करटोली पिकालाउष्ण,दमट हवामान मानवते. लागवडीसाठी डोंगर उताराची,पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमीन जर हलकी व मध्यम प्रकारच्या असेल तर पीक चांगले येते.
लागवड पद्धत
- अभिवृद्धी, लागवड कंद, बिया व फाटे कलम यांच्यापासून केली जाते. कणकवलीच्या पिकात मादी आणि नर वेल वेगवेगळे असतात. लागवड केलेल्या क्षेत्रात फळधारणेसाठी दहा टक्के नरवेल यांची आवश्यकता असते. फुलांवरून नर आणि मादी वेल सहजओळखता येतात. मादी फुलांच्या पाकळ्या खाली खडबडीत गाठी सारख्या आकाराचा बीजांडकोश असतो. नर फुलांमध्ये तशी गाठ नसते.
- बियांपासून लागवड केल्यास उगवण अतिशय कमी प्रमाणात होते. नर आणि मादी वेलांच्या संख्येबाबत खात्री देता येत नाही. तसेच वेलीवर फलधारणा उशिरा होते.तसेच लागवड ही फाटे कलमापासून देखील करता येतो. परंतु यामध्ये रोपे जास्त मरतात.
लागवड कालावधी व पद्धत
करटोली ची लागवड ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी. जमीन नांगरट करून भुसभुशीत करावी. जमिनीत दीड ते दोन मीटर अंतरावर 60 सेंटिमीटर रुंदीचे पाट काढावेत.
घाटाच्या दोन्ही बाजूस एक मीटर अंतरावर 30×30×30 आकाराचे खड्डे करावेत. या प्रत्येक खड्ड्यामध्ये दीड ते दोन किलो कुजलेले शेणखत व्यवस्थित टाकून मातीत मिसळून घ्यावे. प्रत्येक अळ्यात 10 ग्रॅम युरिया, 60 ग्रॅम सुपर फॉस्फेट, दहा ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आणि 50 ग्रॅम कार्बारिल हे कीटक नाशक माती बरोबर चांगले मिसळून घ्यावे. प्रत्येक आळ्यामध्ये एककंद लावावा.
बीजप्रक्रिया
कंद कॉपर ऑक्सिक्लोराईड दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळलेल्या द्रावणात बुडवून घ्यावे त्यामुळे कंद सुजण्याचे प्रमाण कमी होते.
करटोली साठी खत व्यवस्थापन
प्रति हेक्टर 20 टन शेणखत, दीडशे किलो नत्र, 100 किलो स्फुरद व 60 किलो पालाश द्यावे. महत्त्वाचे म्हणजे लागवड करतेवेळी स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा द्यावी.
लागवड करण्यापूर्वी नत्र 50 किलो, लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी 50 किलो आणि 60 दिवसांनी 50 किलो द्यावे. कारलीचा वेल एक महिना वयाचा झाल्यावर फक्त वेलास दहा ते पंधरा ग्रॅम युरिया द्यावा.
सर्वात महत्त्वाची आहे आंतरमशागत
लागवड केल्यानंतर करटोली चे वेल वेगात वाढतात. अशावेळी वेलींना आधार देणे फार महत्त्वाचे असते. त्यासाठी बांबूचा उपयोग करणे फार उत्तम असते किंवा वेल मांडवावर चढवावे. वेलाचा आजूबाजू चतन खुरपणी ने काढून टाकावे व अळ्यांना मातीची भर द्यावी.
Published on: 14 October 2021, 09:46 IST