचिन यादव सरांच्या वाढदिवसासोबतच गॅलेक्सी को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गॅलेक्सी संस्थेचे सर्व सभासद, कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते. यादरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवर डायरेक्टर सरांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान गॅलेक्सी संस्थेची ३ वर्षातील दमदार कामगिरीचा आलेख उपस्थितांसमोर मांडण्यात आला सोबतच भविष्यातील प्रगतीचा मानस देखील व्यक्त करण्यात आला.
यानंतर सायंकाळी शिवराज पेट्रोलियमतर्फे डायरेक्टर सरांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तसेच वाढदिवसानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर देऊन पेट्रोल, डिझेल दरामध्ये सूट देण्यात आली होती.
के. बी. एक्सपोर्टसच्या भव्य प्रांगणामध्ये के. बी. फाउंडेशन, फलटण ब्लड बँक व लायन्स क्लब फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सोबतच मधुमेहाबद्दल जनजागृती व तपासणीचे देखील आयोजन करण्यात आले होते ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला तसेच सामान्य कुटुंबातील व्यक्तींनी मोफत मधुमेह तपासणीचा लाभ घेतला. मार्केटिंग विभागातील औरंगाबाद व जालना येथील स्थानिक प्रतिनिधींकडून डायरेक्टर सरांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, गोशाळेमध्ये चारा दान असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
सायंकाळी ६.०० वाजता डायरेक्टर सरांचे कंपनीच्या प्रांगणात आगमन झाल्यानंतर प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात झाली ज्यामध्ये वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील सुप्रसिद्ध डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी विविध नृत्याविष्कार यावेळी सादर करण्यात आले सोबतच कंपनीतील कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या कलागुणांना मंचावर उस्फुर्तपणे सादर केले. सदर कार्यक्रमावेळी कृषी, राजकारण, औद्योगिक तसेच समाजकारणातील विविध व्यक्ती डायरेक्टर सरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत्या. या शुभप्रसंगी डायरेक्टर सरांच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती उपस्थित होत्या व त्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. उपस्थित आमंत्रित मान्यवर, प्रतिष्टीत व्यक्ती, कंपनीतील कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
डायरेक्टर सरांनी यावेळी उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्विकार केला व सर्वांचे आभार मानले त्याचप्रमाणे मनोगत व्यक्त करताना येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी कंपनी कटिबद्ध राहील हे अधोरेखित केले.
प्रतिनिधि - गोपाल उगले
Published on: 27 December 2021, 08:25 IST