Agripedia

करटोली हे आपल्यापैकी बर्याेच जणांना माहिती आहे. परंतु जितकी माहिती करटोली बद्दल हवी तेवढी नाही. करटोली ला वेगळ्या नावाने ओळखले जाते. कारल्या सारखी दिसणारी परंतु आकाराने लहान करटोलीला रान कारली असेदेखील म्हणतात.

Updated on 26 August, 2021 1:37 PM IST

करटोली हे आपल्यापैकी बर्‍याच जणांना माहिती आहे. परंतु जितकी माहिती करटोली बद्दल हवी तेवढी नाही. करटोली ला वेगळ्या नावाने ओळखले जाते. कारल्या सारखी  दिसणारी परंतु आकाराने लहान करटोलीला रान कारली असे देखील म्हणतात.

 करटोली ही वेलवर्गीय वनस्पती असून ती प्रामुख्याने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा आणि कोकण या विभागात आढळते. तसेच जिल्हा निहाय  विचार केला तर नाशिक,नगर, धुळे, पुणे, ठाणे,रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये म्हणजेच प्रामुख्याने जंगलांमध्ये आढळून येते.

 डोंगराळ भागात आपोआप वर्षानुवर्षे येणारी ही वेलवर्गीय रानभाजी आहे. करटोली ची कोवळे डीरे आणि कोवळी फळांचा उपयोग भाजी करण्यासाठी केला जातो. काही भागात साधारण पावसाळ्याच्या सुरुवातीला करटोली चे कोवळी डिरे रानातून भाजी करण्यासाठी आणली जातात.

 तसेच करटोली चे फळे ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान पुणे आणि मुंबईतील बाजारपेठेत चांगल्या दराने विकली जातात. करटोली चे वेल काटेरी झुडपं वर आणि बांधांवर चांगल्या प्रकारे वाढतात. आता काही प्रमाणात शेतकरी करटोली ची शेती करू लागले आहेत त्यामध्ये कोकण, दक्षिण महाराष्ट्रआणि गुजरात राज्याचा समावेश आहे.

 करून घेऊ करटोली वनस्पती ची ओळख

  • करटोलीहावर्षायूवेलअसूनजंगलामध्ये मोठ्या काटेरी झुडपं वर वाढलेली आढळते. कंद बहुवर्षायू असून खोड नाजूक आणि इतर वनस्पतींच्या आधाराने वाढणारी आहे.पाने साधी, एकाआड एक,रुंद हृदयाकृती, तीन ते नऊ सेंटीमीटर लांब व तीन ते आठ सेंटीमीटर रुंद असून त्याच्या पानांच्या कडा दातेरी असतात. पानाचा देठ 1.2 ते 3 सेंटिमीटर लांब असतो.
  • करटोली ची फुले पिवळी, नियमित, एकलिंगी, नर व मादी फुले वेग वेगळ्या  वेलीवर  येतात. फुले पानांच्या बगलेतून एकांडी येतात. लागवड केलेल्या क्षेत्रात फळधारणेसाठी दहा टक्के नर वेलांची  संख्या आवश्‍यक असते. लागवड कंद, बिया आणि फाटे कलम यांच्यापासून केले जाते.
  • करटोली च्या पिकांमध्ये मादी आणि नर वेल वेगवेगळे असतात. नर आणि मादी वेल फुलांवरून सहज ओळखता येतात. मादी फुलांच्या पाकळ्या खाली खडबडीत गाठी सारख्या आकाराचा बीजांडकोश असतो. तर नर फुलात अशी गाठ नसते.
  • पुष्पकोष पाच संयुक्त दलांचा असून, बीजांडकोश एकमेकास चिकटलेले असतात. पाच पाकळ्या व पाच पुंकेसर असतात. फळे लंबगोलाकार 5 ते 7 सेंटीमीटर असून फळांवर नाजुक काट्यांचे आवरण असते आत पंधरा ते वीस बिया पांढऱ्या घरात लगडलेल्या व पिकल्यावर करड्या रंगाच्या होतात..
English Summary: kartoli faydeshir raanbhaji
Published on: 26 August 2021, 01:37 IST